पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
राष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करावे -          किशोर तिवारी Ø तुरीचे पैसे एका आठवड्यात मिळणार Ø शेतकरी उत्पादन संघाला प्रोत्साहन Ø विषबाधासंबंधी दक्षता बाळगावी अमरावती, दि. 31 : खरीपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाली आहेत. मात्र विभागात पिककर्ज वाटपाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. पिककर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांत नवीन शेतकऱ्यांना कर्ज देणे, पिककर्ज मेळावे घेऊन पिककर्ज किमान 50 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करण्याच्या सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या. आज विभागीय आयुक्त कार्यालयात शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वर्धाचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रजत बॅनर्जी आदी उपस्थित होते.          श्री. तिवारी म्हणाले, विभागात वाशिम आणि य
इमेज
माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  डिआयएव्ही पोर्टल कार्यान्वित ·          माजी सैनिक, शहीद कुटुंबीयांचा मिलन सोहळा अमरावती, दि. 29 :  भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकी कल्याण योजनांची माहिती देण्यासाठी वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत  डिआयएव्ही पोर्टलचा  शुभांरभ करण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पुलगाव स्टेशनचे स्पेशल ऑफीसर इसीएचएस, कर्नल एस.पी. वर्मा यांनी अमरावती येथे दिली. वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत माजी सैनिक, शहीद कुटुबीयांच्या मिलन शिबिराचे आयोजन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुलगाव स्टेशन मुख्यालयाचे ब्रिगेडिअर गोल्डस्मिथ, कर्नल एस. पी. वर्मा, लेफ्टनंट कर्नल संजीव कुमार, कर्नल राजेंद्र सिंह, कर्नल बलबीरसिंग, कॅप्टन अरविंद चांडक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, निवृत्त कर्नल विश्वास काळे व निवृत्त कर्नल लक्ष्मण गादे उपस्थित होते. पोर्टल संदर्भात माहिती देतांना कर्नल वर्मा म्हणाले की, माजी सैनिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी भारतीय सैन्यातर्फे वेटरन्
इयत्ता 10 वी 12 वी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 29 : इयत्त्या दहावी व बारावीच्या शैक्षणिकवर्ष मार्च 2019 च्या परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 30 जुलै 2018 ते दिनांक 25 ऑगस्ट 2018 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. परंतू या नाव नोंदणी अर्जास मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा कालावधी 10 सप्टेंबर पर्यंत करण्यात आला आहे. दि.27 ऑगस्ट 2018 ते 11 सप्टेंबर 2018 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावे. दिनांक 15 सप्टेंबर 2018 संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावे. वाढीव तारखांबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेवून तशा सूचना आपल्या स्तरावरुन शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना देण्यात द्याव्या. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. असे विभागीय सचिव अ
इमेज
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे प्राधान्याने पूर्ण करा                                                     -जिल्हाधिकारी अभिजित बांगर    अमरावती, दि. 29 : ग्रामीण भागात मूलभूत सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक, शाश्वत विकासासह गावे सक्षम बनविणे हे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी अभियानातंर्गत गावांमध्ये विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक व ग्रामस्थांनी अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे समन्वयातून प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत निवडलेल्या गावांमधील कामांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्री. काळे यांचेसह बँकेचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास
अमरावती प्री आयएसएस टेनिंग सेंटरची प्रवेश प्रक्रिया आरंभ Ø   14 आक्टोंबर रोजी सीईटी परीक्षा Ø   www.preiasamt.in संकेतस्थळ उपलब्ध अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च   व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. या केद्रातील प्रशिक्षणाकरीता प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक आहे. परीक्षेचा अर्ज येत्या 26 सप्टेंबर, 2018 पर्यत विद्यार्थ्याना www.preiasamt.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार 60 व अनुसूचित जाती बार्टीद्वारे 10 अशा एकूण 70 विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या परीक्षेसाठी पात्रताधारक कोणत्याही पदवीधारकास ही प्रवेश परीक्षा देता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर 14 ऑक्टोंबर 2018 रोजी अमरावती येथील केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेचा निकाल www.preiasamt.in संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या
धारगड   यात्रकेरुंसाठी सूचना जाहिर अमरावती, दि. 24 : येत्या दि. 26 व 27 ऑगस्ट 2018 रोजी मेळघाटातील अति संरक्षित जंगलस्थित धारगड यात्रेचा शुभारंभ होत आहे. धारगड मंदिर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित गाभा क्षेत्रात असल्याने यात्रेस येणाऱ्या भावीकांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करुन मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनास सहकार्य करण्याचे सूचित केले आहे. यात्रे दरम्यान कोणतेही वाद्य ( ढोल, ताशे, डफडे इत्यादी) तसेच लाऊड स्पिकर वापरास बंदी आहे. तंबाखु, गुटखा, बिडी मद्य इत्यादी नशेचे पदार्थ व शस्त्र वापरण्यास व सोबत नेण्यास बंदी राहील, आढळल्यास जप्ती येईल व प्रचलीत नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल. वाहनाद्वारे खटकाली तपासणी नाक्याकडून दिनांक 26 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8.00 वाजेपासुन ते 27 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यत भाविकांना प्रवेश दिला जाईल. दि. 27 ऑगस्ट 2018 सायंकाळी 6.00 वाजेपर्यत खटकाली नाका येथून बाहेर निघणे भावीकांना आवश्यक राहील. दि. 26 ऑगस्ट 2018 व 27 ऑगस्ट 2018 व्यतिरिक्त इतर दिवशी धारगड मंदीरात प्रवेश प्रतिबंधीत आहे.   धारगड टि-पॉइट येथे पार्कीगची व्यवस्था

शिक्षकांचे पॅनल फार्म आता ऑनलाईन लिंक वर

शिक्षकांचे पॅनल फार्म आता ऑनलाईन लिंक वर Ø sscboardamravati.in या संकेतस्थळ https://goo.gl/forms/oVQenzQaSPV5aWtT2 अमरावती, दि. 24 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) विषयनिहाय शिक्षकांची माहिती ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत असून त्याकरीता अमरावती विभागीय मंडळाचे कक्षेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात ई.9 ते 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचे पॅनल तयार करण्याचे अनुषंगाने माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याकरीता मंडळाचे संकेतस्थळ Sscboardamravati.in वर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून सदर पत्रात दर्शविलेली लिंक https://goo.gl/forms/oVQenzQaSPV5aWtT2 उघडण्यात आलेली आहे सदर लिंकमध्ये शिक्षकांच्या माहिती प्रपत्र उपलब्ध असून ई. 8 वी ते ई. 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षकांची विषयनिहाय माहिती भरण्यात यावी. आवश्यक माहिती शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी भरुन ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पाठवावयाची आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी, त्यांचे कनिष्ठ म
इमेज
अर्जित ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी करा                                               -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ अमरावती, दि. 24 : अभियांत्रिकी क्षेत्रामुळे ज्याने देशाच्या सर्वांगीण विकासाला एक नवा आयाम मिळू शकतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून उच्चांक गाठू शकतो. हे ध्येय समोर ठेवून अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करावा, असे उत्साहवर्धक आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज पदवी प्रदान समारंभात केले. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रसिध्द उद्योजक तथा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, सहसंचालक डॉ. डी.व्ही. जाधव, नागपूर विद्यापीठ

नगरविकास राज्यमंत्र्यांची ‘पीडीएमसी’ला भेट डेंग्यू नियंत्रणासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय करा -नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

इमेज
नगरविकास राज्यमंत्र्यांची ‘पीडीएमसी’ला भेट डेंग्यू नियंत्रणासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय करा                       -नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश अमरावती, दि. 23 : अमरावती शहरात व जिल्हयात डेंग्यूसदृश कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाचा उपाय ठरतो. त्यामुळे महापालिकेने या उपाययोजना व्यापकपणे राबवाव्यात, तसेच या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिका अधिका-यांची बैठक घेऊन निर्देश दिले. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, पीडीएमसी कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. मनोज निचत, डॉ. समीर चौधरी, डॉ. रोहणकर, डॉ. नितीन सोनोने, मनपाच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचेसह आरोग्य व मनपा प्रशासनाचे अधिकारी उपस्थि

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम अमरावती, दि. 23 : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवव्या तुकडीचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ शुक्रवार, दि. २४ ऑगस्ट रोजी व्हीएमव्ही परिसरील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात होणार आहे. या समारंभात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४७०   बी. टेक आणि ९९   एम. टेकच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र प्रदान करण्यात येतील. या समारंभासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू   डॉ. एम. जी. चांदेकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना   सकाळी १०.३० ते दुपारी १२.४० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र वितरीत केले जातील. यात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य),   हर्षल पाटील (यंत्र), दत्ता गाडेकर (विद्युत), एकता पांडे (अणुविद्य

आज इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल

आज इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल Ø   निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in संकेतस्थळ         अमरावती, दि. 23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) वरीक्षा दिनांक 17 जुलै, 2018 ते 04 ऑगस्ट, 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार दि. 24 ऑगस्ट, 2018 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.             ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम अमरावती, दि. 23 : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवव्या तुकडीचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ शनिवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी व्हीएमव्ही परिसरील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात होणार आहे. या समारंभात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४७०   बी. टेक आणि ९९   एम. टेकच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र प्रदान करण्यात येतील. या समारंभासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू   डॉ. एम. जी. चांदेकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना   सकाळी १०.३० ते दुपारी १२.४० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र वितरीत केले जातील. यात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य),   हर्षल पाटील (यंत्र), दत्ता गाडेकर (विद्युत), एकता पांडे (अणुविद्युत)

अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50 टक्के पाणीसाठा निर्माण

अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50 टक्के पाणीसाठा निर्माण * मागील वर्षापेक्षा 25 टक्क्यांनी जलसाठयात वाढ * विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अमरावती, दि.21 : आठवडयाभरापासून सततधार सुरु असलेल्या पावसामुळे अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर म्हणजे 50 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.             विभागातील नऊ मोठया प्रकल्पामध्ये 53 टक्के पाणीसाठा, मध्यम प्रकल्पामध्ये 59 टक्के तर लघु प्रकल्पामध्ये 40 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. मागीलवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील जलसाठयापेक्षा यावर्षी 25 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून विभागातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यापुढेही पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होईल व पाण्याची टंचाई भासणार नाही. अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांची क्षमता 1 हजार 520 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये 799 दलघमी (53 टक्के) जलसाठा निर्माण झाला आहे. 677 दलघमी क्षमतेच्या 24 मध्यम प्रकल्पां
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी ई-पोर्टल कार्यान्वित * 25 ऑगस्ट, अंतीम मुदत *www.etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित अमरावती ,   दि.   20:   प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती अंतर्गत येत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानीत, कायम विना अनुदानीत महाविद्यालयांना जाहिर सूचीत करण्यात येते की, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2012-13 ते 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेसंबंधी प्रस्ताव/अर्ज   महाविद्यालय व विद्यार्थी पातळीवर प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित अर्जाबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांच्यातर्फे वेळोवेळी लेखी तसेच दूरध्वनीद्वारे तोंडी व Whats App ग्रुपद्वारे व वैयक्तिक संपर्क साधुन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीपूर्ण प्रस्ताव मंजुरी करीता सादर करण्याबाबत संबंधित महाविद्यालयास कळविण्यात आले आहे. तथापी सुचना निर्गमित करुन सुध्दा धारणी प्रकल्प कार्यालयाकडे बऱ्या