पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माजी सैनिक रमेश वाढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

  माजी सैनिक रमेश वाढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार अमरावती, दि. 8 : मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयाचे कर्मचारी रमेश पांडुरंग वाढे (माजी सैनिक) हे नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2024 ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्याहस्ते रमेश वाढे यांना शाल, श्रीफळ व गणेशाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. श्री. वाढे यांच्या शिस्त, वक्तशिरपणा आणि कामाप्रती प्रामाणिकता या स्वभावाबद्दल मुख्य अभियंता श्री. जोशी यांनी त्यांचे भरुभरुन कौतूक केले.           श्री. रमेश वाढे यांनी भारतीय सैन्य दलात मराठा रेजीमेंट मध्ये 20 वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 20   वर्षे 3 महिने  सेवा केली आहे. पूर्ण सेवाकाळमध्ये त्यांनी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून एकही तक्रार न होवू देता शिस्तीने व वक्तशिरपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांचा सर्वांप्रती आदर-सन्मानाचा स्वभाव असल्याने ते सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रिय राहीले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सार्वजनिक बा

सारथीचे 20 विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

  सारथीचे 20 विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले अमरावती ,   दि. 06 :   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी, पुणे मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यात ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी परीक्षा मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ज्ञामार्फत झूम मिटिंगचे नियोजन करू
इमेज
                                                 जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण                अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.               सोहळ्याला विशेष पोलिस  महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                सोहळ्याच्या प्रारंभी  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती. डॉ. पाण्डेय यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन,

विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण अमरावती, दि. 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, गजेंद्र बावणे (महसूल), सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे,  विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी  यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. 0000

बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल --मिशन महासंचालक नंदकुमार

इमेज
  बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल                                                                      --मिशन महासंचालक नंदकुमार   Ø   अमरावती विभागाची आढावा बैठक अमरावती, दि.30   :    बांबू हे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पीक असून वातावरणातील सर्वाधिक कार्बन शोषून घेण्याची क्षमता त्यात आहे. बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती, हरित आच्छादनात वाढ, मातीच्या पोतमध्ये सुधारणा व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होते. बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) बांबू लागवडीची कामे  अमरावती विभागात  मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत, असे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी संबंधित यंत्रणांना आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ या विषयावर श्री. नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.   विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, म

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी 10 जूनपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित

  हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी 10 जूनपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित   अमरावती, दि. 29   :    केंद्र शासनाच्या भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था,   बरगढ (ओडिशा) येथील   हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या    तीन वर्षीय (सहा सत्रीय) अभ्यासक्रमांसाठी दिनांक 10 जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी दिली.              भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था, बरगढ (ओडिशा) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून 13 जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. व्दितीय वर्षासाठी तीन जागा असून यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.              हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज 10 जून 2024 पर्यंत नागपूर, सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) प्रादेशिक वस्त्रोद्योग उपआयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात आले आहे. या अभ्यास

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव     अमरावती, दि.   29   : अधिक्षक अमरावती मध्यवर्ती कारागृह येथील शेती विभागातील 47 चिंचफळाच्या झाडावरील चिंचफळाचा लिलाव करावयाचा आहे. त्यासाठी दि. 25 एप्रिल ते    4 मे 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या निविदा 6 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती कारागृह यांच्या कार्यालयात उघडण्यात येईल. तरी इच्छुकांनी निविदा फॉर्म, लिलाव अटीबाबत माहीतीसाठी तसेच चिंच झाडाचे पाहणी करण्यासाठी अधिक्षक मध्यवती कारागृह येथे शासकीय सुटीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.                                                                    0000  

अमरावती विभागात उत्साहात मतदान

इमेज
  अमरावती विभागात उत्साहात मतदान   Ø   दिव्यांग, ज्येष्ठ व नवमतदारांनी उत्साहात केले मतदान Ø   विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी     बजावला मतदानाचा अधिकार Ø   सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान     अमरावती, दि.   26   :   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प यासारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या. विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 53.31 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली. अमरावती लोकसभा मतदारसंघात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सपत्नीक सेंन्ट थॉमस महाविद्यालयाती

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य   ·          शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदार फोटो ओळखपत्रासह (EPIC) इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील 05- बुलडाणा, 06- अकोला, 07-अमरावती, 14-यवतमाळ-वाशिम या चारही लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, दि. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.  त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.   त्यानुषंगाने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्रासह (EPIC Card) आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी के

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

इमेज
  शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना 18 लाख 36 हजार 078 मतदार   बजावणार   मतदानाचा हक्क जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात   354 सर्वाधिक मतदान केंद्र   अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्ही

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

  महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https:// mahadbtmahait.gov.in   संकेतस्थळ   अमरावती दि. 24:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात. सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती