पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत          अमरावती, दि.30:    सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2020-21 व 2021-22 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021पर्यंत आहे.             सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमरावती या कार्यालयातून अर्ज प्राप्त करून परिपूर्ण अर्ज भरून विहित वेळेत सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती माया केदार यांनी केले   आहे.  

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती,   दि. 29 : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सन 2020-21 व 2021-22 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नविन व नुतणीकरणाचे अर्ज भरण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यत मुदत देण्यात आलेली आहे. अनूसुचित जाती, प्रवर्गातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यी व संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागामार्फत दिनांक 31 डिसेंबर पर्यंम सादर करावे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन विद्यार्थ्यांनी परिपुर्ण अर्ज भरुन विहीत कागदपत्रासह विहीत वेळेत अर्ज भरुन सादर करावे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयात अर्ज भरण्याचे आणि विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी आहे. 000000  

भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत

भातकुली व तिवसा                 नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत   अमरावती,   दि. 28 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षित असलेल्या जागा अनआरक्षित करण्यात आल्या असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली व तिवसा नगरपंचायतसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आला असून   निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणूकांचे नामनिर्देशनपत्र आज बुधवार दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरावे. दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी अनुक्रमे शनिवार व रविवारी सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाही. भातकुली नगर पंचायतीसाठीचे नामनिर्देशनपत्र नगर पंचायत भातकुली येथे तर तिवसा नगर पंचायतसाठीचे नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालय येथे सादर करावे. दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासुन भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द

डॅा.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

इमेज
  डॅा.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन              अमरावती,   दि. 27 : शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॅा. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूषसिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            अभिवादन कार्यक्रमाच्यावेळी उपायुक्त सामान्य प्रशासन संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे, तहसिलदार निकीता जावरकर, नाझर पेठे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दहावीची परीक्षा 15 मार्च व बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

  दहावीची परीक्षा 15 मार्च व बारावीची परीक्षा 4 मार्च पासून वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध   अमरावती , दि . 22 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022 मधिल मार्च महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन मंडळाने केले असून परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इयत्ता बारावीची   (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा दिनांक 4 मार्च ते दिनांक 30 मार्च 2022 पर्यंत आयोजित करण्यात आली असून इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च ते दिनांक 4 एप्रिल 2022 पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच इतर माध्यमातून प्रसारीत झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी

अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

  अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर अमरावती , दि . 21 : विभागीय आयुक्त पीयूष सिं‍ह यांनी अमरावती जिल्ह्यासाठी वर्ष 2022 मध्ये स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी सणाच्या पहील्या दिवशी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त आणि दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी लक्ष्मीपूजन सणाच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण अमरावती जिल्ह्यासाठी या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थानिक सुटीचा आदेश अमरावती जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये व अधिकोषांना लागू होणार नसल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   000000  

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

  दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ अमरावती , दि . 7 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा मार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाइन पध्दतीने तसेच पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र   प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तयार विषय घेवून, आयटीआयचे विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने दि.12 डिसेंबर   ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत व विलंब शुल्कासह दि.21 ते दि.28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची होती. परंतु आवेदनपत्रे भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्यामुळे आवेदनपत्रे भरण्यास 18 नोव्हेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 18 नोव्हेंबर ते 6 जानेवारी 2022 पर्यंत माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावे. विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 पर्यंत भरावे. परीक्षा देणऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in   या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भ

महाडीबीटी प्रणालीवरील 2020-21 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

  महाडीबीटी प्रणालीवरील 2020-21 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ   अमरावती, दि . १ 7 : माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन २०२०-२१ वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्र प्रवर्गाकरिता नूतनीकरणाचे अर्ज सादर करण्याकरिता पुन्हा 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संस्था व सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन नूतणीकरणाचे अर्ज नव्याने करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. त्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नूतणीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटि पूर्ततेकरिता SEND BACK केलेले अर्जाची माहीती संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून जिल्हा लॉगिन वर पाठवावी. महाविद्यालयांनी विहित वेळेत अर्ज विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावे. असे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग   यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीमार्फत विविध योजना

इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये पाठ्यक्रम 25 टक्के कमी

  इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये पाठ्यक्रम 25 टक्के कमी    अमरावती, दि . १ 7 : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, २ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तसेच पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी क्रमप्राप्त आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २५ टक्के कमी करुन पाठविण्यात आलेला पाठ्यक्रम सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता राहील.असे  राज्य मंडळाचे  सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 000000

भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा 16 जानेवारीला

  भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा 16 जानेवारीला अमरावती, दि . १ 7 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा- २०२२ च्या पुर्व प्रशिक्षणाकरीता विनामुल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेकरीता ऑनलाईन (Online) पध्दतीने www.siac.org.in आणि www.gpiasamt.org या संकेतस्थळाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 7 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिनांक 9 जानेवारीपर्यंत भरावे. अभिरुप चाचणी (Mock Test) दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार असून सामाईक ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिनांक 16 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेशाकरीता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल 20 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेच्या निकालानंतर वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, (Online) अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.s

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परिक्षा देण्यासाठी 18 डिसेंबर पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावे

  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परिक्षा देण्यासाठी 18 डिसेंबर पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती, दि . १ 5 : शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना   उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.. शैक्षणिक वर्ष २०२२ च्या दहावी बारावी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा १६ सप्टेंबर   ते ०६ डिसेंबर 2021 हा कालावधी दिनांक पर्यंत मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. परंतु आता विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज विलंब व अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याच्या तारखा पूढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विलंब शुल्क शंभर रुपये स्विकारुन   माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विलंब शुल्क प्रती विद्यार्थी पंचविस रुपये स्विकारुन 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज सादर करावे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद

राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा 12 ते 17 डिसेंबरपर्यंत

  राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा 12 ते 17 डिसेंबरपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी अमरावती,दि.१० : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 12 ते 17 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योग-व्यवसाय सहभागी होत आहेत. अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना सूचना अमरावती जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी   या राज्यस्तरीय मेळाव्यात त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे अधिसूचित करावी व त्यांना आवश्यक असलेले कुशल-अकुशल मनुष्यबळाची मागणी ऑनलाइन पद्धतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदवावी. ऑनलाईन मागणी नोंदविताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दूरध्वनी क्रमांक            0721-2566066   य

बारावी परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ

  बारावी परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ अमरावती , दि . 7   : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्याची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने, तसेच व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी व पुनर्परिक्षार्थी आदींसाठी आवेदनपत्रे नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आवेदनपत्रे दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर   या कालावधीत व विलंब शुल्कांसह दि. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत भरावयाची होती. मात्र, महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्यात आली.   आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.     माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आणि व्यवसाय अभ्यास शाखेचे नियमित विद्यार्थी व सर्व पुनर्परिक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन परिक

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू   अमरावती , दि . 6   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2021 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000      

शहरी भागातील पारधी समाजाच्या महिलांकरीता ईलेक्ट्रॅानिक ऑटो रिक्षा वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी

                         शहरी भागातील पारधी समाजाच्या महिलांकरीता                    ईलेक्ट्रॅानिक ऑटो रिक्षा वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी                              15 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे            अमरावती, दि. 2 :   धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातंर्गत पारधी समाजाच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील शहरी भागातील पारधी समाजाच्या (कमीत कमी इयत्ता नववी पास) महिलांकरिता ईलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा वाटप करणे हि योजना डीबीटी तत्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज धारणीच्या प्रकल्प कार्यालयात दि. 15 डिसेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत सादर करावेत. योजनेचे अर्ज वाटप व स्विकृती शासकीय आश्रमशाळा गुल्लरघाट कॅम्प, बाभळी दर्यापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय मोर्शी, उपकार्यालय अपर आयुक्त कार्यालय अमरावती व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी येथे सुरु आहे. अधिक माहिती साठी कार्यालयातील विकास शाखेशी 07226-22421

अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

इमेज
              अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक                            अमरावती दि. 1 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेल्या गुन्ह्यांची प्रकरणे आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांच्या कक्षात आढावा घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या   बैठकीला समाज कल्याणच्या सहायुक्त आयुक्त माया केदार, अमरावती शहरचे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे, अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, नागरी हक्क व संरक्षण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक केशव सुलभेवार, शासकीय अभियोक्ता आदी उपस्थित होते.   ऑक्टोबर अखेर शहरीव ग्रामीण हद्दीत घडलेल्या 13 प्रकरणांचा आढावा श्री बिजवल यांनी घेतला. समितीसमोर आलेल्या प्रकरणांमधील व्यक्तींना तातडीने आर्थिक सहाय्य प्रदान करावे. आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. निधी मागणीची प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. मागील महिनाअखेर शहरी व ग्रामीण भागातील 42 प्रकरणांचे 56 लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर