पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर / नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा   -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि 30 : डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे   आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आज डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर,   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते.        प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे आणि

दहावी, बारावीचे विद्यार्थी विलंब शुल्काने पुरवणी परिक्षेची आवेदनपत्र प्राप्त करु शकतील

                                                   दहावी, बारावीचे विद्यार्थी विलंब शुल्काने पुरवणी परिक्षेची आवेदनपत्र प्राप्त करु शकतील   अमरावती, दि. 26 : शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्रे अतिविलंब/ विशेष अतिविलंब/ अतिविशेष अतिविलंब शुल्काने प्राप्त करुन घेता येणार आहे. इयत्ता दहावी व बारावी करीता अतिविलंब शुल्क भरण्याची अंतिम मुदत 27 ऑगस्ट,  विशेष अतिविलंब शुल्क भरण्याची 1 सप्टेंबर आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2021 निश्चित करण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कानंतरही अतिविलंब शुल्काची आवेदनपत्रे ही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने या www.maahsscboard,in संकेतस्थळावर भरुन त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची प्रत जमा करण्याच्या दिवसांपर्यत शुल्क मंडळात जमा करणे आवश्यक आहे. शुल्क प्राप्त झाल्यानंतरच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. सन 2021 च्या मुख्य परीक्षेसाठ

अमरावती जिल्हयातील चंद्रभागा प्रकल्पात 72 टक्के पाणीसाठा

  अमरावती जिल्हयातील चंद्रभागा प्रकल्पात 72 टक्के पाणीसाठा अमरावती, दि. 24 : अमरावती जिल्हयात उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प असून शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन आणि पंढरी हे पाच मध्यम प्रकल्प आहेत. उर्ध्व वर्धा प्रकल्पात आजपर्यंतचा 300.89 दलघमी पाणीसाठयाची नोंद झाली असून टक्केवारी 43.34 आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात 29.63 दलघमी पाणीसाठयाची नोंद करण्यात आली असून प्रकल्पातील पाण्याची टक्केवारी 71.83 आहे. शहानूर प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा 61.10 टक्के असून चंद्रभागा प्रकल्पात 71.83 टक्के, पूर्णा मध्यम प्रकल्पात 61.80 टक्के, सपन प्रकल्पात 67.20 टक्के आणि पंढरी मध्यम प्रकल्पात 8.28 टक्के उपयुक्त पाणीसाठयाची नोंद झाली आहे.       उर्ध्व वर्धा प्रकल्पात आजपर्यंतची जल संचय पातळी 342.50 मी. असून प्रकल्पात संकल्पीय पाणीसाठा 564 दलघमी आहे. प्रकल्पातील आजची जलपातळी 339.11 मी. एवढी आहे. मध्यम प्रकल्पातील शहानूर येथे पूर्ण संचय पातळी 449.50 मी. असून आजची जलाशय पातळी 442 मी. आहे. चंद्रभागा प्रकल्पात पाण्याची पूर्ण संचय पातळी 506.20 मी. असून जलाशय पातळी 402.25 मी आहे. पूर्णा प्रकल्पाची जल संचय प

ई-पिक पाहणीला सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

इमेज
  ई-पिक पाहणीला सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे -          महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Ø   कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सजग राहावे Ø   महसुली परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करावी Ø   गौन खनिज लिलावाची प्रक्रिया वेळत करावी अमरावती, दि. 20 : शासनाने राज्यातील पिकांच्या संदर्भासाठी ई-पिक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व पिकांची स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरित्या उपलब्ध होण्यास मदत मिळेल. ही पिक पाहणी अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देण्यात येणाऱ्या मदत, नुकसान भरपाईसाठीही मदतीची ठरणार आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे गतीने राबवावी, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देऊन शेतकऱ्यांनीही पुढाकार घेऊन स्वत:च्या पिकांची स्थिती नोंदविण्याचे आवाहन केले. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्याक्ष बबलू देशमुख, आमदार किरण सरनाईक, बळवंत वानखेडे, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्

श्रीक्षेत्र धारगड व जटाशंकर यात्रा रद्द

  श्रीक्षेत्र धारगड व जटाशंकर यात्रा रद्द            अमरावती, दि. 18: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या   जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, पुजा करावयाची ठिकाणे बंद राहतील. सालाबादप्रमाणे होणारी श्री क्षेत्र धारगड येथे श्रावण महीन्यानिमित्त होणारी यात्रा व जटाशंकर तथा मांगेरी महादेव मंदीर दर्शन रद्द करण्यात आले आहे.             चिखलदरा तालुक्यातील मौजा धारगड येथील प्राचीन शिव मंदीर परिसरात श्रावण महीन्यातील यात्रा यावर्षी रद्द करण्यात येत आहे. नागरिकांनी जंगलामध्ये अवैधरित्या प्रवेश करु नये व प्रशासनास सहकार्य करावे. जंगलामध्ये कोणीही अवैधरित्या प्रवेश करत असेल तर त्याच्या जिवीताची जबाबदारी संबधितावर राहील व त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यादरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे असे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्

परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

                                                 - परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे     अमरावती, दि. 18: राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे यासाठी सन 2021-22 या वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिनांक 25 ऑगस्ट  पर्यत सादर करावे. विद्यार्थ्यांना विहीत अर्जाचा नमुना कार्यालयीन वेळेत विनामुल्य प्राप्त होईल.              विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेवून, परिपुर्ण माहिती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतीसह सादर करावे. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, धारणी तसेच अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर उपलब्ध असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वा

*20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागणार

  *20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागणार   अमरावती, दि. 10 : भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील (आयआयएचटी) सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरिता राज्यातील युवकांना संधी आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी युवकांना 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे. भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील यावर्षीच्या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13, तर वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.   प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्जाचा नमुना सर्व वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्यालयात

रिक्त पदांच्या निवड यादी संदर्भात आक्षेप 11 ऑगस्ट पर्यंत लेखी कळवावे

                             रिक्त पदांच्या निवड यादी संदर्भात आक्षेप                               11 ऑगस्ट पर्यंत लेखी कळवावे अमरावती, दि. 9 : जिल्हा हिवताप कार्यालया अंतर्गत कार्यक्षेत्रातील गट-क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. शासन धोरणानुसार रिक्त पदाच्या 50 टक्केच्या अनुषंगाने जाहिरातीत नमुद करण्यात आलेल्या पदाची लेखी परिक्षा दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली. या लेखी परिक्षेचा अंतिम निकाल दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी www.aroga.maharashtra.gov या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व जिल्हा हिवताप कार्यालयातील सुचना फलकावर पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिध्दी करण्यात आली आहे. निवड यादीसंदर्भात आक्षेप असल्यास दि 11 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यत कार्यालयात लेखी कळवावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोशी यांनी कळविले आहे.   000000

एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन Ø    प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत Ø    संकेतस्थळावर माहिती अपलोड करावी अमरावती, दि. 5  : अमरावती विभागातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या चार एकलव्य निवासी शाळांमध्ये सन 2021-22 शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या शाळा प्रवेशासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन आदिवासी विभागातर्फे करण्यात आले आहे. अमरावती विभागातील 4 एकलव्य शाळांमधील सहावीसाठी मुले 120, मुली 120 सातवी मुले 37 मुली 38, आठवीमध्ये मुले 18, मुली 10, नववीमध्ये मुली 4 याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. अपर आयुक्त, आदिवासी विकास यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्रामधील 12 जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नग

नविन परीक्षा केंद्राच्या मागणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

  नविन परीक्षा केंद्राच्या मागणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे                                   अमरावती , दि .5: इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेसाठी फेब्रुवारी/मार्च 2022 करीता नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे. दि. 31 ऑगस्ट   नंतर नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव, निलीमा टाके यांनी कळविले आहे.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

  इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध                      अमरावती , दि .2:   माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी इयता बारावीची परीक्षा कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे   रद्द करण्यात आली. तत्पूर्वी सन 2021 परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दि. 3 एप्रिल 2021 रोजी ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्याना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करुन दिले असून काही विद्यार्थ्याना त्यांचे बैठक क्रमांक अवगत किंवा उपलब्ध झालेले नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या https:/mh-hsc.ac.in   या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. याबाबत मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन अशा विद्यार्थ्यानी आपले बैठक क्रमांक उपलब्ध करुन घ्यावेत, असे अमरावती विभागीय मंडळाचे वरीष्ठ अधिक्षक किन्नाके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000