पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा : तज्ज्ञांचा सल्ला

म्युकरमायकोसिस नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

अमरावती विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक

इमेज
  अमरावती विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे                                                                             - कृषी मंत्री दादाजी भुसे   Ø   पोकराची प्रभावी अंमलबजावणी करावी Ø   विभागपातळीवर शेतकऱ्यांना सन्मान Ø   ग्राम कृषी विकास समिती स्थापन Ø   एक गाव, एक वाणासाठी प्रयत्न   अमरावती, दि. १० : शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करावे, यासाठी गाव आणि शेतकरी पातळीवर बियाण्यांची उपलब्धतेचे नियोजन करावे, बियाण्यांची उगवण क्षमता तपासून बियाण्यांच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करावे, तसेच शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी बियाणे उपलब्धतेचा दररोज आढावा घेण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.   अमरावती विभागाची विभागस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, नवनाथ कोळपकर, डॉ. के. बी. खोत, नरेंद्र नाईक उपस्थित

सजग राहून नागरिकांनी रक्तदानास पुढे यावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

इमेज
  सजग राहून नागरिकांनी रक्तदानास पुढे यावे -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल Ø   महसूल कर्मचारी एकता संघातर्फे रक्तदान शिबिर अमरावती , दि 4.  :अपघात किंवा अन्य दुर्धर व गंभीर आजारात रुग्णांना रक्ताची गरज भासते.   कोविडकाळात उपचारादरम्यान रक्ताची पुरेशी उपलब्धता असावी , गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठी सजग राहून रक्तदात्यांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी एकता संघातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवना त प्लाझ्मा व रक्तदान शिबिर आयोजि त करण्यात आले. या वेळी श्री. नवाल यांनी प्रथम रक्तदान करुन शिबिरा चा प्रारंभ्‍ केला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल कर्मचारी एकता संघातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर आयोजि त केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अविनाश उकंडे व त्यांची चमु यावेळी उपस्थित होती. प्लाझ्मा उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संघाने पुढाकार घेत हे शिबिर आयोजित केले आहे , अशी माहिती संघाचे सचिव गजानन उगले यांनी