पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना Ø संकेतस्थळ- इ. 10 वी http://form17.mh-ssc.ac.in Ø संकेतस्थळ- इ. 12 वी http://form17.mh-hsc.ac.in अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्विकारण्याचा यापूर्वीचा अंतिम कालावधी दिनांक 19 सप्टेंबर 2018 ते 3 ऑक्टोबर 2018 व विलंब शुल्काने दि. 26 ऑक्टोबर 2018 ते 6 नोव्हेंबर 2018 या दरम्यान तसेच अतिविलंब शुल्काने दि. 7 नोव्हेंबर 2018 ते 14 नोव्हेंबर 2018 निश्चित करण्यात आला होता. याबाबत सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सुचि

दहावी व बारावीची परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध

दहावी व बारावीची परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध अमरावती, दि. 29 : फेब्रुवारी - मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपुर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातुर व कोकण या नउ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षांचे संभाव्य वेळाप त्र के मंडळाच्या अधिकृ त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे . अंतिम वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वीची लेखी परीक्षेचा कालावधी दि 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 आणि इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे . या कालावधीमध्ये आयोजित केलेली दिनांकनिहा य सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृ त www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे . शैक्षणि ‍ क वर्ष 2018-19 पासुन इयत्ता दहावी करीता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनपरीक्षार्थ्याकरिता अंतिम संधी असलेले

जीव वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण -रमेश मावस्कर

इमेज
जीव वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण -रमेश मावस्कर Ø    21 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान Ø     अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी अमरावती, दि. 27 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. वैद्यकीय क्षेत्रात रक्तदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत होत असल्यामुळे प्रत्येकाने सातत्याने रक्तदान करावे, असे आवाहन पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आज रक्तदान व ओराग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अपर आयुक्त मंगेश देशमुख, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, उपायुक्त श्री. निपाने, सहायक आयुक्त जी. व्ही. सुरंजे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नानवाणी, युनिक हेल्थकेअर ॲन्ड मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र बेलसरे, मनोज सहारे, उद्धव जुकरे यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिपरिचारीका उपस्थित होत्या. श्री. मावस्कर म्हणाले, ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या म्हणण्यानुसार अपघातग्रस्त किंवा आजारी व्यक्तीचा जी
इमेज
पालकमंत्र्यांकडून शहरात स्वच्छता कामांची पाहणी बाजार व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवा                               -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील               अमरावती, दि. 16:    शहरातील विविध बाजारांची, गर्दीची व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.    पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवकांसह आज शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्याधिकारी श्रीमती नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री. कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.   स्वच्छता पाहणी दौऱ्यात शंकरनगर, फरशी स्टॉप, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड आदी परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भा
इमेज
पीककर्ज वितरणाची गती वाढवावी                            -   किशोर तिवारी Ø    शेतीपूरक व्यवसायासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन         अमरावती, दि. 3 : रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, पीककर्ज वाटपाची टक्केवारी कमी आहे. पीककर्ज वाटपात सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे पीककर्ज मेळावे आदी माध्यमातून कर्जवितरणाची गती वाढवावी, अशी सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली. शुक्रवार, 2 नोंव्हेंबर रोजी, विभागीय आयुक्त कार्यालयात शेती विकास कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, अपर आयुक्त मंगेश मोहिते, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पुरवठा उपायुक्त रमेश मावसकर, लिड बँक मॅनेजर तसेच सहकार व कृषी विभागाचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.          श्री. तिवारी म्हणाले, विभागात पीककर्ज वाटपाची स्थिती समाधानकारक नाही. रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैश्यांची आवश्यकता आहे. यात बँकांनी गांभीर्याने काम केले पाहिजे. काही शेतकरी कर्जदार तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्या