पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

इमेज
  स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा                  मुंबई ,   दि.   31   : प्रदूषण कमी करण्यासाठी   पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल ,   असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.                मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज   ‘ स्वच्छ माझा महाराष्ट्र ’   या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,   आमदार सदा सरवणकर ,   माजी आमदार राज पुरोहित ,   उद्योगपती नादीर गोदरेज ,   मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल ,   अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे ,   डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.   महास्वच्छता अभियान राज्यभर                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ,   ठाणे महापालिकेच्या कार्यक्

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

इमेज
  शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी -          केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Ø   कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वा जयंती उत्सव Ø   खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून रहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमुर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अन

विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा

इमेज
  विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा अमरावती, दि. 26 : ‘वीर बाल दिवस’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस "वीर बाल दिवस" म्हणून साजरा केला जातो.   साहिबजादा जोरावर सिंगजी आणि साहिबजादा फतेह सिंगजी हे दोघेही 9 वर्षे आणि 7 वर्षांचे असतांना दोघांना सन 1705 मध्ये मुघलांनी भिंतीत जिवंत गाढले होते.   या दोन लहान मुलांना मोगलांनी दोन मोठ्या भावांसह मारले. गुरू गोविंद सिंग जी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श म्हणून दरवर्षी या दिवशी अन्यायाविरुद्ध त्यांच्या प्रतिकारशक्तीचे स्मरण केले जाते. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून दरवर्षी 26 डिसें

लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

इमेज
  लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा                           - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय   अमरावती, दि. 15 :  लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले. लोणार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीद्वारे आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य एस सान्याल, दिपक ठाकरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, उपसंचालक (नियोजन) हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थ

मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा

इमेज
  मतदार   यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024 मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा   ·           ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन   ·           व्होटर हेल्पलाईन ॲप व  voters.eci.gov.in   व   ceo. maharashtra.gov.in   संकेतस्थळ वापरा                 अमरावती, दि. 14 :  भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी आज अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.             जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, रणजित भोस