पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित

पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित              अमरावती,   दि.   27:   महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नागरीकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध सेवा व   परवाण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सीसीटीएनएस कार्यप्रणालीशी संबंधीत असलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे ( www.mhpolice.maharashtra.gov.in ) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.             सिटीझन पोर्टल चा उपयोग करुन नागरिकांना सभा, मिरवणुका, लाऊडस्पीकर, चारित्र्य पळताळणी, सुरक्षा रक्षक पडताळणी, गणपती व नवदुर्गा मंडळाची परवानगी इत्यादी ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या पोर्टलवर दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रथम खबर (FIR) पाहणे, अटक आरोपीची माहिती, बेवारस व अनोळखी प्रेतदेहाचे तपशील, चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती, हरविलेल्या इसमांची माहीती इत्यादी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.             राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या शहरी भागामध्ये भाड्याने राहणारे भाडेकरु, पेइंग गेस्ट यांची संपूर्ण माहिती सिटीझन पोर्टलवर सादर करण्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ              अमरावती,   दि. 26 :   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 9 लाख 71 हजार 953 शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.               विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावांची माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबाची संख्या 9 लाख 71 हजार 953 आहे. संकलित माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामानेही वेग घेतला असून, 7 हजार 53 गावांतील   7 लाख 60 हजार 89 पात्र कुटुंबाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. अशी आहे जिल्हानिहाय संख्या पात्र लाभार्थी कुटुंबांची अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 18, अकोल्यातील 1 लाख 15 हजार 762, यवतमाळमधील 2 लाख 11 हजार 29, बुलडाणा जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार 13 आणि

27 फेब्रुवारीला शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ

27 फेब्रुवारीला शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ ·         542 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार              अमरावती,   दि.   25:   शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या स्वायत्त संस्थेच्या 18 व्या पदविका प्रदान समारंभाचे बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात उन्हाळी 2018 व हिवाळी 2018 या परीक्षांमधील अभियांत्रिकी पदविकेच्या विविध विद्या शाखांमधील एकूण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदविका प्रदान करण्यात येणार आहे.             सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांचे अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पदविका प्रदान समारंभात स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व प्लॉस्टिक व पॉलीमार अभियांत्रिकी या शाखांच्या एकूण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात येणार आहे. या पदविका प्रदान समारंभात प्रथम व दिव्तीय क्रमांक प
इमेज
मेळघाट अॅक्शन प्लान राबवून बालमृत्यूचे प्रमाण रोखणार - अमरावतीत झालेल्या सर्व विभागीय बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची ग्वाही * दुर्गम ठिकाणी तज्ज्ञांचे शिबीर घेणार * आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांवर भर * संपर्क यंत्रणा , दळणवळण बळकट करणार अमरावती , दि. २३ : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते , संपर्क यंत्रणा आणि वीज सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन कुपोषण , मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट अॅक्शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मेळघाट परिसराचा दौरा आटोपून आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ , आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास विभागीय आयुक्त पियूष सिंह , जिल्हाधिकारी शैलेश नवाल , मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री , आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार , सहसंचालक डॉ. अर्चना पाटील , आ

औद्योगिक क्षेत्रातून सर्वात जास्त रोजगार निर्मिती

इमेज
औद्योगिक क्षेत्रातून सर्वात जास्त रोजगार निर्मिती -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील अमरावती, दि. 22 : लोकांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्रात आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्याचे राज्याने ठरविले आहे. राज्याच्या प्रयत्नांमुळे आज सर्वाधिक रोजगार निर्मिती औद्योगिक क्षेत्रातून झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले. आज येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात नव्या उद्योग भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद सदस्य विजय काळमेघ, नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, नगरसेवक राजेश शाहू, अजय गोंडाणे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश जांजड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. नवघरे, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रकाश पुंड आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले, राज्यात औद्योगिक विकास महामंडळाने दिड लाख हेक्टर जमिन संपादित केली आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुमारे 364 औद्योगिक क्षेत्

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3)   लागू अमरावती , दि . 15   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व (3) लागू केली आहे. या कलमाचा अंमल दिनांक 14 फेब्रुवारी 2019 पासून लागू राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पांढरकवड्यात विकासकामांचे लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पांढरकवड्यात विकासकामांचे लोकार्पण अमरावती , दि . 15   : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शनिवारी (दि. 16 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजून 25 मिनीटांनी पांढरकवडा येथे आगमन होत आहे. यावेळी त्यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांची पायाभरणी होईल. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकुल वितरण, अजनी (नागपूर)-पुणे रेल्वेला व्हीडीओच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच धनादेशाचे वितरण होईल. यावेळी प्रधानमंत्री यांचे भाषण होईल. या कार्यक्रमानंतर सकाळी 11.30 वाजता ते प्रयाण करतील. 00000

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती             अमरावती दि. 15 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीणे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च्‍ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.12 वी दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते दिनांक 20 मार्च 2019 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची   नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 7767960804,7066475360,8668392232, 8459112133,9619643730,7796874474,9561220152,8530608947,7066128995,7387501892             उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा काला

पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना

पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना Ø   आता लेखी परीक्षा प्रथम, तद्नंतर शारिरीक चाचणी अमरावती , दि .    15 :    महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने पेालीस शिपाई पदावर बुध्दीमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यता   आहे. तसेच पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारिरीक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना या बाबी विचारात घेऊन गृह विभागाने 18 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार पोलीस शिपाई पदभरती प्रकियेत बदल केला आहे. नवीन पध्दतीअनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढयाच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल, आणि जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असे वाशिमच्या पोलीस अधीक्षक, मोक्षदा
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन अमरावती ,  दि .    15 :     संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात   विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी  संत सेवालाल महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . यावेळी   विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख,   महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे ,  पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर ,  तहसिलदार वैशाली पाथरे यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते .  उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली . यावेळी जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रध्दाजंली वाहिली.                                                       
इमेज
                मो ठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही शासनाचा भर -           मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊळगावराजा शहरातील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारती चे थाटात लोकार्पण देऊळगांव राजा शहराच्या विकासासाठी भरघोस निधी बुलडाणा , दि. १४ –केंद्र सरकारच्‍या मदतीने छोटया शहरातील विविध विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे . बालाजी नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरातही अनेक विकासाची कामे करण्‍यात आली असून या शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही . मागील चार वर्षांत राज्‍य शासनाने मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही प्रामुख्‍याने भर दिला आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा येथे केले. देऊळगावराजा येथील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेन्द्र फडणवीस   यांच्‍याहस्‍ते आज करण्ययात आले. त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यटन मंत्री जयकुमार राव

कृषि खत विक्रेत्यांसाठी डेसी (DAESI) प्रशिक्षण

कृषि खत विक्रेत्यांसाठी डेसी (DAESI) प्रशिक्षण Ø अर्ज htt://www.manage.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध अमरावती, दि. 13 : अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी DAESI (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपुट डीलर्स) हा एक वर्ष कालावधीचा (आठवड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग प्राचार्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण प्रवेशासाठी इ. 10 वी पास व कृषि खत विक्रीचा परवाना असणे आवश्यक आहे. इ. 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, पार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रिचा परवाना आदी कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे. कृषि खत विक्रेत्यांसाठी   प्रवेश क्षमता 80 उमेदवार असून 10 हजार रु. प्रवेश शुल्क आहे. प्रवेश अर्जांचे वाटप व छायांकित कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज दि.15 ते   16 फेब्रुवारी या कालावयधीत 11.00 ते 5.00 या वेळेत स्वीकारले जाईल. अर्ज सादर करतेवेळी मुळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. दि. 20 फेब्रुवारी   रोजी अंतीम 80 उमेदवारांची प्रवेश यादी निश्चित करुन प्रतीक्षा यादी   जाहिर करण्यात येईल