पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
पालकमंत्र्यांनी दिली अवयवदानाची शपथ * अनूप गायकवाडच्या अवयवदानाची आठवण * रूग्णालयाच्या कार्यक्रमात नागरीकांचा सहभाग अमरावती. दि. 29 : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी अवयव प्रत्यारोपण करणे शक्य आहे . यामुळे गंभीर आजारावर निदान होत आहे . अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदान आवश्यक आहे . अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी महाअवयवदान महोत्सवानिमित्त येथील इर्विन रूग्णालयात पालकमंत्री प्रविण पोटे यांनी अवयवदानाबाबत शपथ दिली . यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . किरण कुळकर्णी , आरोग्य उपसंचालक डॉ . नितीन अंबाडेकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्यामसुंदर निकम , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . सुरेश आसोले , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . लोहकपुरे , रक्तपेढी प्रमुख डॉ . विलास जाधव आदी उपस्थित होते . पालकमंत्री श्री . पोटे यांनी देश आणि राज्य पातळीवर अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे . याचाच एक भाग म्हणून इर्विन रूग्णालयात अवयवदानाबाबत शपथ देण्यात येत आहे . अमरावतीमधील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु : खाच्या काळातही अवयवदानाबाबत घेतलेला पु
इमेज
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनव्दारे उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी -किशोर तिवारी विकास कामांची एककेंद्राभिमुखता ठरवावी                                              -प्रविण परदेशी              अमरावती, दि. 26 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना व विस्तार करण्यात आला असून यामध्ये आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा मिशनमध्ये अगोदरच समावेश होता. पश्चिम विदर्भ, मराठवाडा व वर्धा अशा 14 जिल्ह्यात मिशन कार्यरत राहणार असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनव्दारे विविध उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज सांगितले. शनिवार, 26 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. बैठकीला अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, मुख्य वनसंरक
इमेज
शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय करावे    -पालकमंत्री प्रविण पोटे * प्रत्येक व्यक्तीने तीन व्यक्तींना मदत करावी * जिल्ह्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत              अमरावती, दि. 26 : विदर्भातील अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दुध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैश्याची बचत करीत होत्या. आणि ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे चित्र खेड्यागावात पाहायला मिळत होते. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी गावातील लोक शहराकडे स्थलांतरीत होऊ लागली. तसेच सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा इत्यादी कारणामुळे शेतकरी आर्थिक विवंचणेत सापडू लागला. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपुरक व्यवसाय करुन आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज केले.             हॉटेल गौरी इन येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची 31 वी
इमेज
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्याकडून सेतु केंद्राची पाहणी ऑनलाईन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी -          पालकमंत्री प्रविण पोटे- पाटील अमरावती. दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची प्रक्रिया सेवा केंद्रांद्वारे होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सेतु , भातकुली तहसील सेतु व गाडगेनगर महा- ईसेवा केंद्र या केंद्रांना भेट दिली आणि ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार श्री. मालठाणे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. रणविर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. पोटे यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतली व कर्मचा-यांकडून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी सेतू केंद्राचे संचालक झियाऊर रहेमान यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली.