पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे

दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे अमरावती, दि. 30 :   सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय बहुउदेशिय समिश्र अपंग केंद्र वाशिम येथे अंध, मुकबधिर व अस्थीवंग या प्रवर्गातील 6 ते 16 वर्ष या वयोगटातील अपंग लाभार्थ्याना प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेशा साठी अर्ज वाटप सुरु झाले असून प्रवेश अर्जासोबत दिव्यांग बालकाचे तीन पासपोर्ट साईस फोटो, अपंगत्वाचा दाखला, जन्मतारखेचा दाखला अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, पालकाच्या मागील वर्षाचे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. संस्थेत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, वैद्यकीय उपचार इत्यादी मोफत पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण   विकासाकरीता येथे तज्ञ शिक्षकवृंद असतील. प्रवेशाकरीता शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र जुनी जिल्हा परिषद इमारत अकोला नाका, वाशिम येथे 899062957 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र वाशिम यांनी कळविले आहे. ****

विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन                                      अमरावती दि.14-   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.               याप्रसंगी महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसीलदार वैशाली पाथरे यांचेसह अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

विभागीय माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
विभागीय माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन                                      अमरावती दि.14-   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.               याप्रसंगी   कार्यालयातील कर्मचारी श्री. विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, मनीष झिमटे, विश्वनाथ धुमाळ, रुपेश सवाई, कोमल भगत, विजय आठवले यांचेसह सर्व कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 00000000000

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना सुटी

वृत्त क्र .82                                                                                                           दिनांक : 8   एप्रिल 2019 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना सुटी अमरावती , दि. 8   :   अमरावती   लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी खाजगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळवले आहे. या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की अमरावती लोकसभा क्षेत्रातील दुकाने व आस्थापना , निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंन्टर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना मध्ये कार्यरत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून) सर्व आस्थापना सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत बंद ठेवण्यात येतील, तसेच त्यादिवशी बंद राहिलेल्या दुकाने, आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारे कपात करण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी द

एप्रिल आणि मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही

सुधारीत वृत्त क्र .81                                                                                                           दिनांक : 5   एप्रिल 2019 एप्रिल आणि मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही अमरावती , दि. 5   :   सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल व मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे. ****

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही

वृत्त क्र .81                                                                                                           दिनांक : 5   एप्रिल 2019 आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही अमरावती , दि. 5   :   सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2019 साठी आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली असून निवडणूकीच्या कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये. असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल - 2019 व मे- 2019 चे होणारे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे. ****

अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम व तपासणी

वृत्त क्र .80                                                                                                          दिनांक : 5  एप्रिल 2019 अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम व तपासणी अमरावती , दि. 5   :   सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी,डी.टी.एड, बी.एड,व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम जेथे आयुक्त, समावेश सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई (CET) यांचेद्वारे प्रवेश पात्रता ठरविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहिम राबवून तपासणी करण्यात येत आहे. सन 2019-20 शैक्षणिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ.10 वी 12 वी नंतर वैद्यकीय अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी, डी.टी.एड, बी.एड, अन्य व्यावसायिक पदविका /पदवी अभ्यासक्रमाकरिता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैद्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स

अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे विक्री बाबत सतर्कता बाळगावी

वृत्त क्र .79                                                                                                          दिनांक : 3   एप्रिल 2019 अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे विक्री बाबत सतर्कता बाळगावी अमरावती , दि. 3   :   लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत असून बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा बाजारत उपलब्ध होत आहे. आपल्या जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. येता खरीप हंगामात कापूस बियाण्याची खरेदी असतांना सतर्क असण्याची गरज आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये तणाचा होणारा त्रास, मजुरांची उपलब्धता व वाढती मजुरी असे वेगवेगळ्या अडचणी कापूस पिकामध्ये निर्माण झाल्या. याच गोष्टीचा गैर फायदा घेऊन राउुंड अप बी टी/एच टी बी टी/ बी जी-3 तणावरची बी टी विडगार्ड प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तीमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बियाणे अनाधिकृत असून, अशा बियाण्याच्या विक्रीला केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने (GEAC) प्रतिबंध घातलेला आहे.अशा अनाधिकृत,   बोगस व बेकायदेशीर बियाण्याचा पा
वृत्त क्र .78                                                                                                         दिनांक : 3  एप्रिल 2019 नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा         अमरावती , दि. 3   : अमरावती शहरातील अमरावती चांदूररेल्वे रा.मा.297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते अंधविद्यालयापर्यत टप्प्याटप्प्यामध्ये  प्रगतीत होत आहे.  सद्यस्थितीत मालटेकडी ते शाम नगर जाणाऱ्या पोच रस्त्याचे कॉक्रीटीकरण करावयाचे आहे. हा रस्ता वाहतुकीकरिता 30 मार्च 2019 ते 29 एप्रिल 2019 पर्यंत  बंद तशी या विभागास पोलीस विभगाकडून परवानगी प्राप्त आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे