पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर

इमेज
  वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते   धनादेशाचे वाटप शासन खंबीरपणे आपद्ग्रस्तांच्या पाठीशी                                                                     - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर अमरावती, दि. ३१: नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे   नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला.             जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ व    अतिवृष्टीमुळे   नागरिकांच्या घरांची पडझड व नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराच्या   नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. त्या संबंधातील तिवसा व भातकुली तालुक्यातील   नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते   करण्यात आले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

  प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा   शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती, दि. 29 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 ते पुढील तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. वातावरणातील आर्द्रता, गारपीट, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या    नुकसानीपासून विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपात   केली आहे. विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबिया बहारातील विविध पिकांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, केळी, पपई.   बुलडाणा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, व आंबा. यवतमाळ जिल्ह्यात संत्रा व केळी.   वाशिम जिल्ह्यात संत्रा, डाळिंब, पपई व आंबा आणि अकोला जिल्ह्यात संत्रा, मोसंब

सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी - विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम

इमेज
सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी -                    विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम नागरी सुविधा प्राधान्याने सोडवाव्या   अमरावती, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निम्म पेढी प्रकल्पा अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही आणि संयुक्त मोजणीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत येणाऱ्या समस्या जिल्हा परिषद, सिंचन विभाग व महसूल विभागाने समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने सोडवाव्या. पुनर्वसन झालेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या असे निर्देश विशेष कार्यकारी अधिकारी (जलसंपदा) विजयकुमार गौतम यांनी संबंधीत अधिकाऱ्याना दिले. विभागातील सिंचन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज बैठक आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियुष सिंह, अपर जिल्हाधिकारी रामदास सिंध्दभटी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र फुलझेले, मुख्य अभियंता रश्मी देशमुख, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, अमरावती पुनर्वसन विभागाचे सुभाष दळवी, यवतमाळचे पुनवर्सन विभागाचे  अ
इमेज
*_विविध पोलीस इमारतींच्या लोकार्पणासह ८३ गावे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन_* *पोलीसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ* - *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* * पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यास प्राधान्य  *पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही * परतवाडा पोलिस ठाण्याला आवश्यक निधी देऊ अमरावती, दि. २१ : जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसाप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे विविध निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलिस वसाहत, चांदूरबाजार पोलिस ठाणे, शिरजगाव कसबा, पथ्रोट येथील नवीन पोलिस इमारती आणि पोलिस ठाणे, आसेगाव येथील पोलिस वसाहतींचा उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच अचलपूर

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना

इमेज
  पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना अमरावती, दि. 21 : देशात शांतता तसेच कायदा वा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिस करतात. देशाच्या रक्षणासाठी लढतांना गत वर्षभरात कर्तव्य बजावत असतांना हौतात्म पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांना आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात आयोजीत विशेष कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. गत वर्षात देशातील सर्व राज्यात पोलीस दलातील 377 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. यावेळी त्या सर्वांचे स्मरण करुन   त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहिद पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांच्या पत्नी श्रीमती विजयालक्ष्मी चौगुले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, पोलीस आयुक्त अविनाश बारगळ, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, लक्ष्मण डुमरे, पूनम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.                                  फैरी झाडून मानवंदना मैदानातील शहीद स्मृतीस्तंभास प्रथम श्रीमती चौगुले यांनी पुष्पचक्र अर

विभागीय आयुक्त कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

                                         विभागीय आयुक्त कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन   अमरावती, दि. 20 : 'रामायणा'चे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.   00000    

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त सीआरपीएफच्या सायकल रॅलीचे पालकमंत्र्यांकडून स्वागत

इमेज
  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ’ निमित्त   सीआरपीएफच्या सायकल रॅलीचे पालकमंत्र्यांकडून स्वागत   अमरावती, दि. 18 : ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजीत एकतेचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला शुभेच्छा देऊन आपण रॅलीत सहभागी जवानांचे मनोबल वाढवू. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या ह्या रॅलीमुळे सर्वत्र सकारात्मक उर्जेचा संचार होणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत करतांना जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त   (31 ऑक्टोबर) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आज अमरावती येथील राजकमल चौकात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी या रॅलीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. रॅलीचे नेतृत्व केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट डॉ.चेतन शेलोटकर करत असून, रॅलीत राहुल भसारकर, सेकंड कमांडर मुकेश कुमार, कमांडर संजय बमोला, मुख्य वैद्यकीय अधिकारी

रस्ता दुरूस्ती,सुधारणांची कामे गतीने पूर्ण करावी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

इमेज
  रस्ता दुरूस्ती,सुधारणांची कामे गतीने पूर्ण करावी                    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर                               67 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन   अमरावती, दि. 18 :जिल्ह्याच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. दळणवळण व वाहतूकीच्या दृष्टीने दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात यावी व प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत कॅम्प शॉर्ट मार्गावरील पंचवटी चौक ते राजपूत ढाबा चौकापर्यंतचे कॉक्रिंटीकरणाचे सुमारे 62 कोटी रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन व अमरावती-बडनेरा मार्गावरील हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौक येथील रस्त्याची दुरूस्ती व सुधारणाचे अंदाजे 5 कोटी रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. भूमिपूजन समारंभाला खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखेडे, महानगर पालिका विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव देशमुख, विलास इंगो

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास 20 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ/दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परिक्षा देण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

                             विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 व नुतणीकरणाचे अर्ज सादर करावे महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास   20 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ     अमरावती, दि. 12 : सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जातीसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विजाभजसाठी मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी, इमावसाठी राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व विमाप्र प्रवर्गासाठी व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. या योजनेकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2020-21 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता योजनांचे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच सन 2019-20 या वर्षातील नूतनीकरणाचे अर्ज नव्याने सादर (Re-Apply) करण्याकरीता सुध्दा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संस्था व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला 20 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी https:// mahadbtm

11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

  11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन                 अमरावती दि. 8 : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी   दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात सोमवार दि. 11 ऑक्टोबर   रोजी सकाळी 11 वाजता   विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागीय लोकशाही दिनामध्ये स्वीकृत अर्ज असणाऱ्या अर्जदारांनी उपस्थित राहावे. लोकशाही दिनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.   00000    

कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा - कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

इमेज
  कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या   कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा -           कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश अमरावती, दि. 07 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कामगारांचे होणारे अनियमीत वेतन, वेतनातून कपात करण्यात येणारी रकम आणि कामगारांची नियमबाह्य करण्यात येणारी वेतन कपात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कामगारांच्या वेतनातून कपात झाली असल्याचे आढळून आले आहे. वेतनासाठी कामगारांना अतिरिक्त व जादा रकमेची मागणी कंत्राटदार करत असतील, तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही. वेतनासाठी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे निर्देश   कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी कामगार विभागाला दिले. येथील शासकीय विश्रामगृहात कामगारांच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अधिक्षक अभियंता दिलीव खालंदे, कामगार आयुक्त श्रीकांत महाले, कामगार उपायुक्त नितीन पाटणकर,   जिल्हा कामगार अधिकारी राहूल काळे, कामगार अधिकारी श्री. देठे   यांच्यासह इतर अधिकारी