पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

अमरावतीत 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान      दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा Ø   राज्यभरातील 3 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी अमरावती, दि.31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, क्रिडा संचालनालय आणि मासोदची सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रिडा संकुल येथे करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.00 वाजता असून स्पर्धेचा समारोप दि. 3 फेब्रुवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभात स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग मुला-मुलींचे यथोचित कौतुक व पारितोषिक वितरण होणार आहे.   या क्रीडा स्पर्धेमध्ये दृष्टीबाधित(अंध), मतीमंद, मुकबधीर, अस्थिव्यंग व बहुविकलांग प्रकारातील राज्यातील तीन हजाराहून अधिक विद्यार्थी विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच, गोळा

आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

इमेज
आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल                                         - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे अमरावती, दि.30 : राज्याची सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होण्यासाठी रिक्त पदांच्या भरतीसह विविध आमुलाग्र बदल करण्यात येत आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना श्री. शिंदे बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार कॅ. अभिजित अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदाधिकारी जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, डॉ. पारीख, किरण पातुरकर आदी यावेळी उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा सक्षमपणे पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील एएसआ

इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध Ø www.mahahsscboard.maharashtra.gov.in Ø   www.mahahsscboard.in संकेतस्थळ अमरावती, दि.17 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्यांध्यापक शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येत की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा मार्च 2019 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च 2019 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बुधवार दि. 30 जानेवारी, 2019 पासून School Login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात

तंत्रशिक्षण विभागीय क्रिडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

इमेज
तंत्रशिक्षण विभागीय क्रिडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन अमरावती दि. 28 : सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांचेवतीने दि 18 व 19 जानेवारी रोजी अमरावती विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .  क्रिडा महोत्सवादरम्यान पुरुष व महीला स्पर्धकांसाठी क्रिकेट,व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुदिधबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. क्रिडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन सहसंचालक, (तंत्रशिक्षण) डॉ.डी.व्ही.जाधव यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी  उद्बोधन करतांना सहसंचालक डॉ. जाधव यांनी क्रिडा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व पुरुष व महीला स्पर्धकांचे अभिनंदन करुन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जय पराजय महत्वाचा नसुन क्रिडा महोत्सवामुळे खिलाडू वृत्ती व सांघिक भावना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. मोगरे, प
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन अमरावती दि. 26 : विभागीय आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज सकाळी ध्वजवंदन केले. यावेळी उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावने , उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, उपायुक्त (पुनर्वसन) प्रमोद देशमुख तसेच अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अमरावती पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.   -----

राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत 77 वी फेरी

राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत 77 वी फेरी Ø   नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे                       अमरावती , दि. 25 : राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत केंद्र व राज्य शासनाद्वारे संपूर्ण देशात विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्यात येत आहे. या पाहणीसाठी नागरिकांनी योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2019 या वर्षांमध्ये (जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019) या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी ची 77 वी फेरी अंतर्गत राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागातर्फे ग्रामीण व नागरी भागातील कुटुंबाची जमीन, पशुधारणा व शेतकरी कुटुंबाच्या परिस्थिीतीचे मुल्याकंन, तसेच कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, स्थावर मालमत्ता आदि दायित्वाबाबत तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे. या पाहणीत आढळणाऱ्या या निष्कर्षांचा उपयोग शेती व शेतकऱ्यांसाठी भविष्यात राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरणे व कार्यक्रम आखण्यासाठी होणार आहे. करीता विभागातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या अर्थ व सांख्यिक

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षणाचे आयोजन

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षणाचे आयोजन अमरावती , दि. 25 : भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजक्ता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रीक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर सहा महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन या संस्थेत करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्प शिक्षित युवक व युवतीसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. सदर प्रशिक्षणसाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. विस्तृत माहितीसाठी कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्न्कि योजना कार्यालय, मुलीचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस.जे. गायकवाड यांनी केले आहे.                                                    

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाचे आयोजन

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाचे आयोजन अमरावती , दि. 23 : भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजक्ता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रीक कौशल्यावर आधारीत मोबाईल रिपेअरिंग तिन महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन या संस्थेत करण्यात येते. सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्पशिक्षित युवक व युवतीसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. सदर प्रशिक्षणसाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. विस्तृत माहितीसाठी कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्न्कि योजना कार्यालय, मुलीचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस.जे. गायकवाड यांनी केले आहे.                                                                                

सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - दिलीप हाथीबेड

इमेज
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - दिलीप हाथीबेड अमरावती , दि. 22 : सफाई कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी आज दिले. सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक जीवनाबाबत अध्ययन तसेच पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना याविषयी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे, सहा. आयुक्त श्री. सुरंजे यांचेसह नगरपालिकांचे मुख्याधिकारी व सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. श्री. हाथीबेड म्हणाले, सन 1986, 1987 व 1988 साली निघालेल्या शासन परिपत्रकात नमूद असल्यानुसार सफाई कामगारांना त्यांच्या मालकीची हक्काची घर

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक   मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण अमरावती , दि. 23 : अमरावती शहरातील शिद्यापत्रिकाधारकांना लोह व आयोडीन युक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्त भाव दुकानातून वितरीत करण्याबाबत दि. 5 ऑक्टोंबर च्या शासन नियमानुसार निर्देश देण्यात सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जानेवारी रोजी सांयकाळी शहरातील मालटेकडी रोड स्थित अग्रवाल रास्त भाव दुकान परिसरात अन्न,नागरी पुरवठा विभाग व टाटाट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोह व आयोडीन मीठाचे वितरण समारंभ आयोजि त करण्यात आला होता. या वितरण समारंभांत शिद्यापत्रिकाधारंकांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडीन युक्त मीठाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, निरिक्षण अधिकारी संजय आवरे, खरेदी अधिकारी उमेश खोडके आदी उपस्थित होते. श्री. बापट म्हणाले की, शिधापत्रिकाधारकांना लोह व आयोडिन युक्त मीठ रास्त भाव दुकानामधु

गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली

इमेज
गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली             -  गिरीश बापट Ø    विश्व अध्यात्म विज्ञान केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण अमरावती ,  दि.  २१  : संत श्री गुलाबराव महाराजांनी १३४ पुस्तके लिहिली आहेत. दृष्टी नसूनही त्यांचे विचार जगातील विचारांचे समन्वय साधणारे आहे. आज त्यांच्या भूमीत येऊन विचाराची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले. चांदूर बाजार येथील संत गुलाबराव महाराज सेवा संस्था येथे आयोजित विश्व अध्यात्म विज्ञान केंद्र ,  भक्तिधाम विकास आराखड्यातील कामांचा भूमीपूजन आणि स्वच्छतेचा जागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू ,  उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर ,  संस्थेचे अध्यक्ष मनोहर किर क्क टे ,  डॉ. अर्चना बारब्दे उपस्थित होते. श्री. बापट म्हणाले ,  गुलाबराव महाराजांच्या चरित्राचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. त्यांच्या अलौकिक विचारांचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे. एक समन्वयी विचार म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यांना दिसत नसूनही त्यांनी समन्वयी विचार मांडून दृष्टी असल्याचे दाखवून दिले. त्यांचे व
इमेज
   जिल्हा वार्षिक नियोजनाबाबत विभागस्तरीय बैठकीत चर्चा आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व रोजगाराला प्राधान्य -           वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावती, दि.21  :  आरोग्य, शिक्षण, रोजगार व पाणी या मुलभूत गरजांना प्राधान्य देऊन त्यानुसार वार्षिक नियोजन तयार करावे. त्यासाठी पुरेसा निधी देऊ, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले. अमरावतीसह विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजनाची बैठक वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुणांच्या प्रस्तावास मूदतवाढ

इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुणांच्या प्रस्तावास मूदतवाढ Ø   अंतीम मूदत 25 जानेवारी अमरावती, दि.19 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, शासन निर्णय दि. 24 डिसेंबर, 2017 नुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळांकडे सादर करण्याची अंतिम मुदत दि. 15 जानेवारी 2019 पर्यंत देण्यात आली होती. यासंदर्भात चित्रकला परीक्षेचे निकाल उशीरा लागल्याने विद्यार्थी हित लक्षात घेता फक्त चित्रकलेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाने दि. 18 जानेवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये मुदतवाढ दिलेली असून, त्यानुसार चित्रकला ग्रेड परीक्षेचे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. 25 जानेवारी 2019 पर्यंत सादर करावे. मार्च 2019 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ. 10 वी) प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्
सहकारी संस्थांच्या लवाद नामतालीका हरकतीबाबत सूचना अमरावती, दि.17 : बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी संघटनात्मक व कायदेशीर आणि आर्थिक व लेखविषयक बाबींविषयी प्रारुप लवाद नामतालिका सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, याचे sahakarayukta.maharashtra.gov.in                या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 15 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केलेली आहे. प्रारुप नामतालिकेवर दि. 31 जानेवारी 2019 पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील कायदा व वैधानिक कार्यवाही कक्षामध्ये हरकती दाखल करता येतील. सदर मुदतीत प्राप्त हरकतीवर दि. 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत निर्णय घेवून दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द केली जाईल, असे सहकार विभागाद्वारे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे 000000