पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध उपक्रम

इमेज
  इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध उपक्रम                    अमरावती, दि. 23   :   विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 18 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.             यावेळी कार्यालयातील पोलिस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी सुनिता कंगले, पुजा राठोड, गणेश काळे, रोशन मिसाळ, पवन तिवारी, शिल्पा डोंगरे, संजिव काळे, श्री. दहातोंडे, कैलास राठोड, पंकज खानंदे उपस्थित होते. तसेच 21 डिसेंबर रोजी गाडगे महाराज वृध्दाश्रमात मास्क, सॅनिटायझर व फळवाटप करण्यात आले. यावेळी वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक डॉ. श्रीकांत बोरसे उपस्थित होते.             दि. 22 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान आणि फळवाटप करण्यात आले. इंदिराबाई मेघे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रम पार पडले. येथील रूग्णां

मत्स्यव्यावसायिकांनी पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा

  मत्स्यव्यावसायिकांनी पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा            अमरावती, दि. 23   :   प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यावसायिकांना पाच पिंजयांचा वापर करुन मत्स्यसंवर्धन करण्याकरीता अनुदान देण्यात येत आहे. पिंजऱ्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असून वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना पाच पिंजऱ्यांची असली तरी एकुण 18 पिंजऱ्यांपर्यंत, म्हणजे 13 पिंजरे स्वखर्चाने किंवा संपूर्ण 18 पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबत मत्स्य उद्योजकांनी कोणत्या जलाशयात किती पिंजरे टाकण्याची तरतुद उपलब्ध आहे, याबाबतची माहिती संबंधित जिल्ह्याच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना   कक्षातुन घ्यावी.             पिंजरा योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीस अनुदान लाभ मिळु न शकल्यास स्वखर्चाने या योजनेचा लाभ घेता येईल. स्वखर्चाने लाभ घेण्याऱ्या अर्जदारांनी तसे नमूद करावे. अनुदान योजना लाभार्थी अंतिम झाल्यावर जागा उलब्धतेनुसार सर्व विनाअनुदानित पिंजरा योजनेच्या अर्जदारांचा विचार करण्या

आज इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल

  आज इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल Ø    निकाल पाहण्यासाठी   www.mahresult.nic.in   संकेतस्थळ          अमरावती, दि. 23   :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) वरीक्षा दिनांक 20 नोव्हेंबर, 2020 ते 05 डिसेंबर, 2020 या कालावधीत तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परिक्षा   (इ. 12) दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल   www.mahresult.nic.in   या संकेतस्थळावर शुक्रवार दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर व

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

  जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू   अमरावती , दि .18   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार   मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2020 पर्यत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000    

बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचा आधार

  बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचा आधार अमरावती, दि. 11 : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. त्यानुसार सेवा क्षेत्रांसह उद्योगधंदेही बंद झाले. त्यामुळे अनेकांना रोजगार गमावावा लागला. परंतु लॉकडाऊनच्या काळात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता   मार्गदर्शन केंद्राने पाच ऑनलाईन रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्यात जिल्हा, तसेच इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी एक हजार 54 रिक्तपदे अधिसूचित केली होती. यामुळे बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आधार मिळाला. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी सिमीत आहेत. या पाच रोजगार मेळाव्यामध्ये चार हजार 317 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला. उद्योजकांनी सहभागी झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने   मुलाखती घेतल्या. यात 339 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळाले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उद्योजकांनी एकूण एक हज

आदिवासी विद्यार्थ्याना प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांची निवड

  आदिवासी विद्यार्थ्याना प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या                                            निवासी शाळांची निवड                                                                                     शाळांनी 31 डिसेंबरपर्यत अर्ज सादर करावे अमरावती, दि. 14 : आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेमध्ये इ. 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देणे या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दर्जेदार नामाकिंत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांची सन 2021-22 करिता निवड करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नामाकिंत शाळांनी ऑनलाईन पध्दतीने https ://namankit.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31.डिसेंबर 2020 पर्यत अर्ज सादर करावे.        ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग   कार्यालयामार्फत नामाकिंत शाळांची तपासणी करून सचिव स्तरीय समितीस पात्र शाळांचे प्रस्ताव सादर करण्यात येतील. शाळा / संस्थानी ऑनलाईन अर्ज   दि. 9 ते दि. 31 डिसेंबर 2020 पर्यत सादर करावे. ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त सर्व शाळांची तपासणी दि. 1 जानेवारी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग, अमरावती अमरावती जिल्हा महामंडळ एक दृष्टीक्षेप

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग, अमरावती अमरावती जिल्हा महामंडळ एक दृष्टीक्षेप अमरावती विभागाची माहे डिसेबेंर -220- पर्यतची वाहतुक फलनिष्पती माहिती खालीलप्रमाणे अमरावती, दि. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतूकीसोबतच, महामंडळाच्या प्रवासी वाहनांमधून प्रवासी वाहनांमधून आवश्यक व इतर वस्तु नेण्यास महाराष्ट्र शासनाने मुजूरी दिली आहे. सदर अनुषंगाने तसेच महामंडळाच्या ठरावानुसार महामंडळाने दिनांक 21 मे, 2020 पासून मालवाहतूकीच्या व्यवसाय सुरूवात केलेली आहे. मालवाहतूक ही पुर्णत: सुरक्षितपणे करुन त्याचे वेळेवर वितरण केल्या जात आहे. सदरची सेवा ही 24 तास सुरू आहे.सदरील माल वाहतुकीचे दर अत्यंत माफक प्रमाणात असून मालवाहतूकीच्या सेवंचा लाभ शेतकरी, व्यापक ,लघु व मोठे कारखानदार तसेच शासकीय, निमशासकीय खात्यास देण्यात येत आहे. दि. 21 मे, 2020 पासून ते डिसेंबर 2020 पर्यत मालवाहतूक ट्रकव्दारे एकूण 1276 फेऱ्या चालविण्यात आल्या असून एकूण 193251 सार्थ कि.मी. झालेले आहे. प्रवासी वाहतूकीबाबत – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने दि.32/03/2020 पासून

कृषिपंप वीज धोरणातून कृषिक्षेत्राला नवसंजीवनी * एक हजार 349 सौर कृषीपंप स्थापित

  कृषिपंप वीज धोरणातून कृषिक्षेत्राला नवसंजीवनी * एक हजार 349 सौर कृषीपंप स्थापित अमरावती, दि. 11 : लघुदाब, उच्चदाब आणि सौर यंत्रणेद्वारे नवीन वीजजोडण्यांना गती देण्यात आली आहे. कृषिपंपांना दिवसा आठ तास वीजपुरवठा, तसेच थकबाकी वसुलीसाठी जुन्या देयकांची दुरुस्ती मोहिम राबवून व्याज आणि दंड माफ करून केवळ मूळ थकबाकी भरण्याची सवलत दिली जाणार आहे. तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीसह ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची योजना या कृषिपंप वीज धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या कृषिक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. नवीन कृषिपंपांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी लघुदाब, उच्चदाब आणि सौर यंत्रणेद्वारे कृषिपंप वीजजोडण्या देण्यात येतील. वीज खांबापासून २०० मीटपपर्यंत लघुदाब, २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस), तर ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांची वीजजोडणी सौर कृषिपंपाद्वारे देण्यात येणार आहे. नवीन कृषिपंपांना वीजखांबापासून सर्व्हीस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर तर २०० मीटरपर्

अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द; हरकती मागविल्या

  अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द; हरकती मागविल्या अमरावती, दि. 10 : जिल्हाधिकारी यांच्या कडून अर्ज सादर केलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आाली असून आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या आहेत.   दि. 1 जानेवारी, 2020 रोजीची (दि. 01.01.2018 ते दि. 01.01 2020) गट-क व गट-ड संवर्गात अर्ज सादर केलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादी nic.amravati.in या संकेत स्थळावर तसेच जिल्हा नाझर जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे नोटीस बोर्डवर, प्रसिध्द करण्यात आली असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबधित कार्यालय प्रमुख यांना पाठविण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवारांची (गट-क व गट-ड) तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादीवर आक्षेप/हरकती असल्यास संबधित कार्यालय प्रमुख यांचे मार्फत लेखी पुराव्यासह आक्षेप/हरकती प्रेसनोट प्रसिध्द झाल्यापासुन 15 दिवसाचे आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त आक्षेप/हरकतीचा विचार करण्यात येणार नाही असे पत्रकात नमुद आहे. 00000    

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

  शिक्षक मतदारसंघ निवडणुक बातमी शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज Ø   विलासनगरातील गोदामात मतमोजणी अमरावती, दि. 2 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी विलासनगरातील गोदामात होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची सुरवात सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. सुरवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येतील. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश

शिक्षक मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 68 टक्के मतदान

  शिक्षक मतदारसंघ निवडणुक बातमी शिक्षक मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 68 टक्के मतदान अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दि. 1 डिसेंबर मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 24 हजार 455 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदार आहेत. यात 26 हजार 60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री उमेदवार आहेत. यातील 17 हजार 913   पुरूष, तर 6 हजार 542 स्त्री अशा एकूण 24 हजार 455 मतदारांनी मतदान केले. अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 386 मतदारापैकी 4 हजार 876 पुरूष आणि 2 हजार 150 स्त्री अशा 7 हजार 26 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारापैकी 2 हजार 954 पुरूष आणि 1 हजार 491 स्त्री अशा 4 हजार 445 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदा