पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर ·            www.mahahsscboard.maharashtra. gov.in   संकेतस्थळ उपलब्ध ·            आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतीम मुदत 16 जुलै अमरावती,   दि. 26   :   जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे. आवेदन अर्ज ऑनलाईन सादर करण्यातची मुदत संपल्यानंतर श्रेणी , तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाच्या कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिन रु. 50/- याप्रमाणे अतिविलंब शुल्क आकारण्यात येईल.     अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- तर विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरीता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत रु. 200/- प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल, याची सर्व

अमरावती विभागातील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण

अमरावती विभागातील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण                         अमरावती , दि . 21 : ग्रामविकास विभाग व ‘ यशदा ’ च्या सहकार्याने येथील पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत ग्रामविकास प्रशिक्षण केंद्रात विभागातील पाचही जिल्ह्यांतील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण जून आणि जुलै महिन्यांत होणार असल्याची माहिती केंद्राचे प्र . प्राचार्य डॉ . ए . एम . महल्ले यांनी कळवली आहे .                      प्रशिक्षणात पं . स . सदस्यांचे कामकाज , निधी उपलब्धता , नेतृत्व विकास , ताणतणाव व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश असून , पदाधिकारी म्हणून काम करताना प्रशिक ्षणाचा लाभ होणार आहे . प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवस असेल . केंद्रातर्फे निवास , भोजन आदी सर्व व्यवस्था करण्यात येईल . जून महिन्यात 28 ते 30 जून , जुलै महिन्यात 2 ते 4 जुलै , तसेच 5 ते 7 जुलै अशा प्रशिक्षणाच्या तारखा आहेत . या तिन्ही कालावधीत प्रत्येकी दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षण होईल .                         यापूर्वी केंद्रातर्फे 232 पं . स . सदस्यांचे प्रशिक्षण झाले आहे . उर्वरित सर्व पं . स . सदस्यांनी प्रशिक्ष

रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अमरावती , दि .21 :    अमरावती शहरातील   जयस्तंभ   चौक ते जवाहर गेट रस्त्याचे कॉक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे . या रस्त्याच्या व प्रथम टप्याच्या कामामध्ये जयस्तंभ चौक ते सरोज चौक व प्रभात चौक ते जवाहर गेट या दोन तुकडयाचे काम पुर्ण झाले आहे . सरोज चौक ते प्रभात चौक या लांबीमध्ये कॉक्रीट रस्ता बांधकाम सुरु करण्यात येत आहे . तरी वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यावरील वाहतुक   दि . 20 जून 2018 ते 31 जुलै 2018 पर्यंत   बंद करण्यात आली आहे . तशी वाहतुक बंद करण्याविषयी   या खात्याला परवानगी प्राप्त आहे . या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग , अमरावती यांनी कळविले आहे . ***** वृत्त क्र . 107                                                                       दिनांक - 21   जून 2018 विद्यार्थ्यांना