पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांकरिता रेडीमेट होजीअरी गारमेंट व्यवसायासाठी अर्थसहाय्य

  केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांकरिता रेडीमेट होजीअरी गारमेंट व्यवसायासाठी अर्थसहाय्य   ·          मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 29 :  धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत आदिवासी पुरुष/महिला समुह व बचतगटांना रेडीमेड होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नि:शुल्क अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक आदिवासी उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठीचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभर्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय धारणी या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे उपलब्ध आहेत. मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता धारणी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ; नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ;   नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 29 : जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनाचे नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यन्वीत झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.   आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविधमहत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतक-यांना लाभाचे वितरणविविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याचीपायाभरणी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

इमेज
  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतक-यांना लाभाचे वितरण विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी -           प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यवतमाळ, दि. 28 :    विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या  10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.   प्रधानमंत्री  श्री.  मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू.  निधीतून  रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन ,  तसेच यवतमाळ येथील पंडि

नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील ‘शिपाई’ पदाचा निकाल जाहीर

  नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील ‘शिपाई’ पदाचा निकाल जाहीर   निकाल पाहण्यासाठी  dtp.maharashtra.gov.in  संकेतस्थळ उपलब्ध   अमरावती, दि. 27 :   नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील शिपाई (गट ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठी परिक्षा टाटा कंन्सलटन्सी सर्व्हीसेस (टिसीएस) या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दि. 25 नोंव्हेबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या पद भरतीचा निकाल, गुणवत्ता यादी व अनुषंगीक सूचना विभागाच्या  dtp.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. सदर परिक्षेची गुणवत्ता यादी, शिफारसपात्र उमेदवारांची यादी तसेच अनुषंगिक सुचना नगर रचना विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयास देखील उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शिफारसपात्र उमेदवारांनी त्यांना नियुक्तीची शिफारस   केलेल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना अमरावती विभागाचे नगर रचना सहसंचाल

विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण उपलब्धतेसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

  विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण उपलब्धतेसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान   तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन ; प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना लाखोंचे बक्षिस   अमरावती, दि. 27 : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन होणार असून अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना गुणांकन देऊन विजेता घोषित करण्यात येईल. विजेता ठरलेल्या शाळांना लाखोंचे बक्षीस वितरण करण्यात येईल. अमरावती विभागातील अधिकाधिक शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत भौतिक सुव

अपघातग्रस्त खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आस्थेने विचारपूस

अपघातग्रस्त खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आस्थेने विचारपूस   अमरावती, दि. 22 : क्रिकेटच्या सामन्यासाठी यवतमाळला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला 18 फेब्रुवारीला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी बुधवारी (21 फेब्रुवारी) रेडियंट हॉस्पीटल व रिम्स हॉस्पीटल येथे जाऊन भेट घेतली. जखमींची आस्थेने विचारपूस करुन सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवावी, असे निर्देश    पालकमंत्र्यांनी  संबंधित यंत्रणांना दिले. अपघातातील मृतांना व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रवि राणांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली.  खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवि राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 0000  

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांना अर्थसहाय्यसाठी अर्ज आमंत्रित

  केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांना अर्थसहाय्यसाठी अर्ज आमंत्रित   अमरावती, दि. 23 :  धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत आदिवासी पुरुष/महिला समुह व बचतगटांना रेडीमेड होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नि:शुल्क अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक आदिवासी उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठीचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभर्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय धारणी या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे उपलब्ध आहेत. मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  उप कार्यालय, मोर्

संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

  संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन अमरावती, दि. 23 :  थोर समाजसुधारक  संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.          उपायुक्त गजेंद्र बावणे, रमेश आडे, हर्षल चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी- कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. 0000

1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

  1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा             अमरावती दि. 22: नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे येत्या 1 मार्चला यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.              अमरावती विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असतात. त्यांचाच भाग म्हणजे “ निवड जागेवरच ” On spot selection मोहीम रोजगार मेळाव्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरीता कंपन्याचे प्रतिनिधि प्रत्यक्ष उपस्थित राहुन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिल्या जाईल.              या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सह

संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता

  संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता अमरावती, दि. 22 : स्थानिक सायन्सस्कोर मैदानावर 18 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता उद्या, दि. 22 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित संविधान या महानाट्याने होणार आहे. सायंकाळी 7 ते 10 या वेळात संविधान हे महानाट्य सादर होणार असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या महानाट्याचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत.                पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महासंस्कृती महोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. 18 फेब्रुवारी पासून विविध सांस्कृतिक, कला, आणि संगीत कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना मिळाली. गायक सुदेश भोसले, अनिरुद्ध जोशी, ऋषिकेश रानडे यांच्यासारख्या गायकांनी अमरावतीकर श्रोत्यांना रिझविले. महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.   महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेले संविधान हे महानाट्य महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातू

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

इमेज
                                  पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार                 -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण  ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण   अमरावती, दि.21 :  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले. पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्

आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

इमेज
                                 आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अमरावती, दि.21 (जिमाका) : प्रशासनामार्फत नागरिकांना सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे आता नागरिकांना एका छताखाली महसूल विभागातील विविध कार्यालयांशी संपर्क साधता येणे, सोपे होणार आहे. प्रशासनात काम करताना आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी व त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.                     मोर्शी रोड, अमरावती येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ .निधी पांडेय, जिल्हाधिका

विभागीय आयुक्तालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

इमेज
                                                                                    विभागीय आयुक्तालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन   अमरावती दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त संजय पवार, श्री. जोशी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालया समोरील राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला विभागीय आयुक्तांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000