पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
उन्नत भारत अभियान : ग्रामीण व शहरी भागातील विकासात महत्वाची भुमिका                          - जिल्हाधिकारी किरण गित्ते * www.visionamravati.in संकेतस्थळाचे उद्घाटन * स्मार्ट अमरावती, डिजीटल अमरावती साठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी         अमरावती , दि. 22 (विमाका)   : ग्रामीण व शहरी भागातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास साधावयाचा असल्यास तंत्रज्ञानावर आधारित विकास हा महत्वपूर्ण ठरतो. यासाठी उन्नत भारत अभियानाच्या धर्तीवर उन्नत महाराष्ट्र अभियान जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका निभावणार, असा विश्वास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केला.             येथील टॉऊन हॉल येथे अमरावती महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिजन अमरावती 2017 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शिंगाडे, राज्य प्रकल्प युनिटच्या सल्लागार डॉ. अर्चना बारब्दे, सभापती सुनील काळे व कृषी व सामाजिक
इमेज
सर्वच गरीबांना हक्काची घरे                              -पालकमंत्री प्रविण पोटे v   उद्दिष्टपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा v   धडक सिंचन विहिरीव्दारे प्रभावी सिंचनाची सोय v   अनुकंपाधारकांना नियुक्ती         अमरावती , दि. 21 (विमाका)   : राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना तसेच म्हाडामार्फत विकसीत करण्यात येत असलेली संकुल आदी योजना राज्य शासनाव्दारे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित शासकीय विभागांनी उद्दि ष्टपूर्ण होईल अशारितेने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात घरकुल योजना, धडक सिंचन विहिरी, अनुकंपाधारकांना नियुक्ती याविषयाबाबत श्री पोटे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत  होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हाधिकारी ष्णमुखराजन एन., उपजिल्हाधिकारी श्री काळे यांचेसह शासकीय वि
इमेज
पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा दिंडी व रॅलीने शुभारंभ * सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दाखविली हिरवी झेंडी * व्यसनमुक्तीच्या ज्वलंत संदेशांनी लोकांचे प्रबोधन *व्यसने सोडा मानसे जोडा, व्यसन विनाशाचे प्रतिक             अमरावती , दि. 1 9 (विमाका)   : देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा व्यसनमुक्तीचे संदेश असलेल्या दिंडी व रॅलीने आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे आयोजित दिंडी व रॅलीला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला.             यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते, सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे, डॉ. गणेश बुब यांचेसह शाळा व महाविद्यालयाचे विद
इमेज
आत्मविश्वास व कणखरवृत्तीने स्त्रिया व्यसनमुक्त समाज घडवू शकतात -पारूमिता गोस्वामी          अमरावती , दि. 1 9 (विमाका)   : व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्या नवऱ्यामुळे स्त्रीया सर्वात जास्त प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराला  बळी पडतात. कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या महिलेल्या शिरावर येतात. व घरातील व्यसनाधिन व्यक्तीच्या आत्यंतिक व्यसनामुळे त्या कुटुंबावर घातक परिणाम होतो.  तेव्हा आत्मविश्वास, कणखरवृत्तीने व न डगमगता  परिस्थितीला तोंड देवून स्त्रीया व्यसनमुक्त कुटुंब व समाज  घडवू शकतात. असा विश्वास पारूमिता गोस्वामी यांनी स्त्रीयांना दिला.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातील ‘व्यसनाधिनता व महिलांचा लढा’  या विषयावरील प्रथम चर्चासत्रात   त्या बोलत होत्या. आजच्या या चर्चासत्रात श्रीमती प्रफुल्ला मोहिते  व श्रीमती मुक्ताताई पुणतांबेकर सहभागी झाल्या होत्या.                  पुढे बोलतांना पारूमिता गोस्वामी यांनी व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची विदारक उदाहरणे दिली.  कुटुंबाची हानी होत असतांना स्त्रीय