पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त संजय पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार वैशाली पाथरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी नाझर श्री. पेठे उपस्थित होते. 00
इमेज
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन अमरावती, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, प्रमोद देशमुख, विजय भाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00

सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ Ø   जिल्हाधिकारी यांना दक्षता घेण्याच्या सूचना अमरावती, दि. 27 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे, नागरिकांना या योजनेचा लाभ देताना जिल्हाधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले आहे. राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्नित करून एकत्रितरित्या 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आणली आहे. त्यामुळे या योजनेत सुमारे 90 टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे. उर्वरीत नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच सध्यास्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असल्याने नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या 996 उपचार पद्धती मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येतील. शासकीय रुग

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

इमेज
‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत Ø   साडेसहा हजार विद्यार्थ्यांना घरपोच कार्यपुस्तिका Ø   लॉकडाऊनच्या काळात उपयुक्त Ø   धारणी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम अमरावती, दि. 22 : कोरोना‍ विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदिवासी विभागाच्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत. शैक्षणिक कालावधी पूर्ण झालेला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ   नये, यासाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका तयार केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. सध्या राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयातर्फे ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. हाच प्रयोग धारणी प्रकल्पामध्ये राबविण्यात येत होता. मात्र मेळघाटातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. बहुतांश गावात आवश्यक असणारी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्यपुस्तिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रकल्प अधिकारी डॉ

अमरावती विभागात एक लाखावर मजूर रोहयोच्या कामावर

अमरावती विभागात एक लाखावर मजूर रोहयोच्या कामावर Ø   लॉकडाऊनच्या काळात रोहयोचा आधार Ø   अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर Ø   यवतमाळात 735 ग्रामपंचायतीत कामे           अमरावती, दि. 22 : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला. मजूरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू केली. यात प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्यात येत आहेत. आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एक लाखाच्यावर मजूर कामावर आले आहेत.             अमरावती विभागातील चार हजार 25 ग्रामपंचायतीपैकी दोन हजार 404 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामावर तब्बल एक लाख सात हजार 641 मजूर कामावर आली आहेत. मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोहयोमधील वैयक्तिक लाभाच्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी विहिरी, घरकुल, वृक्षसंगोपन ही कामे हाती घेण्यात आली आहे. सध्यास्थितीत अमरावत
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ अमरावती, दि. 21 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना शपथ दिली. यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, धनंजय भाकरे, तहसिलदार वैशाली पाथरे, तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू Ø   नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा Ø   अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 19 : राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह सुरू करण्यात आलेले आहे. तरीही वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यक्तिश: सुनावणी प्रभावित झाली आहे. आयोगाकडील अपिल आणि तक्रारींवर जलदगतीने सुनावणी होण्यासाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वत:च्या ई-मेलद्वारे आयोगाच्या ई-मेलवर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह 20 रूपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी व्यवस्था केली आहे. तसेच आयोगाकडे पत्रव्यवहार करताना भ्रमणध्वनी क्रंमाक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोगाने कळविले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार सध्या कार्यालय मर्यादीत उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. एरवी   दर महिन्याला या कार्यालयात   सुमारे   350 द्वि तीय अ पि ल अर्ज   आणि   माहिती अधिनियम   कलम   18   नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात .   निर्बंधामुळे संख्या   कमी   झा ल

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू

  माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू Ø नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा Ø अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे आवाहन अमरावती, दि. 18 : राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह सुरू करण्यात आलेले आहे. तरीही वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यक्तिश: सुनावणी प्रभावित झाली आहे. आयोगाकडील अपिल आणि तक्रारींवर जलदगतीने सुनावणी होण्यासाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वत:च्या ई-मेलद्वारे आयोगाच्या ई-मेलवर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह 20 रूपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी व्यवस्था केली आहे. तसेच आयोगाकडे पत्रव्यवहार करताना भ्रमणध्वनी क्रंमाक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोगाने कळविले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार सध्या कार्यालय मर्यादीत उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. एरवी   दर महिन्याला या कार्यालयात सुमारे 350 द्वि तीय अ पि ल अर्ज आणि माहिती अधिनियम कलम 18 नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात . निर्बंधामुळे संख्या कमी झा ली आहे . कार्या ल

‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच

इमेज
‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच Ø   पोस्टाचे 4.6, बँकांचे 3.6 कोटी वितरीत Ø   51 हजाराहून अधिक बँकींग व्यवहाराची नोंद अमरावती, दि. 11 : पोस्टाची ओळख ही आतापर्यंत फक्त पत्र आणि मनी ऑर्डर इथपर्यंत मर्यादीत होती. परंतू काळाच्या ओघात पत्रांसोबतच डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पमेंट बँकेने नव्या क्षेत्रावर आपली मोहोर उमटविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या निर्बंधामुळे गरजू नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचता येत नव्हते. अशावेळी या पोस्ट बँकेने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या सेवेचा आधार दिला. आतापर्यंत पोस्ट बँकेने सुमारे आठ कोटी रूपये एवढी रक्कम खातेदारांच्या हाती दिली आहे. लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येक नागरिकाचा कसोटीचा काळ आहे. बँकांच्या मर्यादीत वेळा, एटीएममधील विशिष्ट रक्कम, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, दुर्गम भागातील नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारा त्रास, वाढता उन्हाळा अशा अनेक समस्या या काळात आल्या. नागरिकांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम आवश्यक असते. त्यावर उपाय म्हणून पोस्ट बँकेने पोस्टाच्या कार्यालयातून नागर