पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावती विभागात नवे 1263 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 1263 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 27 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1263 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 460 , अकोला येथे 123 , यवतमाळ 288 , बुलडाणा 243 व वाशिम येथे   149 असे एकूण 1263 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००

इयत्ता बारावीच्या परीक्षेतील वेळापत्रकात बदल विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे मंडळाचे आवाहन

                     इयत्ता बारावीच्या परीक्षेतील वेळापत्रकात बदल                     विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे मंडळाचे आवाहन     अमरावती, दि. 21 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा दि. 4 ते   30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावी परीक्षेतील अर्धमागधी (विषय सांकेतांक 16) या विषयासह अन्य विषयांची परीक्षा   दि. 7 मार्च 2022 रोजी दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि या विषयांपैकी फक्त अर्धमागधी या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.    अर्धमागधी या विषयाची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार दि. 8 मार्च 2022 रोजी दुपारच्या सत्रात 3 ते 6.30 वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. अर्धमागधी या विषयाव्यतिरीक्त परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रक

अमरावती विभागात नवे 1838 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 1838 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 21 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1838 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 525 , अकोला येथे 397 , यवतमाळ 368 , बुलडाणा 393 व वाशिम येथे   155 असे एकूण 1838 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००    

अमरावती विभागात नवे 1820 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 1820 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 20 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1820 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 470 , अकोला येथे 469 , यवतमाळ 358 , बुलडाणा 354 व वाशिम येथे   169 असे एकूण 1820 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००                

पंडीत दीनद्याल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे

                   पंडीत दीनद्याल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी                                31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे अमरावती दि. 20 :- वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वंयम योजनेच्या धर्तीवर स्वंतत्र योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील असे विद्यार्थी ज्यांना इयत्ता 12 वी नंतर तंत्रशिक्षण तसेच व्यवस्थायिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला परंतू शासकीय वसतीगृहामध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि 31 जानेवारीपर्यंत आपले अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करावे, असे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करावे. या योजनेअंतर्गत शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश

लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही कोरोना त्रिसुत्रीचे पालन गांभिर्याने करावे

        लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही कोरोना त्रिसुत्रीचे पालन गांभिर्याने करावे                                                                   -कर्नल विश्वास काळे                                                 माजी सैनिकांनी घेतली कोरोना लसीची वर्धक मात्रा अमरावती दि. 20:-   कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या दोन मात्रेनंतर वर्धक मात्रा घेणेही आवश्यक आहे. लसीकरण झाले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. ज्यांनी अद्याप लसीकरण करुन घेतले नाही त्यांना आपण लसीकरणाचे महत्त्व पटवुन द्यायला हवे. लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधीत नियमांचे, त्रिसुत्रीचे पालन गांभीर्याने करावे, असे आवाहन कर्नल विश्वास काळे यांनी केले. शहरातील इसीएचएस पॉलीक्लिनीक येथे माजी सैनिकांसाठी नुकतेच लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या बुस्टर मात्रा या लसीकरण शिबीरात माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आल्या.   यावेळी कर्नल विश्वास काळे (सेवानिवृत्त) यांच्यासह Echs प्रभारी अधिकारी कर्नल राम दयाल गोडे, वैद्यकीय अधिकारी कर्नल डॉ. शैलेश

राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे कार्यालय अमरावती येथे डिसेंबर 2021 पासून कार्यरत

  राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे कार्यालय अमरावती येथे डिसेंबर 2021 पासून कार्यरत आयोगाचा वार्षिक अहवाल आपले सरकार पोर्टलवर प्रसिद्ध     अमरावती दि. 19:- राज्यातील पात्र व्यक्तींना (नागरिकांना) पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता "महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-२०१५" हा दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी शासनाने अंमलात आणला आहे. अमरावती येथे लोक सेवा हक्क आयोगाचे कार्यालय डिसेंबर 2021 पासुन सुरु या अधिनियमाचे प्रभावी अंमलबजावणी करिता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून मुख्य आयुक्तांचे कार्यालय, मुंबई येथे व प्रत्येक महसूली विभागाकरिता आयुक्ताचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. अमरावती महसूल विभागाकरिता श्री. रामबाबू नरुकुल्ला, यांची राज्य लोक सेवा हक्क आयुक्त म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाचे कार्यालय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय येथे दि. ०६ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम हे जिल्हे समाविष्ट आहेत. नागरिकांच्या विविध प्रश्नांचे उत्तर “ आपले सरकार ” पो

अमरावती विभागात नवे 1528 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 1528 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 19 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1528 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 438 , अकोला येथे 398 , यवतमाळ 200 , बुलडाणा 375 व वाशिम येथे   117 असे एकूण 1528 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००

पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर आवश्यक - जिल्हाधिकारी पवनीत कौर

  पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर आवश्यक -          जिल्हाधिकारी पवनीत कौर               अमरावती, दि. 18 : प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरण संवर्धन साधले जावे, या हेतूने पुनर्वापराच्या शक्यता पडताळणे आवश्यक असते. स्थानिक स्तरावरही प्लास्टिक पुनर्वापराचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले. येथील औद्योगिक वसाहतीतील रि-बेल प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली व प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रिया समजावून घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पात कच-यातून गोळा होणारे प्लास्टिक एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून अनेक उपयुक्त वस्तूंची निर्मिती करता येते. टाकाऊ प्लास्टिक कच-यात जाण्याऐवजी पुनर्वापरात येत असल्याने कचरा कमी होऊन प्रदूषणही टळते. अशा प्रकल्पाच्या अनुषंगाने महापालिका व इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्यवाही करता येईल. तसे प्रयत्न व्ह

अमरावती विभागात नवे 1002 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 1002 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 18 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1002 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 263 , अकोला येथे 367 , यवतमाळ 75 , बुलडाणा 265 व वाशिम येथे   32 असे एकूण 1002 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध ईच्छूकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावी

                         प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती)                                               कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध                                    ईच्छूकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावी         अमरावती, दि. 18 : प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) ही कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे. संस्थेचे कार्यालय कृषि संकुल, विद्यापीठ रोड, कॅम्प अमरावती येथे एक एकर क्षेत्रात स्थापीत आहे. या संस्थेच्या आवारात प्रशिक्षणार्थ्यासाठी दोन वसतीगृहे, खानावळ, प्रशिक्षण संकुल व इतर इमारती आहेत. या इमारती मधील विद्युत यांत्रीकीची (इलेक्ट्रीशियन) कामे, परिसरांमधील इमारतीच्या नळजोडणी, पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडाची दुरुस्ती, नविन पाईप जोडणी इत्यादी कामासाठी नळजोडणी कारगीर (प्लंबर), इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, फर्निचरची दुरुस्ती व नुतनिकरणाच्या कामासाठी सुतार काम करणारे कारागीर तसेच या संस्थेत लोखंडी गेट, ग्रिल्स, लोखंडी शेड व इतर लोखंडी साहित्यांची जोडणी दुरुस्ती करण्याच्या

कोरोना नियमांचे जबाबदारीने पालन करा -- ॲड. ठाकूर

  कोरोना नियमांचे जबाबदारीने पालन करा -- ॲड. ठाकूर अमरावती,दि. 16 : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असतानाही विभागाचे काम चालूच ठेवणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर आता प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून काम करताना दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी अमरावती शासकीय विश्रामगृहावर आज कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेउन त्याच्यावर तोडगा काढला. मात्र, यावेळी भेटीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना त्यांनी कळकळीची विनंती करीत राज्यसरकारने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. याची जाणीव करून दिली. विषेशत: लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी ओळखून त्या प्रमाणे पालन केले पाहिजे असेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.

श्री वल्ली गाण्याचे रीमेक करणाऱ्या कलावंताचा पालकमंत्र्यांकडून सन्मान

अमरावती,दि. 16 : श्री वल्ली गाण्याचे मराठी रिमेक करणाऱ्या कलावंताचा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी यथोचित सत्कार करत त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या अनपेक्षितपणे झालेल्या सत्कारामुळे विजय खंदारे हा कलावंत आणि त्याची पत्नी भारावून गेली. पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटातील श्री वल्ली गाणे सध्या अतिशय धुमाकूळ घालीत आहे. मात्र ते अपेक्षा त्याचे मराठी रुपांतरण सध्या युट्युब वर अतिशय गाजत असून हे रूपांतर अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बैलवाडी येथील   विजय खंदारे या तरुणाने केले आहे. सध्या दिवसा येथे राहणाऱ्या विजय खंदारे याच्या या कलागुणांचा गौरव करीत पालक मंत्री एडवोकेट ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली.   पत्नी तृप्तीसह विजय खंदारे याचा सत्कारही केला. गरीबीतून आपले शिक्षण पूर्ण करीत नोकरीसाठी भटकणाऱ्या विजयने प्रसंगी शेंगा विकून अथवा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली. याच दरम्यान त्याला टिक टॉकवर व्हिडिओ करण्याचा छंद लागला. त्याने केलेल्या विनोदी व्हिडिओना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले. त्यालाही चा

अमरावती विभागात नवे 872 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 872 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 14 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 872 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 253 , अकोला येथे 260 , यवतमाळ 108 , बुलडाणा 209 व वाशिम येथे   42 असे एकूण 872 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेत (रामेती) व्याख्याते पदाकरीता अर्ज आमंत्रित व्याख्यात्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे

  प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेत (रामेती) व्याख्याते पदाकरीता अर्ज आमंत्रित                     व्याख्यात्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे     अमरावती,दि. 14 : प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेद्वारे (रामेती) ही अमरावती विभागातील कृषी व संलग्न व्यवसायातील विस्तार प्रशिक्षणाचे कार्य केले जाते. संस्थेच्या माध्यमातून कृषी व संलग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, आत्मा अंतर्गत कार्यरत कर्मचारी, आत्मा तालुका व जिल्हा समितीचे सदस्य व पदाधिकारी विविध विषयावर प्रत्यक्ष व दुरस्थ प्रणालीद्वारे प्रशिक्षण देतात. अमरावती येथील प्रादेशक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे विविध विषयांतील तज्ञ व्यक्तीकडून व्याख्याते पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत त्या त्या विषयातील सखोल, तांत्रिक ज्ञान अधिक परिणामकारकपणे पोहोचविण्यासाठी संबंधित विषयातील पारंगत, व्याख्याते उपलब्ध करुन घेऊन त्यांची नामनिर्देशिका तयार करणे व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संस्थेमार्फत राबवि

अमरावती विभागात नवे 812 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 812 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 812 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 192 , अकोला येथे 284 , यवतमाळ 77 , बुलडाणा 188 व वाशिम येथे   71 असे एकूण 812 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

अमरावती विभागात नवे 619 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 619 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 12 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 619 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 186 , अकोला येथे 196 , यवतमाळ 108 , बुलडाणा 105 व वाशिम येथे   24 असे एकूण 619 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००

अत्याधूनिक साहित्याच्या वापरामुळे भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीची प्रक्रिया जलद व अचूक

  अत्याधूनिक साहित्याच्या वापरामुळे                                                                                 भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीची प्रक्रिया जलद व अचूक   अमरावती दि 12: भूमि अभिलेख विभागाकरीता गौण खनिज अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाकरीता ३६ लक्ष २१ हजार रुपयांचा निधी रोव्हर मशिन युनिट, लॅपटॉप व प्लॉटर व अनुषंगीक साहित्य खरेदी करीता वितरीत करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहाय्यक आयुक्त श्यामकांत म्हस्के, उपसंचालक (भूमि अभिलेख) विलास शिरोळकर, उपजिल्हाधिकारी (महसुल) रणजित भोसले, कार्यालय अधीक्षक निशांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनामुळे हे अत्याधूनिक साहित्य प्राप्त झाले असून त्यामुळे भूमापन प्रक्रियेत अचूकता व गतिमानता निर्माण होणार आहे. जिल्ह्याकरीता रोव्हर मशिन युनिट व लॅपटॉप व अनुषंगीक साहित्य खरेदी करण्यात आले असून या हे साहित्य उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, उप अधीक्षक भूमि अभिलेख अचलपुर कार्यालयास पुरविण्यात आले असून तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.        रोव्हर मशिन व इतर साहित्यामुळे मोजणी प्र

विभागीय आयुक्त कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन अमरावती दि 12: राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्य विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या   जयंतीनिमित्य आयोजित विशेष कार्यक्रमात संजय पवार उपायुक्त (सा.प्र.), श्यामकांत म्हस्के सहा.आयुक्त (भूसुधार), विवेकांनद काळकर सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग), तहसिलदार वैशाली पाथरे उपस्थित होते. यांनीही यावेळी पुष्प अर्पण करुन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस वंदन केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000

अमरावती विभागात नवे 396 कोरोनाबाधित

  अमरावती विभागात नवे 396 कोरोनाबाधित   अमरावती, दि. 11 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 396 कोरोनाबाधित आढळून आले.              आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 91 , अकोला येथे 199 , यवतमाळ 34 , बुलडाणा 52 व वाशिम येथे   20 असे एकूण 396 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ००००००

कोविड केअर मॅनेजमेंट प्रणालीचे पोर्टलवर कोरोना उपचारा बाबत माहिती अद्ययावत करण्याबाबत प्रशिक्षण

  कोविड केअर मॅनेजमेंट प्रणालीचे पोर्टलवर कोरोना उपचारा बाबत माहिती अद्ययावत करण्याबाबत प्रशिक्षण अमरावती दि 12: कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टीम पोर्टलवर   कोरोना रुग्णालये, खाटा, ऑक्सिजनची उपलब्धता व औषधोपचाराबाबत सर्व माहिती अद्ययावत करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कोविड मॅनेजमेंट केअर सिस्टिम या पोर्टलवर राज्यातील कोविड संबंधी माहिती उपलब्ध व अद्ययावत करण्यात येत आहे.   कोरोना आजारावर उपचार करतांना रुग्णालयात खाटांची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांचा साठा या माहितीच्या अभावी रुग्णाच्या कुटूंबियांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम   निर्माण होऊ नये. तातडीच्या वेळी रुग्णाला   योग्य उपचार   मिळावे यासाठी या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध व अद्ययावत करण्यासाठी हे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. शासकिय व खासगी रुग्णालयांची कोरोना उपचारासंबंधी   माहीती अद्ययावत करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी जिल्हाधिकारी आशिष बीजवल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी नितिन व्यवहारे, आरोग्य विभागाचे अ

राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन युनिट सुरु करण्यासाठी अर्ज सादर करावे

  राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन युनिट सुरु करण्यासाठी अर्ज सादर करावे   अमरावती दि.11:- जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत (विशेष घटक योजना) मुरघास निर्मितीकरीता सायलेज बेलर मशीन युनिट (गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन वितरण) स्थापनेसाठी निधी प्राप्त झाला आहे.                                या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनिट (गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन वितरण) स्थापनेसाठी अर्ज संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादनसंघ/ संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था, स्वयंसहायता बचतगट, गोशाळा/पांजरापोळ या संस्थानी अर्ज करावे.                 अधिक माहीतीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाच्या 0721-2662326 या क्रमांकावर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांच्या 0721-2662066 या क्रमांकावर तसेच सबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसवर्धन

राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत आयोगाचा वार्षिक अहवाल आपले सरकार पोर्टलवर प्रसिद्ध

                                       राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत आयोगाचा वार्षिक अहवाल आपले सरकार पोर्टलवर प्रसिद्ध    महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना (नागरिकांना) पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता "महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-२०१५" हा दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी शासनाने अंमलात आणला आहे. शासनाचे विविध विभागांमार्फत ४८६ सेवा अधिसुचित करण्यात आल्या असुन सद्यस्थितीत ४०३ सेवा "आपले सरकार" पोर्टल मोबाईल अॅप माध्यमाध्यतून ऑनलाईन स्वरुपात पुरविण्यात येत आहे. विविध कार्यालयांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा उपलब्ध न झाल्यास त्याबाबत प्रथम व व्दितीय अपिल त्या विभागाचे पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतरही, सेवा उपलब्ध न झाल्यास तृतीय अपिल आयुक्त, राज्य लोक सेवा हक्क अमरावती विभाग, अमरावती यांचेकडे ऑनलाईन द्वारे करता येईल. महाराष्ट्र लोक सेवा हक्क संबंधि लोकांच्या मनामध्ये उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नाचे उत्तर "आपले सरकार" पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले आहे. शासकिय विभागा

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे

  राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे   केद्र शासनाने २०२१-२२ या वर्षासाठी पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, स्वयंसहाय्यता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी सस्थांनी पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtragov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत शेळीमेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेकरीता ५० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा आखुन देण्यात येणार आहे. त्यात शेळी व मेंढी पालनाकरीता ५० लाख, कुक्कुट पालनाकरिता २५ लाख , वराह पालनाकरिता ३० लाख आणि पशुखाद्य व वैरण विकासासाठी ५० लाख रुपये असणार आहे. प्रकल्पाकरिता स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक न