पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे                 अमरावती दि . 29 :   इयत्या 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्याना फेब्रुवारी/ मार्च 2020 या शैक्षणिक वर्षात खाजगी रित्या प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन नांव नोंदणी करण्यास   दिनांक 11 सप्टेंबर पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. दि. 27 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज सादर करावे. दि. 16 सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in ; http://form17.mh-hsc.ac.in ;या बेवसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत),नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो अर्जासोबत द्यावा. ऑनलाईन अर्ज सादर करतांना सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या
इमेज
जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागृत करण्यासाठी क्रिडा संकुलाची निर्मिती -           पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी आठ कोटी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा अमरावती, दि. 29 : ग्रामीण भागातील मुलांमध्ये विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कणखरता, निडरता व जिद्द आदी गुण असतात. त्यांच्यातील खेळगुणांना वाव देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे, असे कृषीमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले. येथील विद्यापीठ परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसळ, आमदार रवि राणा, जि.प.सदस्य संजय गुलाणे, नगरसेविका जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,अधिक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांचेसह क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्

अमरावती विभागात 55 तालुक्यात पाऊस !

अमरावती विभागात 55 तालुक्यात पाऊस ! अमरावती, दि. 27 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात   55 तालुक्यात पाऊस झाला. विभागातील तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 0.4 (536.5), भातकूली 2.3 (343.1), नांदगाव खंडेश्वर निरंक (502.2), चांदूर रेल्वे 0.2 (609.1), धामणगाव रेल्वे 6.5 (631.5), तिवसा 0.2 (490.4), मोर्शी 1.9 (518.2), वरुड 8.3 (558.7), अचलपूर 3.4 (580.9), चांदूर बाजार 1.0 (710.6), दर्यापूर 3.3 (477), अंजनगाव 0.8 (457.6), धारणी 28.4 (1067.9), चिखलदरा 19.8 (1381.2), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 5.5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 633.2 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 27 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 77.7 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 9.8 (470.8), बार्शी टाकळी 8.8 (596.4), अकोट 8.5 (624.7), तेल्हारा- 21 (582.4), बाळापूर 16.2 (560.4), पातूर 23.6 (559.1),मुर

अमरावती विभागात पावसाचे पुनरागमन!

अमरावती विभागात पावसाचे पुनरागमन! अमरावती, दि. 26 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात   53 तालुक्यात पाऊस झाला. विभागात चिखलदरा येथे नोंदला गेलेला सर्वाधिक पाऊस 74 मिलीमीटर असून विभागातील तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 12.7 (536.1), भातकूली 10.8 (340.8), नांदगाव खंडेश्वर 7.9 (502.2), चांदूर रेल्वे 4.8 (608.9), धामणगाव रेल्वे 15.3 (625), तिवसा 28.6 (490.2), मोर्शी 25.6 (516.3), वरुड 15.3 (550.4), अचलपूर 27.9 (577.5), चांदूर बाजार 39.1 (709.6), दर्यापूर 16.4 (473.7), अंजनगाव 17 (456.8), धारणी 36.3 (1039.5), चिखलदरा 74 (1361.4), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 23.7 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 627.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 26 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 77.1 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 8.3 (461), बार्शी टाकळी 6.6 (587.6), अकोट 15.4 (616.2)

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्‍ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्‍ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे अमरावती , दि . 23   : केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 साठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नविन मंजूरी व नूतनिकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम 31 आक्टोंबर, 2019 आहे. तरी सदर योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी   National Scholarship Portal वरील मार्गदर्शक सूचना व Frequently Asked Questions (FAQs)   वाचून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे डॉ. संजय जगताप, सहसंचालक उच्च, शिक्षण अमरावती विभाग यांनी कळविले आहे. ****

इयत्ता 12 वी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

इयत्ता 12 वी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती , दि . 23   : इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध आहेत. या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह सोमवार दि. 26 ऑगस्ट 2019 ते बुधवार दि. 4 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. फेब्रुवारी-मार्च 2020 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येत

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी अमरावती , दि . 22   : सध्याच्या हवामानातील बदलामुळे पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. किड रोगांच्या नियंत्राणासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करण्यात येते. किटकनाशकांच्या असुरक्षित हाताळणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये याकरीता किटनकनाशके हाताळतांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषिविभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. किटकनाशकांचा वापर सुरु करण्यापूर्वी लेबलमधील दिशनिर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यांचे अनुकरण करावे.त्यावरील चेतावणी आणि सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे. किटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. किटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दुर ठेवावीत. किटकनाशके नेहमी त्यांच्या मूळ डब्यात साठवावीत आणि कधीही ती खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये. किटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादीचा पुर्नवापर करु नये. फवारणी करीता गळक्या फवा

नागरी सेवा 2020 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे प्रेवश परीक्षा 6 ऑक्टोंबर रोजी

नागरी सेवा 2020 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे प्रेवश परीक्षा 6 ऑक्टोंबर रोजी अमरावती, दि. 20 :   केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-2020 मध्ये विनामुल्य पुर्व प्रशिक्षणाकरीता भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे प्रवेश परीक्षा फक्त अमरावती   केंद्रावर घेण्यात येत आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन   (Online ) पध्दतीने www.preiasamt.in   या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दि. 26 ऑगस्ट 2019 पासून होत असून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दि. 25 सप्टेंबर 2019 आहे. परिक्षेचे प्रवेश पत्र दि. 1 ऑक्टोंबर 2019 पर्यंत Online पध्दतीने उपलब्ध होतील ते 6 ऑक्टोंबर 2019, प्रवेश परीक्षा दि. 6 ऑक्टोंबर 2019 सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येईल. सविस्तर जाहिरात,परीक्षेचा अभ्यासक्रम Online अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सुचना संस्थेच्या www.preiasamt.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे डॉ. एम.पी.वाडेकर, संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांनी कळविले   आहे.

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत लोक संवाद मोहिम सुरु

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत लोक संवाद मोहिम सुरु अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र शासनाकडून राज्यात सुरु असलेल्या अटल महापणन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरु केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमातून सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या महिला बचत गट,शेतकरी व सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. जेणेकरुन सहकारी संस्थांना बळकटीकरणासाठी मदत होईल. महाराष्ट्रात अटल महापणन अभियानाअंतर्गत एकूण 3000 हजार पेक्षा जास्त विविध कार्यकारी संस्थानी व्यवसाय सुरु केले आहे. तर अमरावती विभागात अटल महापणन अंतर्गत एकूण 918 संस्थांची निवड करण्यात आली असून त्यापैकी 359 संस्थांनी नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु केले आहे. अनेक व्यवसाय सुरु होत आहेत. अमरावती विभागातील गावातील अनेक सेवा सहकारी व खरेदी विक्री संस्थानी नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु करुन ग्रामीण भागातील शेतकरी सभासंदाचा सर्वागीण विकास होत आहे. याकरीता सहकार विभागामार्फत लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,

प्रधानमंत्री किसान मानधन योजना- शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा

प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा अमरावती, दि. 16 : प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानवधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सव पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना दरमहा रक्कम रु. 3000/- ( तीन हजार) निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधना योजना ही ऐच्छिक व अशंदायी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी.) द्वारा (Managed) पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणीकरण्यासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नोंद

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे                                                    अमरावती, दि. 13 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत   स्विकारण्यात येणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत संपर्क केंद्र शाळा ही यादी विभागीय मंडळाकडे सादर करतील. अधिक माहितीसाठी या   http: //msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी असे डॉ. अशोक भोसले,सचिव महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले आहे. ****

विभागीय लोकशाही दिनात दहा प्रकरणे दाखल

इमेज
     विभागीय   लोकशाही   दिनात  दहा   प्रकरणे   दाखल ·           प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना अमरावती , दि .13 -  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले .  विभागातून लोकशाही दिनासाठी दहा प्रकरणे दाखल करण्यात आलीत .  दाखल प्रकरणांवर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. सिंह यांनी दिल्या .  विविध विभागाशी संबंधित असलेली प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस प्रलंबित न ठेवता तत्काळ निकाली काढावित तसेच केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावी ,  असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले . आज विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ दोन प्रकरणे, जि.प.यवतमाळ दोन प्रकरणे, न.प. यवतमाळचे एक प्रकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमचे एक प्रकरण, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचे दोन प्रकरण आणि भूमि अभिलेख कार्यालयाचे एक अशी नऊ प्रकरणे वैशाली पाथरे यांनी सादर केली. यातील 4

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण व उद्योजकता कार्यक्रम

इमेज
कम्युनिटी   डेव्हलपमेंट   थ्रु   पॉलीटेक्निक   योजनेअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण व उद्योजकता कार्यक्रम             अमरावती दि.9:  स्वयंरोजगारातून   स्वावलंबी   होण्याच्या   उद्देशाने   शासकीय   तंत्र   निकेतन   यांच्या   वतीने   कम्युनिटी   डेव्हलपमेंट   थ्रु   पॉलीटेक्निक   योजनेअंतर्गत   युवक   युवतींसाठी   तां त्रिक   कौशल्यावर   आधारीत   व्यवसाय   प्रशिक्षण   व   उद्योजकता   कार्यक्रमाचे   आयोजन   करण्यात   आले .  कार्यक्रमा च्या   अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य   प्रा . ए . व्ही . उदासी , प्रमुख अतिथी म्हणून योजनेचे समन्वयक प्रा.एस.जे.गायकवाड, बालकल्याण   समितीच्या   सचिव   डॉ . अंजली  कुथे, सहसचिव  श्रीमती  लुगेकर उपस्थित होते.            प्राचार्य   प्रा . ए . व्ही . उदासी यांनी   यावेळी   प्रशिक्षणातुन   रोजगार   कसा   निर्माण   करावा   व   यशस्वी   उद्योजक   कसे   व्हावे   याबाबत   मार्गदर्शन   केले .  डॉ . अंजली   कुथे   यांनी   स्वंयरोजगारा तू न   आर्थि ‍ क   उन्नती   कशी   साधावी   याबाबत   माहीती   दिली .  या   योजनेअंतर्ग

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे                                                    अमरावती, दि. 9 : खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 12 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. विद्यर्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज प्रिट करुन त्यांच्या अर्जावर दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात मूळ कागदपत्रासह व शुल्कासह दि. 26 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावयाचे आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे, नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांनी पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी असेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाची आहेत. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक                         202-25705208/25705207/25705271 वर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविल

सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनांचे लाभ द्यावेत - पियुष सिंह

सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनांचे लाभ द्यावेत                                                    - पियुष सिंह अमरावती, दि. 9 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शेतीशी निगडीत अन्य योजनांचे लाभ देण्यात यावेत, म्हणजे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्या दक्षता व नियंत्रण विभागस्तरीय समितीची बैठक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पियुष सिंह होते. विशेष पोलीस महानिरिक्षक मकरंद रानडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विभागात दाखल झालेले गुन्हे, गुन्ह्यांचा तपास आणि त्या संदर्भातील कारवाई, या प्रकरणातील अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेली मदत, रमाई घरकुल (आवास) योजना, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आलेली कामे, तसेच जिल्हा निधी मधून अपंगासाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झ

अमरावती विभागात दमदार पाऊस चिखलदरा,धारणी,चांदूर बाजार, मोर्शी, अकोट तालुक्यात अतिवृष्टी

अमरावती विभागात दमदार पाऊस चिखलदरा,धारणी,चांदूर बाजार, मोर्शी, अकोट तालुक्यात अतिवृष्टी अमरावती, दि. 9 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 52.5 (499.2), भातकूली 33.7 (314.7), नांदगाव खंडेश्वर 50.5 (451.2), चांदूर रेल्वे 61.9 (572.2), धामणगाव रेल्वे 59.3 (575.4), तिवसा 60.9 (429.8), मोर्शी 65.8 (432), वरुड 52.4 (443.8), अचलपूर 58.9 (510), चांदूर बाजार 83.9 (585.5), दर्यापूर 51.6 (435.8), अंजनगाव 61.7 (415.6), धारणी 101.6 (887.9), चिखलदरा 114.6 (1061.5), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 65 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 543.9 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 9 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 111.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 66.8 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 52.8 (422.5), बार्शी टाकळी 47.6 (529.5), अकोट 87