पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना Ø   सोयाबीनवरील खोडमाशी, चक्रभुंगा व उंट अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रमाणित औषधांची फवारणी करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन अमरावती , दि .31 :   सध्या अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात जाऊन किडीचे सर्व्हेक्षण करुन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. खोडमाशी किडीमुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत शेंड्याकडील तीन पाने पिवळी पडलेले दिसतात किंवा पाने वाळलेले किंवा सुकलेले दिसतात. तसेच चक्रभुंगा किडीमुळे सोयाबीन झाडाचा शेंडा किंवा एखादी फांदी सुरुवातीला सुकलेली किंवा झुकलेली दिसते व त्या फांदीवर, खोडावर किंवा देठावर दोन चक्रकाप आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिंवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात व नंतर पानावर गोल अनेक छिद्रे आढळून येतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास किडी

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

इमेज
शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार -           गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी अमरावती , दि .30 :   ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते. असे महत्वपूर्ण काम करीत असतांना त्यांच्या कौटुंबीक व वैयक्तीक प्रश्न सोडवून मनोबल वाढविणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्र मानव विकासाचं केंद्र ठरण्यासाठी शिक्षकांचे सर्वच प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, शिक्षण उपसंचालक श्री. काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके, व्यवसाय शिक्षणाधिकारी, भाजपा पदाधिकारी दिनेश सुर्यवंशी, शिक्षण विभागाचे श्री. बोलके, श्री रोडे आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या गाऱ्हाणी व तक्रारीं

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व उपाययोजना प्रशिक्षण संपन्न

इमेज
गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व उपाययोजना प्रशिक्षण संपन्न अमरावती ,  दि .30 :  विदर्भ शेतकरी कृषिमाल प्रक्रिया उद्योग कंपनी शिरजगाव कसबा येथे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाययोजना तसेच किटकनाशक हाताळणे या विषयावर एक दिवसीय प्रशिषण 25 जुलै, 2018 शनिवारी संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनोहरराव सुने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक किरण बुधवत, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शितल उके, तालुका कृषी अधिकारी चादुर बाजार व मंडळ कृषी अधिकारी संतोष वाघमारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनुप देशमुख यांनी केले. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाय योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक किरण बुधवत श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांनी केले. तसेच श्रीमती सितल उके तालुका कृषि अधिकारी चांदुर बाजार यांनी विविध योजनांची माहिती दिली. संतोष वाघमारे मंडळ कृषि अधिकारी यांनी किटक नाशक कशी हाताळणी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ कुऱ्हाडे यांनी केले व आभार प्रदर्शन अशोकराव राऊत यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास बहुसंख्येने शेतकरी
इमेज
उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करुन उपाययोजना करावी                                                                                                             - पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील * पीक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आदेश अमरावती, दि. 2 : संपूर्ण जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषि विभागाने करावी, शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता नसल्यास तात्काळ उपाययोजन करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी यांनी दिले. जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.   बैठकीत पालकमंत्री श्री. पोटे यांनी बियाण्यांची   बीज प्रमाणिकरणाच्या माहितीच्या आधारे नोंद घ्यावी. अशा शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे पुरवावे. बियाणे उगविली नसल्यास दुबार पेरणीची संधी घेता यावी, यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश कृषी विभागाला दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,   जिल्हा अधिक्षक क