पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोजगार मेळाव्यात 31 युवकांची निवड

  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोजगार मेळाव्यात 31 युवकांची निवड                अमरावती, दि. 30 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तथा मुलभुत प्रशिक्षण व अनुषंगिक सुचना केंद्राच्या वतीने दि.25 जून रोजी सुझुकी मोटर्स गुजरात प्रा. लि. यांच्या तर्फे रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यांत आला होता. या भरती मेळाव्यात 31 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना रोजगार प्राप्ती झाली आहे. या भरती मेळाव्यात जिल्ह्यातून आयटीआय उत्तीर्ण 56 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 46 विद्यार्थी मुलाखतीत पात्र ठरले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे सहाय्यक संचालक एन. पी. येते, तसेच संस्थेच्या प्राचार्या श्रीमती एम. डी. देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक प्रशि. सल्लागार श्रीमती एम. आर. गुढे, प्रशि. अधिकारी सदानंद गावंडे, श्रीमती पाटील संस्थेचे निदेशक आदी उपस्थित होते. निवड झालेल्या उमेदवारांना रोजगारस्थळी घेऊन जाण्यासाठी सुझुकी कंपनी तर्फे मोफत बसेसची व्यवस्थ

अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण

  अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण Ø   तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग Ø 75 ते 100 मिलीमिटर पावसानंतर पेरणीची शिफारस             अमरावती, दि. 28 : अमरावती विभागात यावर्षीच्या खरीप हंगामात 60 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. विभागात सर्वाधिक पेरणी 87 टक्के वाशिम जिल्ह्यात झाली आहे. गेल्यावर्षी याचदरम्यान 73 टक्के पेरणी झाली होती. यावर्षी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग आला आहे. खरीप हंगामासाठी शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. सर्वसाधारण खरीपाची पेरणी 75 ते 100 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्यावर करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी शिफारस केली आहे. अमरावती विभागात आतापर्यंत 184.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात बुलडाणा 136.7, अकोला 79.1, वाशिम 211.9, अमरावती 189.4 आणि यवतमाळात 257.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागातील 56 तालुक्यांत 388 महसूल मंडळ समाविष्ट आहेत. यात 11 महसूल मंडळात 0 ते 25 मिमी, 25 मंडळात 25 ते 50 मिमी, 41 मंडळात 50 ते 75 मिमी, 38 मंडळात 75 ते 100 मिमी, तर 273 मंडळात 100 मिम

कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी, आहारविषयक उपाययोजना

इमेज
  कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी, आहारविषयक उपाययोजना Ø   अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना मार्गदर्शन अमरावती, दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्पातर्फे अमरावती आणि चांदुरबाजार येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना आहारविषयक उपाययोजनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले कृषि विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विभागाच्या विशेषज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी सद्याच्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘ कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी आणि आहारविषयक उपाययोजना’ याबाबत मार्गदर्शन केले. कोरोनाची प्राथमिक लक्षणे, खबरदारी, उपाययोजनासोबतच आहारातील पोषणासंबंधी गरजा सांगून माहिती दिली. प्रशिक्षणात श्रीमती कडू यांनी घरीच सुरक्षित आणि स्वस्त सॅनिटायझर तयार करण्याची विधी सांगितली. कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असणारी फळे, भाज्या व पौष्टिक आहारबाबत माहिती देऊन बाहेरील वस्तू निर्जंतूक करण्यासाठी घरगुती साहित्याचे महत्व सांगितले, लसीबाबत असलेले गैरसमज तसेच लसीकरणाचे महत्व व आवश्यकता याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला कृषि विज्ञान

सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती, व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण

इमेज
  सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती, व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण अमरावती, दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र, महिला व बालविकास प्रकल्प, अमरावती आणि चांदूरबाजार यांच्यातर्फे सेंद्रीय पद्धतीने पोषण परसबाग निर्मिती आणि व्यवस्थापाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या वेबीनारमध्ये अमरावती आणि चांदूरबाजार तालुक्यातील 60 अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेषतज्‍ज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. कडू यांनी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढावी, दैनंदिन आहारात विविध सुष्म पोषणद्रव्ये पुरविण्याकरिता घरीच उत्तम प्रतीचा विषमुक्त हिरव्या ताज्या पाले-फळभाज्या पिकवणे गरजेचे झाले आहे. उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पालेभाज्यातील जीवनसत्वाचे महत्व आणि अभावाने होणारे आजार विशद करून पोषणसमृद्धीचे महत्त्व सांगितले. शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि संरक्षण देण्यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतांश जीवनसत्व शरीरात तयार होत नसल्याने दैनंदिन आहारातून ती घेणे गरजेचे ठरत असल्याने जीवनसत्वाचे स्रोत सांगितले. त्या

दहावीच्या विद्यार्थ्यांनी रेखाकला विषयाचे सवलतीच्या गुणांबाबतचे प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावे

  दहावीच्या विद्यार्थ्यांनी रेखाकला विषयाचे सवलतीच्या गुणांबाबतचे प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावे अमरावती, दि. 25 : इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत. याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळेकडे दि. 25 ते 30 जून पर्यंत व शाळांनी विभागीय मंडळाकडे 28 जून ते. 2 जुलै 2021   पर्यंत सादर करावे. यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा विभागाने केलेल्या तरतुदीनुसार इयत्ता दहावी परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता येईल. सन 2020-2021 या वर्षी परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तथापि कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये त्यांना इटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आल्याने ते परीक्षा उत्तीर्ण होवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेली श्रेणी इंटर

पाचवी व आठवीच्या द्वितीय बॅचच्या मूल्यमापनाचा निकाल 28 रोजी

  पाचवी व आठवीच्या द्वितीय बॅचच्या मूल्यमापनाचा निकाल 28 रोजी अमरावती, दि. 25 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ द्वितीय बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि. 1 ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्या मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल (www.msbos.mh-ssc.ac.in) या संकेतस्थळावर दि. 28 जून   रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांला त्याच्या माहितीची प्रत (Prinout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता 5 वी/इयत्ता 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 0000  

आयटीआय उर्त्तीर्ण युवकांसाठी 25 रोजी रोजगार भरती मेळावा

       आयटीआय उर्त्तीर्ण युवकांसाठी      25 रोजी रोजगार भरती मेळावा अमरावती, दि.21 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्यावतीने औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एन एस सभागृहात दि. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता आय टी आय उत्तीर्ण युवकासांठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. रोजगार मेळाव्यात सुजूकी मोटर्स गुजरात प्रा.लि.ही कंपनी उमेदवाराची फीटर, डिजेल मॅकॅनिक, वेल्डर, पेन्टर इत्यादी पदासांठी निवड करणार आहे. अठरा ते तेवीस वर्षे वय असलेले, दहावी व आयटीआय उत्तीर्ण युवक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. उमेदवारांनी वर्ष 2016 ते 2020 या कालावधीतील आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे, आधार कार्ड/पॅन कार्डची मुळ प्रत, गुणपत्रिकेसह उपस्थित राहावे, असे संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे. 00000