पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग

  सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग   Ø    महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी      सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा Ø    अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप               अमरावती दि. 25 :  महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला विवेकी पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दिला. मनुष्याला विषमता ,  अंधश्रद्धा ,  अनिष्ट रूढी यापासून परावृत्त करून उच्च मुल्यांवर आधारित पर्यायी संस्कृती तयार करून दिली. जन्म ,  मृत्यू ,  विवाह अश्या सर्व संस्कारांचे विवेकीकरण करणे ,  निर्मिकाला सर्व लोक समान असल्याचा संदेश देणे हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा मिळत गेली ,  त्यामुळे आजही सत्यशोधक समाजाची तत्वे कालसुसंगत आहेत असे प्रतिपादन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले. महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे  “ आजच्या काळात सत्यशोधक समाजाचे महत्व ”   या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते ,  याव

‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ

  ‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ ·           16 ऑक्टोंबरपर्यंत विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन ·           विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी विशेष शिबिराचे आयोजन ·           नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन   अमरावती, दि. 25 :  राज्यात 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा महिना ’   राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासनाच्या विविध कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देणे तसेच योजनांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सेवा महिना ’ अंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सेवा महिन्यात एकूण 25 सेवांचा समावेश राहणार असून  त्याअंतर्गत आधारकार्ड व पॅनकार्ड अपडेशन, आधारकार्ड व पॅनकार्डची नवीन नोंदणी तसेच नवीन मतदार नोंदणी करणे आदी सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात येत्या बुधवारी (ता.27 सप्टेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा विभागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (सामान्य प्

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना   महाडीबीटी पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन                 अमरावती दि. 25 :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन  करणे हा घटक राबविण्यात येते. राज्यामध्ये ब-याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. याचे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.                   नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रू.40,000/- प्रति हे. ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत-जास्त रक्कम रु.20000/- प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20
  आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे                                                                                 -  अविश्यांत पंडा निपाणी येथे अमृत कलश यात्रा             अमरावती, दि.22 : 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत जिल्ह्यात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मातीविषयी प्रेम आणि  देशभक्तीच्या भावनेसोबतच गावाच्या शाश्वत विकासासाठी आरोग्य,पोषण, स्वच्छता या तीनही विषयावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.        ग्रामपंचायत पिंपरी निपाणी येथे 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. पंडा बोलत होते.  श्री. पंडा यांच्या हस्ते 'सर्वांसाठी घरे ' अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर असलेल्या भूमीहिन लाभार्थ्यांना इ वर्ग जमिनीमधील नमुना आठ मालकीपत्राचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले. सोबतच 'आयुषमान भारत' अंतर्गत गोल्डन कार्ड तर पोषण महासप्ताहाचे औचित्य साधत  गर्भवती महिला आणि
  ‘भगाडी’ तलावावर संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव आमंत्रित     अमरावती, दि. 21 :  अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील 500 हे. खालील पाटबंधारे-जलसंधारण विभागांतर्गत असणारा  ‘ भगाडी तलाव’ (96 हे.)  हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर 3 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार मच्छिमार संस्था नोंदणी करावयाची असल्यामुळे तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. त्यानुसार भगाडी तलाव (96 हे.) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी ही जाहिरात सूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसांच्या आत संस्था नोंदणीकरीता प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी जाहीर सूचनेव्दारे केले आहे. 00000

'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा - सहसंचालक प्रदिप घुले

इमेज
  'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न   आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा                   - सहसंचालक प्रदिप घुले   अमरावती, दि. 18 : प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आत्मसात केलेल्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदिप घुले यांनी आज केले.   माजी प्रशिक्षणार्थीनी एकत्र ऐवुन आपल्या संस्थेसाठी ॲल्युमिनी तयार क रुन संस्थेचा विकास करायला हवा. त्यांचे हे कार्य येणाऱ्या पीढीसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरणार, असा आशावादही श्री. घुले यांनी व्यक्त केला. रविवारी, (ता.17 सप्टेंबर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संस्था   स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमवारीत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व इतर ट्रेडच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. घुले अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सर्वप्रथम 

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ Ø   ऑनलॉईन नावनोंदणी अर्ज सादर करण्यासाठी   http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध Ø   30 सप्टेंबर अंतीम मुदत   अमरावती दि. 18 :   महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या तसेच जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.          दि. 16 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. दि. 18 सप्टेंबर ते   4 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे.   दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावे. इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रविष्ठ

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

  गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा   विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन               अमरावती ,   दि. १५ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा ,   असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.              या स्पर्धेसाठी मुंबई ,   मुंबई उपनगर ,   पुणे ,   ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे ,   द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे ,   तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव

दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ, फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

  दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी  मुदतवाढ फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत अमरावती, दि.15:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म नं. 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाई पध्दतीने भरण्यासाठी दि. 20 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. तसेच मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 हा कालावधी देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती एक छायाप्रत मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक

महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन

महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन   अमरावती दि. 13 : महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये   अद्यापपर्यंत शेतक-यांचे परीपुर्ण एकुण 3 हजार 225 अर्ज ऑनलाईनरित्या महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 741 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकुण 3 हजार 225 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 843 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रृटी आढळून आल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. सदर प्रकरणी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडुन अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रृटी पूर्ण करण्याकरीता भ्रमणध्वनीव्दारे/पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडुन त्रृटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. या अनुषंगाने अशा सर्व लाभार्थी   शेतकऱ्यांना   सुचित करण्यात येते की, आपण महाऊर्जा, विभागीय कार्यालयाला भेट देऊन किंवा दुरध्वनीवर क्र.0721-2661610 संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रृटींबाब

सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन

इमेज
  सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन अमरावती, दि. 7 :  राज्यात सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. या किडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर २० ते ६० दिवस या कालावधी मध्ये होतो. सोयाबीनचे खोड पोखरणारी ही महत्वाची किड आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे ३५ टक्के पर्यंत नुकसान होते. सोयाबीन व्यतिरिक्त मुग, उडीद, चवळी, तूर, भुईमुग, मिरची, कारली इ. पिकांना देखील चक्री भुंग्याच्या प्रादुर्भाव होतो. यावर नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते याप्रमाणे. किडींची ओळख             प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा ७ ते १० मि.मी. लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते व डोक्याच्या मागील बाजूस थोडी मोठी असते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये जवळपास ७८ अंडी घालते. नुकसानीचा प्रकार             प्रौढ भुंगा व अळी या दोन्ही अवस्था सोयाबीन पिकाचे नुकसान करतात. प्रौढ भुं

क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत पिक सरंक्षण सल्ला “एकात्मिक व्यवस्थापन -सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग”

इमेज
                                     क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत पिक सरंक्षण सल्ला “ एकात्मिक व्यवस्थापन  - सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग ”             सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत असून मावा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग  मुंगबीन यलो मोझॅक  या विषाणूमुळे उद्भवतो.  पांढरी माशी  ही किड या रोगाचा प्रसार करते. या रोगाचा विषाणू केवळ  कडधान्य  पिकांवर आढळून येतो. मुग ,  उडीद ,  वाल ,  चवळी ,  घेवडा इ. यजमान पिकांवर तो जिवंत राहू शकतो व सोयाबीन पिकावर संक्रमित होत राहतो.  यासाठी  सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाच्या  नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते याप्रमाणे. रोगाची लक्षणे :             सुरवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके /हलके चट्टे दिसतात.  कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडते.  हरितद्रव्याचा ऱ्हास झाल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होतात व आकार लहान होतो.