पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस ! अमरावती, दि. 30 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत विभागात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 26 मिलीमिटर तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी 20.7 मि.मि. पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पवसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 42.2 (104.1), भातकूली 6.8 (68), नांदगाव खंडेश्वर 32 (91), चांदूर रेल्वे 36.4 (104.5), धामणगाव रेल्वे 32 (112.5), तिवसा 37.5 (49.8), मोर्शी 13.8 (55.4), वरुड 17 (55.1), अचलपूर 6.9 (65.2), चांदूर बाजार 5.1 (63.7), दर्यापूर 17.4 (71.1), अंजनगाव 10.2 (47.6), धारणी 10.8 (126.6), चिखलदरा 27.2 (121), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 21.1 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 81.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1 ते 30 जून या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 55.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 10 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोल 10.2 (62), बार्शी टाक

अमरावती विभागातील 51 तालुक्यात पाऊस !

अमरावती विभागातील 51 तालुक्यात पाऊस ! अमरावती, दि. 29 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 56 पैकी 51 तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत विभागात वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 15 मिलीमिटर तर अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी 5 मि.मि. पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पवसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती निरंक (61.9), भातकूली 8 (61.2), नांदगाव खडेश्वर 3 (59), चांदूर रेल्वे 6.7 (68.1), धामणगाव रेल्वे 17.6 (80.5), तिवसा निरंक (12.3), मोर्शी निरंक (41.6), वरुड निरंक (38.1), अचलपूर 1.2 (58.3), चांदूर बाजार निरंक (58.6), दर्यापूर 13.6 (53.7), अंजनगाव 1.9 (37.4), धारणी 13.8 (115.8), चिखलदरा 4.6 (93.8), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 60 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1 ते 29 जून या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 42.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 7.4 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोल 6.1 (51.8),

तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत

तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत अमरावती, दि. 27 : राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या धोरणानूसार महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभाग   ह्या शासकीय विभागाच्या माध्यमातुन ई-महा परिक्षा या पोर्टलवरुन भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया   दि. 2 जुलै ते 26 जुलै, 2019 या कालावधीत महा-आयटीच्या माध्यमातुन ई-महापरीक्षेमार्फत करण्यात येत आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभुत सोयी असणाऱ्या शाळा/कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात आलीअसून राज्यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मुळ फोटो ओळखपत्र (Original Photo Id) आणणे अत्यावश्यक आहे. पॅन कार्ड/पासपोर्ट/वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence)/मतदान ओळखपत्र/मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक/आधार कार्ड ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्

शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे

शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे अमरावती, दि. 27 : यंदा मान्सुनचे आगमन लांबणीवर झाल्याने शेतकऱ्यांनी योग्य रित्या पिकाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची पारंपारिक पिके 30 जुन पर्यंत घेता येतील त्यामुळे 75 ते 100 मिली मिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांच्या अदलाबदलीवर भर देण्याबरोबर जास्तीतजास्त क्षेत्रावर आंतरपिक पध्दती राबवावी सोयाबीन व कापूस पिकांमध्ये तूर हे आंतरपिक घ्यावे. तुरीचे पिक ऊशीरा पर्यंत घेता येईल. प्रामुख्याने प्रमाणीत बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे सुधारीत जातीचे दोन वर्षापासून वापरलेले घरचे बियाणेही वापरण्यास योग्य ठरते. मात्र बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याप्रमाणे बियाणे मात्रा पेरणीसाठी वाढवावी. बियाण्यास पीएसबी व रॉयजोबीएक या सारख्या जैवीक खताची तसेच ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची प्रक्रीया करुनच पेरणी करावी. जनावरांसाठी चारा पिकांना स्थान द्यावे.ज्वारी, बाजरी व मक्याचा त्यात समावेश करावा. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या मुलभूत तत्वांवर भर देण्याची गरज आहे. यात एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय खताचा वापर,जैव

कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन

कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन Ø   इयत्ता 10 वी 12 वी च्या   गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अमरावती,दि. 26:   कुष्ठरोग या सामाजिक समस्येबाबत लोकांच्या मनात असलेली भिती, गैरसमज, अंधश्रध्दा (Social Stigma) दुर करण्याकरिता कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे समाजात पूर्विप्रमाणे स्थान मिळवून देण्यासाठी शासकीय सामाजिक पुनर्वसन (Social Rehabilitation)   हा नाविण्यपूर्ण व स्तृत्य उपक्रम राबविण्यात येतो. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमीत्त संपूर्ण देशात कुष्ठरोग निवारणार्थ विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात.   अमरावतीच्या सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यांचेकडून मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण व प्रसार कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील लोकांच्या मनात कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज, अंधश्रध्दा व भिती दुर व्हावी व   कुष्ठरुगणांना   तात्काळ नि:शुल्क व नियमित औषधोपचार मिळावा त्यांचा विकृतीपासून बचाव करणे ही उपक्रमांची   मुख्य उद्दिष्टये आहेत. या विविध उपक्रमांस

इयत्या 12 वी ऑनलाईन आवेदनपत्रे 24 जून पर्यंत सादर करावे

इयत्या 12 वी ऑनलाईन आवेदनपत्रे 24 जून पर्यंत सादर करावे अमरावती,दि. 21:   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इ. 12 वी ची परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in   किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. आवेदनपत्र विलंब शुल्काने भरण्याची मुदत दिनांक 24 जून 2019 पर्यंत असून नियमित व विलंब शुल्कासह भरलेल्या आवेदनपत्रांचे शुल्क चलनाद्वारे भरण्याचा कालावधी दिनांक 24 ते 29 जून 2019 असा राहिल. असे   डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी कळविले आहे. ***

शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे वाटप जून अखेर अर्ज आमंत्रित

शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे वाटप जून अखेर अर्ज आमंत्रित अमरावती,दि. 21:   ‘ उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ मोहिमेअंतर्गत सन 2019-20 या वर्षांत विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीउपयोगी अवजारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 25 ते 30 जून या कालावधीत कृषि विभागाकडे अर्ज सादर करावे. ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, बी.बी.एफ. प्लॉटर, स्वयंमचलित रिपर कम, बाईडर, रिपर, कल्टीव्हेटर, पल्टी नांगर, सर्वप्रकारचे मळणी यंत्र, मिनी दाल मिल इ. अनुदान प्राप्त अवजारे असून या वर्षात   ट्रॅक्टर व ट्रॅक्टर, चलीत अवजारे करिता शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तसेच पेरणी यंत्र व बी.बी.एफ. प्लॉन्ट करिता प्राधान्याने अर्ज करुन लगेच खरेदी करता येईल. प्रत्येक अर्जासोबत त्यांचेकडे किंवा कुटूंबातील अन्य सदस्याचा नावे ट्रॅक्टर असल्यास अर्ज करता येईल. अवजारासाठी शेतकऱ्यांने स्वतंत्र अर्ज करावा. ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे. त्या एकच यंत्र किंवा अवजारास अनुदान दिल्या जाईल. लाभार्थिची निवड करतांना ज्येष्ठतेनूसार तालुकास्तरावरच सोड

जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके निरामय जीवनासाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

इमेज
जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके निरामय जीवनासाठी योग आवश्यक -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावती,दि. 21: शरीर आणि मन या दोन्ही बाबी संतुलित ठेवण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगशास्त्रातून आयुष्यात संयम व शिस्त येते. निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योग कलेचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले. जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, भारत स्वाभिमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जेसीआय सेंच्युरियन व योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके व साधनेचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय क्रीडा संकुलात आज योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी साडेसहापासूनच शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, गृहिणी, विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. सातच्या सुमारास संकुलातील सभागृहात योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.    आ

मौजा-अकोली नगर भूमापन चौकशी 20 रोजी

मौजा-अकोली नगर भूमापन चौकशी 20 रोजी अमरावती,दि. 18: अमरावती शहर महानगर पालिके अंतर्गत वाढीव विस्तारीत क्षेत्राचे भूमापन नकाशे व अभिलेख तयार करण्याचे काम पुर्ण झाले असून मौजा अकोली ता, जि. अमरावती या गावा अंतर्गत असलेल्या सर्व मिळकतीची नगर भुमापन चौकशी दिनांक 20 जुन 2019 पासून करण्यात येणार आहे. मौजा-अकोली ता. अमरावती जि. अमरावती (जुने नझूल वगळून) हद्दीतील सर्व मिळकत धारक/भुखंड धारक/ अभिन्यासातील भुखंड मालक तथा मालमत्ता धारकांनी विशेष उपअधिक्षक भुमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र.2 अमरावती यांनी नियमाप्रमाणे बजाविलेल्या नोटीस दिनांकास उपस्थित राहून आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/ नोंदणीकृत दस्त ऐवज सादर करुन आपला हक्क साबित करावा. नेमून दिलेल्या दिनांकास आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/नोंदणीकृत दस्तऐवज सादर न केल्यास मालकी हक्क साबित होणार नाही याची संबंधित सर्व मिळकत धारकांनी नोंद घ्यावी.             असे विशेष उपअधिक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र 2, अमरावती यांनी कळविले आहे. ****

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करावे

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करावे अमरावती,दि. 18: अमरावती मंडळातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी इयत्या 10 वी व इयत्या 12 वी जुलै-ऑगस्ट 2019 करिता आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पध्दतीने सादर केल्यानंतर त्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाद्यिालयाचे परीक्षा शुल्काचे बँक ऑफ इंडियाचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडिया मध्ये भरणा न करता ते ॲक्सीस बँकेत सुधारीत कार्यपध्दतीने भरणा करावयाचा आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे चलनावरील नमूद बँक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड UTIBOCCH 274 प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्य

