पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांविषयी माहिती व त्याचे व्यवस्थापन

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांविषयी माहिती व त्याचे व्यवस्थापन कृषी विभागाद्वारे उपाययोजना जाहीर अमरावती, दि. 24 : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे. त्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. शेतकरीबंधुना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे मात्र मागील दोन-तीन दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या कीडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते, अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करुन आ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रस्थान

इमेज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रस्थान अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावती येथील विविध कार्यक्रमानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हेलिपॅडवरुन आज दुपारी 4 वाजता नागपूरसाठी प्रस्थान झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना देण्यात आली. 000000
इमेज
इतिहासातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी -          राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Ø   अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण अमरावती, दि. 20 : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांना आदराचे स्थान आहे. विरांगणा अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, उपमहापौर कुसूम साहू, कमलताई गवई, सुरेखा ठाकरे, वसुधाताई देशमुख उपस्थित होत्या. श्री. कोश्यारी म्हणाले, राजमाता अहल्यादेवी यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन इंदूरमध्ये कार्य केले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रांताची मर्यादा नसते. त्यांनी केलेले बद्रीनाथ मंदिराच्या पुनरूज्जीवनाचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या अशा विविध कार्यामुळे संपूर

राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन

इमेज
राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन अमरावती, दि. 20 : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सुमारे दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या वसतीगृहामुळे विद्यापीठात संशोधन करणाऱ्या 25 संशोधक छात्रांच्या निवासाची सोय होणार आहे. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले. 000000

*आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

इमेज
विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी *आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अमरावती, दि. 20 : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर एवरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण हेरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासह साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी जागतिक किर्तीचे होऊ शकतील. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने जागतिक पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजीत आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.   अध्यक्ष स्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते. श्री. कोश्यारी म्हणाले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एवरेस्टची चढाई केल्याचे कौतुक आहे. आपल्यातील तीन विद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन

इमेज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील   हेलिपॅडवर आज सकाळी 9 वाजता आगमन झाले. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन, महापालिका आयुक्त संजय निपाणे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल यांचे स्वागत केले.   त्यानंतर पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना देण्यात आली.

ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांचे आवाहन

इमेज
ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांचे आवाहन अमरावती , दि . 20   :   मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे, याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा   उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा   दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार, इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र- कुलगुरु राजेश जयपूरकर,   यांच्यासह विविध अधिष्ठाता, व्यवस्थापन समिती सदस्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दीक्षांत समारंभात पारंपारिक उपदेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की आज विविध पदके आणि पारितोषिके मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांनमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे, हे पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज                              राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन अमरावती , दि . 19   :   आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित शासकीय व अनुदानीत आाश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.20 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. या स्पर्धांचे आयोजन येथील श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे करण्यात आले असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव   वैद्य राहतील. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी आणि आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले आहे. ****

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती , दि . 17   : शिक्षण मंडळामार्फत इयत्ता शिक्षण मंडळामार्फत 12 वी व इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगिरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या इयत्ता 10 वी 12 वी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2019 निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी या वेबसाईडचा वापर करावा. http://form17.mh-ssc.ac.in   http://form 17.mh-hsc.ac.in   विद्यार्थ्यांने अर्ज या संकेतस्थळावरुन सादर करावे. अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो सादर करावा. अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर करुन अपलोड करावी असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांन

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू अमरावती , दि . 13   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) लागू केले आहे.   या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 13 ते 27 डिसेंबर 2019 पर्यत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात आले. या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्तिविरुध्द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. ****

विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर

विभागीय लोकशाही दिनी 9 प्रकरणे सादर अमरावती , दि .9 - आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कर्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही दिनात श्रीमती वैशाली पाथरे यांनी विभागातील विविध कार्यालयांशी निगडीत नऊ प्रकरणे सादर केली. ****

9 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन

9 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन अमरावती, दि. 7 :- सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानूसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 9 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त का र्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचही जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडीत आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरण, निवेदन लेखी स्वरुपात उपरोक्त दिवशी मांडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिहं यांनी केले आहे. ****