बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

 

अमरावती दि. 28 : द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होती.

त्यानुसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा शंभर हेक्टर क्षेत्राचा प्रकल्प प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता शासनाकडून 22 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार प्रायोगिक तत्वावर राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार महाडिबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

योजनेचा उद्देश :

गारपीट व अवकाळी पाऊस यापासुन द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा योजनेचा उद्देश आहे.

योजनेची व्याप्ती : द्राक्ष उत्पादक 8 जिल्हे - नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यात योजनेची व्याप्ती राहील.

मंजूर कार्यक्रम : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत रु.614.04 लाख (अक्षरी रु. सहा कोटी चौदा लाख चार हजार फक्त) रक्कमेच्या कार्यक्रमास मंजूरी असून क्षेत्र मर्यादा 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील. रु. 4 लाख 81 हजार 344 प्रती एकर खर्चाचे मापदंड असून रु.2 लाख 40 हजार 672 प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) अनुदान मर्यादा राहील.

नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

आवश्यक कागदपत्रे : 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा आदी कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्ययक राहील, असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

 

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती दि. 28 :  1 जून ते दि. 28 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्षात 675.4 मिमी  (दि. 28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) एवढा पाऊस पडलेला आहे. 

            खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि.28 ऑगस्ट 2023 अखेर प्रत्यक्षात 139.84 लाख हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. आज दि.28.08.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

राज्यामध्ये दि.25 जुलै-2023 ते आज दि.28.08.2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.

खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध होते.  त्यानुसार राज्यात 19,72,182 क्विंटल (102%) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत 57.57 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 36.48 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 21.09 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 1१ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   त्यापैकी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 हि पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून  जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त  श्रीसुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना केले आहे. 

००००० 

इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर

 

इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर

अमरावती दि. 29 :  जुन, 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवीच्या (उच्च प्राथमिक स्तर)  मुल्यमापनाचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) मंडळामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुल्यमापनामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा ! देण्यात आल्या आहेत. मुल्यमापन अहवालाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मुल्यमापनाची वैशिष्टये :

इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी ( उच्च प्राथमिक स्तर) साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन प्रक्रियेसाठी दि. 2 मे ते 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आली होती. इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मुल्यमापन दि. 20 जून ते 30 जून 2023 या कालावधीत घेण्यात आलीत.

सदर मुल्यमापनासाठी राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळामधून एकूण संपर्क केंद्रावर एकूण 90 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यातील विद्यार्थ्यांनी मूल्यमापनासाठी इयत्ता पाचवीची 22 मुले, 13 मुली अशी  एकुण 35 तर इयत्ता 8 वीसाठी 37 मुले, 14 मुली अशी एकुण 51 आवेदनपत्रे भरली होती. त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी 35 विद्यार्थी व इयत्ता आठवीसाठी 51 विद्यार्थी असे एकूण 86 विद्यार्थी प्रत्यक्ष मुल्यमापनासाठी प्रविष्ठ झाली होती. सदर विद्यार्थ्यांचे अंतिम मुल्यमापनानुसार इयत्ता पाचवीसाठी 35 विद्यार्थी व इयत्ता आठवी साठी 51 विद्यार्थ्यांनी अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केले असून त्याची टक्केवारी 100 टक्के आहे.

विषयांची संख्या :

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीकरिता सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठी विषयांची संख्या अनुक्रमे 11 व 26 होती. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता मुल्यमापनासाठी विषयांची संख्या अनुक्रमे 12 व 27 होती. दिव्यांग इयत्ता पाचवीसाठी 10 मुलं व 6 मुली 6 तसेच इयत्ता आठवीसाठी  15 मुले व 6 मुली विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार अनुषंगिक सर्व सवलती देण्यात आलेल्या आहेत.

निकालाची कार्यपध्दती :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या जुन, 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) च्या मूल्यमापनामध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर गुरूवार दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात आला असून उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थ्याला सदर माहितीची प्रिंट (Printout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता पाचवी/इयत्ता आठवी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल.

निकालाची सर्वसाधारण माहिती :

विभागीय मंडळनिहाय निकालाची माहिती इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) मूल्यमापन जून, 2023

अमरावती विभागीय मंडळ मुल्यमापनासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी 1 आहे. मूल्यमापनास प्रविष्ठ विद्यार्थी 1 आहे. अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त विद्यार्थी 1 आहे. टक्केवारी 100 आहे.

विभागीय मंडळनिहाय निकालाची माहिती इयत्ता आठवी (प्राथमिक स्तर) मूल्यमापन जून, 2023

अमरावती विभागी मंडळ मूल्यमापनासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी 2 आहे. मूल्यमापनास प्रविष्ठ विद्यार्थी 2 आहे. अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त विद्यार्थी 2 आहे तसेच टक्केवारी 100 आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ पुणे यांचेव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

0000

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती दि. 28 : फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.दहावी) च्या लेखी परीक्षांचा कालावधी शिक्षण मंडळाव्दारे जाहीर करण्यात आला आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार, दि. 21 फेब्रुवारी ते शनिवार, दि. 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. तसेच  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार दि. 01 मार्च ते शुक्रवार दि. 22 मार्च 2024 दरम्यान होणार आहे.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. 28 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शाळा/कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्यमंडळ पुण्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 

 

अमरावती, दि. 28: जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

        पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

•         पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

•         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल.

•         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

 

•         पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी  सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

•         पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

 

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)

२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

३) 7/12, 8-अ चा उतारा

४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

६) बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

 

 पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप-  सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम याप्रमाणे :  तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रूपये, दुसरे बक्षिस 3 तीन हजार रूपये, तिसरे बक्षिस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रूपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षिस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रूपये, दुसरे बक्षिस 40 हजार रूपये व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये याप्रमाणे वितरीत करण्यात येईल.

 

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

इयत्ता पाचवी व आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल जाहीर

इयत्ता पाचवी व आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल जाहीर

Ø  www.msbos.mh-ssc.ac.in

अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता 5 वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि. 20 जून  ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

त्याअनुषंगाने मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर आजरोजी गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांला सदर माहितीची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी/इयत्ता 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेचे प्र. सचिव माणिक बांगर प्रसिध्दी पत्रकाद्वारे यांनी कळविले आहे. 

0000000

 

 

 

  

विभागीय आयुक्तांकडून विविध विषयांचा आढावा, शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 






विभागीय आयुक्तांकडून विविध विषयांचा आढावा 

शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा

-         विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

              अमरावती, दि. 24 : शेतकरी व दिव्यांगाकरीता शासनाव्दारे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी व दिव्यांगांना देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेवून त्यांचे प्रलंबित प्रकरणे व समस्यांचा प्राधान्याने निपटारा कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, समाजकल्याण प्रादेशिक आयुक्त सुनिल वारे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मस्के यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

            डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, समाजकल्याण विभागाव्दारे दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच शेतकरी बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होण्याच्या संभावना लक्षात घेवून, पिक विमा, ई-पीक पाहणी, अतिवृष्टीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीची माहिती, पंचनामा प्रमाणपत्रे इत्यादी कामे तातडीने पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सोडवाव्यात. खरीप हंगामाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कृषी विभागाने कराव्यात. पिकांवर येणाऱ्या रोगासंदर्भात शेतकरी बांधवाना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. याकरीता ग्रामसेवक व कृषी सेवकांनी शेतकरी बांधवाच्या सतत संपर्कात रहावे. तसेच आत्म्हत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांचे प्रशासनाने सांत्वन करुन त्यांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून तातडीने मदत पोहोचवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            विभागामध्ये पावसाचे प्रमाण सद्यास्थितीत समाधानकारक असून संभाव्य पाणी टंचाई निर्माण झाल्यास पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे आतापासूनच नियोजन करावे. चारा उपलब्धेतेबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. वैरण व चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना करण्याच्या विभागीय आयुक्तांनी  संबंधित विभागाला सूचना दिल्या. याकरीता जिल्हा नियोजन समिती शासनाकडून प्राप्त निधीतून व विविध स्त्रोताच्या माध्यमातून पशुखाद्य उपलब्धतेसाठी नियोजन करावे. ई-चावडी मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने 100 टक्के काम पूर्ण करावे. याकरीता जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा. येत्या 10 सप्टेंबरपर्यंत ई-चावडी मोहिम पूर्ण होईल याकरीता नियोजन करावे. विभागातील पाचही जिल्ह्यातील जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, सर्वसाधारण पिक परिस्थितीबाबत नियोजन, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची वैधता पडताळणी प्रकरणे, राजीव गांधी प्रशासकीय गतीमान अभियान, जिल्हा विकास आराखडा आदी विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने कार्यालयातील दस्ताऐवज, रोखवही, गोषवारा, ताळमेळ इत्यादी कामांचे अद्यावतीकरण करावे. तसा स्थानिक स्तरावरुन लेखापरिक्षण करुन वेळोवेळी अहवाल सादर करण्याचे निर्देशही डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले.

0000000

 

--

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा

अमरावती, दि. 23 : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा गणेशोत्सव समितीचे सदस्य सचिव अभिजित मस्के यांनी केले आहे.

पुरस्काराकरीता आवश्यक बाबी :

पर्यावरणपुरक मुर्ती व सजावट(थर्माकोल, प्लॅस्टीक विरहीत), ध्वनीप्रदुषण रहीत वातावरण असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, इ. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट देखावा अथवा स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा असावा. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जाबद्दल जागरूकता निर्माण करणे, ॲम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इत्यादी सामाजिक कार्य. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्यादीबाबत केलेले कार्य. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, पांरपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, पांरपारिक अथवा देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तासाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा.पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता इत्यादी बाबीचा समावेश असलेल्या मंडळाचा पुस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

                      महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर स्पर्धा निवडीचा तपशील, निवडीच्या निकषांसमवेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर  ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000


धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य संस्थांकडून पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना

 

धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य संस्थांकडून

पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना

Ø  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Ø  31 ऑगस्ट अंतीम मूतद

 

अमरावती, दि. 23 :  धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा, अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत 2 लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

शासन मान्यता प्राप्त खाजगी शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/नगरपालिका/नगरपरिषद शाळा/ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विदयार्थी शिकत असणे आवश्यक आहे. अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने DIES Code, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी Institute Code तसेच अपंग शाळांनी Licence Code देणे आवश्यक आहे.

सदर योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय राहील.

शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे/अद्ययावतकरणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इनव्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने (Learning Material/एल.सी.डी.प्रोजेक्टर, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्ययावतकरणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृहउभारणे/डागडूजी करणे, झेरॉक्स मशीन, संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर आदी सुविधांसाठी अनुदान दिल्या जाईल.

इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी परिपूर्णरित्या

भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील नियोजन शाखेत दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे सौरभ कटियार जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

 शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

 

अमरावती, दि. 23 : अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत व दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा विस्तृत अहवाल तीन आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.

22 ऑगस्ट 2023 ला ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रासह विविध वृत्तपत्रातून ‘यवतमाळ जिल्ह्यात 17 दिवसांत 17 शेतकऱ्यांची आत्महत्या’ या शिर्षकाच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची तातडीची बैठक घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी जाऊन कुटंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. आशिया यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ मदत देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून गुरुवारी (ता. 24ऑगस्ट) बैठक होईल. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्यात येईल. तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत उपलब्ध करुन दिल्या जाईल. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात येईल. तसेच वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या बातमीचा अहवालही विभागीय आयुक्तांना लवकर सादर करण्यात येणार, अशी माहिती श्री. आशिया यांनी यावेळी दिली.

0000



मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

मोझरी आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित.

 मोझरी आयटीआय मध्ये

शिल्पनिदेशक पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित

ऑनलानईन अर्ज करण्यासाठी www.govtitimozari.org संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 22 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी या संस्थेत ‘शिल्पनिदेशक’ पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तत्वावर भरावयाची आहे. या पदभरतीबाबत सविस्तर तपशिल संस्थेच्या www.govtitimozari.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.     

इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावर भेट देऊन आवेदन अर्ज सादर करावे, असे संस्थेचे प्राचार्य अे. डी. वाळके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

“महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेचे यश!” 92 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

 

महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेचे यश!

92 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

अमरावती, दि. 17 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीनागपूर व सीआरजी अकादमी फॉर सस्केस पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्गविमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. लक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकसहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. याकरीता दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते.

प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. 1127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील 92 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकआवश्यक व अकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले.  मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्गविषयवार चर्चाप्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांमधे प्रियंका ठाकरे, परमेश्वर दासवैभव कापसेभुपेंद्र ढालेमहेश भांडेभावीका शिंदेअश्विनी वडे, उमेश पालवेरिना चव्हाणखुशवंत नांथेविशाल आदमनेअपेक्षा गावंडेविष्णू गोरेमनिषा तोरकडेविकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मा.ना.श्री. अतुल सावे मंत्रीइतर मागास बहुजन कल्याणसरकार तथा अध्यक्ष महाज्योतीनागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीनागपूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एमएच सेट उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्याचे मनोगत

माहाज्योतीमुळे आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले

                                                                                              - वैजनाथ भारत इडोळेआडोळीवाशीम

वृत्तपत्राच्या माध्यमातून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. सुचनेनुसार अर्ज करुन प्रशिक्षणास पुणे येथे पाठवण्यात आले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत महाज्योतीकडून विद्यावेतन देण्यात आले. विद्यावेतनाने पुण्यात राहण्याखाण्याचीशिक्षणाचीशैक्षणिक साहित्याची सोय करता आली. याआधारे सेट परीक्षा पास करता आली. आज मी कॉमर्स कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला लागलो. आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले. आम्हा सार्‍यांचे स्वप्न महाज्योतीमुळे संपुर्ण झाले.

महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शैक्षणीकआर्थिक मदत करत आहे

-         प्रणीता जावळे, जळगाव

मी रसायनशास्त्र हा विषय घेऊन सेट पास झालेले आहे. सेट मध्ये दोन पेपर असतात, एक कॉमन असतो आणि दुसरा विषयाचा पेपर  निवडायचा असतो. कॉलेजमधील शिक्षकांकडून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. मार्गदर्शन मिळाले. पुण्यातील प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन मिळाले. त्यामुळे पुण्यात राहण्याखाण्याचीअभ्यासाची सोय झाली. माझ्यासह माझ्यासारखे बरेच विद्यार्थी होते, जे महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेत होते. आणि ते सारेच खुप सामान्य घरातून आलेले होते. महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शैक्षणिकआर्थिक मदत करुन भविष्य घडवित आहे..

००००