पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
सायबर गुन्ह्यांवर ‘ सायबर लॅब ’ चे प्रतिबंध -पालकमंत्री प्रविण पोटे सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्यात 51 ठिकाणी   ‘ सायबर लॅब ’ स्वातंत्र्यदिनी पोलीस आयुक्तालयातील सायबर लॅब चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अमरावती ,   दि.15 : सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालयांच्या क्षेत्रात 51 ठिकाणी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत   ‘ सायबर लॅब ’   सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या सायबर लॅबमुळे जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध स्थापित होणार आहे, असे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज सांगितले. आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे प्रसंगी अमरावती पोलीस आयुक्तालय कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या सायबर लॅबचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव,
इमेज
ज्ञानरचनावाद अध्यापन पध्दती ; आदिवासी विद्यार्थ्यांची प्रगतीची गुरुकिल्ली सातपुडयाच्या पायथ्याशी डोंगरखोऱ्यात चिखलदरा तालुका वसलेला असून निसर्गाच अप्रतीम सौंदर्य लाभलेले आहे. याच तालुक्यातील अतिदुर्गम भागात डोमी व मोझरी ही संपूर्ण आदिवासी लोकसंख्या असलेली गावे आहेत. या दोन्ही गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी ज्ञानरचनावाद या अध्यापन पध्दतीचा अवलंब करुन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे उत्तम धडे दिले. आदिवासी विद्यार्थ्यांनी सुध्दा गुरुजींच्या मार्गदर्शनात अभ्यासाचे धडे गिरवुन आपली शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. डोमी व मोझरी ही शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेली साधारण: 200 कुंटुंबाची गावे आहे. दोन्ही गावे ही अमरावती शहरापासून सुमारे दोनशे कि.मी. अंतरावर आहे. दळणवळणाचे किंवा संदेशवहनाचे कुठलेही प्रभावी साधन नाही. विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असूनही या गावातील जि.प. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अध्यापनाची मेहनत घेतली. याची फलश्रुती दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांत उत्तम गुणांकन

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करा - मोहन पातुरकर

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करा                - मोहन पातुरकर * जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न अमरावती,दि.9 : तंबाखू सेवन हे जगामध्ये होणाऱ्या विविध आजारांचे व अकाली मृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. तंबाखू नियंत्रणासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांनी आज बैठकीत दिले. तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंमलबजावणीचा आढावा श्री पातूरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.  बैठकीला डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ.राम ठोंबरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.शंतनू राऊत, समन्वयक डॉ. रामदास देवघरे, समुपदेशक विनोद साबळे, सहकामगार आयुक्त श्री बनाकर, उपायुक्त विक्रीकर, उपायुक्त व्हि. के. पैजने, कृषि विभागाच्या अधिकारी कु.सुप्रीया शिळीमकर, माहिती सहाय्यक विजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. पातूरकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या juvenile justice Act 2016 च्या कलम 77 नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यावर कायदेशीर कारवाई कर