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित अमरावती,दि. 15: गृहनिर्माण संस्थांवर प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी सहकार विभागाव्दारे पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर आणि सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक असावा. तसेच चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए), कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक किंवा लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले उमेदवार सुध्दा प्रशासक पदासाठी पात्र आहे.   अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संसथा, अमरावती विभाग अमरावती येथे उपलब्ध असून कार्यालयाचा पत्ता सहकार संकुल कांता नगर, जुना बापपास रोड महसुल भवन कार्यालया समोर अमरावती (कार्या. दुरध्वनी क्र. 0721-2663246) असा आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/उप-सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयात सुध्दा उपलब्ध आहे. अ

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांची नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांची नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित अमरावती,दि. 14: विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती विभाग अमरावती यांचे कडुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77अ/78/78अ अन्वये गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए)/कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांचेकडुन मागविण्यात येत आहे. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संसथा, अमरावती विभाग अमरावती, पत्ता सहकार संकुल कांता नगर, जुना बापपास रोड महसुल भवन कार्यालया समोर अमरावती (कार्या. दुरध्वनी क्र. 0721-2663246) तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/उप-सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयात दि. 15 जून, 2019 ते दि. 30 जून,,

इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर

इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर Ø   जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा Ø   www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध         अमरावती, दि. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट, 2019 मध्ये परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. त्यासाठी या परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे.             माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे नियमीत शुल्कासह शुक्रवार दि. 14 जून ते सोमवार दि. 24 जून, 2019 आणि विलंब शुल्कासह मंगळवार दि. 25 जून ते गुरुवार दि. 27 जून, 2019 सादर करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा दि. 28

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर Ø   अधिक माहितीसाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ         अमरावती, दि. 14  : शैक्षणिक सत्र जुलै- ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.   त्यानुसार लेखी परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.             माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते मंगळवार दि. 30 जुलै, 2019 या कालावधीमध्ये असणार. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठीच्या परीक्षेचा बुधवार दि. 17 जुलै ते शनिवार दि. 3 ऑगस्ट 2019 पर्यंत असा कालावधी असून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते बुधवार दि. 31 जुलै, 2019 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता 10 वी व 12 वी

महाडीबीटी पोर्टल सुरु, विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे

महाडीबीटी पोर्टल सुरु विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे अमरावती,दि. 13: विद्यार्थ्यांना सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्या करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 11 जून, 2019 रोजी पुनश्च कार्यन्वीत झालेली असुन दि. 30 जून, 2019 पर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरु राहील. या कालावधीत महाविद्यालयांनी 1 st installment ची scrutiny करणे, विद्यार्थ्यांनी रद्द केलेले अर्ज भरणे व ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेलेच नाही अशा सर्वांकरिता लॉगीन सुरु आहे तसेच 30 जून, 2019 नंतर आपल्या लॉगीनमधुन अर्ज आयुक्तालयस्तरावरुन ऑटोडिलीट करण्यात येईल. दि. 25 जून, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज सहाय्यक आयुक्तांकडे फॉरवर्ड करावे व शिष्यवृत्तीपासुन विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयाने घ्यावी व याबाबतची सूचना महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समजाकल्याण, अमरावती यांनी केले आहे. 00000

सन 2019 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी

सन 2019 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी                 30 जून पर्यंत स्थळाची ऑनलाईन नोंदणी करावी Ø   वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित अमरावती,दि. 10 :   50 कोटी वृक्ष लागवड हा महाराष्ट्र सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांअंतर्गत अमरावती जिल्ह्यास 111.68 लक्ष एवढे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. लागवडीचा हा कार्यक्रम 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या तिन महिन्याच्या कालावधीत निर्धारित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने वनविभाग, सामाजिक वनिकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय यंत्रणांना उदिष्याचे वाटप करण्यात आले आहे. ज्या जागेवर वृक्ष लागवड करावयाची आहे त्या स्थळाची नोंद वनविभागाचे पोर्टल www.mahaforest.gov.in यावर करणे अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे लावावयाच्या रोपांची आकडेवारी सुध्दा वनविभागाचे पोर्टलवर ऑनलाईन करावयाची आहे. वनविभागाचे पोर्टवर स्थळाची नोंदणी व खड्डयांची नोंदणी ऑनलाईन करण्याची मुदत 30 जून 2019 आहे. त्यांनतर हा पर्याय उपलब्ध राहणार नाही. जर स्थळांची माहिती ऑनलाईन क

प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पिक विमा योजना मृग बहारासाठी पुनर्रचित हवामानवर आधारित फळपिक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन अमरावती, दि. 7 : अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानवार आधारित विमा योजना सन 2019 या वर्षाकरीता मृग बहारातील अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे. योजनेचा उद्देश : नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थतीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेत

तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा

इमेज
तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा अमरावती, दि. 7 : अमरावती जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतून दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2019-2020 च्या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे, यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा मेळावा नुकताच 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे सपन्न झाला. या मेळाव्यात शिक्षणाधिकारी सौ. निलिमा टाके, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. एम. भंसाली, गटशिक्षणाधिकारी गणेश बोपटे, मुख्याध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष श्री. खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन देण्यासाठी नागपूर अमरावती सहसंचालक तंत्र शिक्षण संचालनालय व शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाची कास धरणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधिव्याख्याता हेमंत जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगि