पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अमरावती विभागात तीन नामनिर्देशनपत्र दाखल

इमेज
                                         लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अमरावती विभागात तीन नामनिर्देशनपत्र दाखल अमरावती, दि. 28 :   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एक व बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल   झाली आहेत.           अमरावती लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी उर्फ दीपक यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केलीत.      विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.        विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवार

दुष्काळसदृश भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

  दुष्काळसदृश भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी   अमरावती, दि. 27 : राज्यातील सन 2023-24 मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित शाळा, महाविद्यालयामार्फत शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला तसेच अधिकृत संकेतस्थळावर सादर करावे, असे आवाहन राज्यमंडळ, पुणे च्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.  परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजने अंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पात्रतेच्या आवश्यक माहिती तसेच स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याची माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. या संदर्भात तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ  http://mahahsscboard.in  माध्यमिक शाळांसाठी  http://feerefund.mh-ssc.ac.in  व उच्च माध्यमिक शाळांसाठी  http:

निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) - लेख

इमेज
  निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) ‘भारत निवडणूक आयोग’ ही   भारत सरकारच्या   अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर   इ.स. 1993   पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. राजीव कुमार   हे 25 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ? सार्वत्रिक निवडणुका मुक्त , निर्भय व पारदर्शक वातावर

19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा; अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती

  19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा; अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती             अमरावती, दि. 14 (विमाका) : कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता विभाग व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 19 मार्च रोजी डॉ. के. जी देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस या नामाकिंत कंपनीत अतांत्रिक पदांसाठी भरती होत असून या संधीचा इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द. ल ठाकरे यांनी केले आहे.           ‘टीसीएस’मधील अतांत्रिक पदांसाठी बीए, बीकॉम, बीसीए, बीएएफ, बीबीआय, बीबीएम, बी. एस्सी. (कृषी शाखेतील पदवी वगळता) आदी शैक्षणिक पात्रता असणा-यांना अर्ज करता येईल. 2022,2023 आणि 2024 या वर्षात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार सहभाग घेण्यास पात्र आहेत.   सहभाग नोंदविण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी   https://

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत

  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा   समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत   अमरावती, दि.13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. उपरोक्त नमूद केलेल्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता पुढीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबविण्याच्या सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत. महाडीबीटी प्रणालीची वेब लिं

कृषी विभागाच्या ‘कृषि सेवक’ पदाचा निकाल जाहीर

  कृषी विभागाच्या ‘कृषि सेवक’ पदाचा निकाल जाहीर निकालपत्रक  www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध अमरावती, दि. 12 :    कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांच्या आस्थापनेवरील भुतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सेवक गट क या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला असून निकालपत्रक  www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे. गट क संवर्गातील कृषी सेवक या पदांसाठी सरळसेवेने पद भरतीसाठी जाहीरात दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहीरातीस अनुसरुन दि. 16 व 19 जानेवारी 2024 या दिवशी इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेमार्फत विविध परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडुन सदर परिक्षेचे निकालपत्रक नुकतेच विभागाला प्राप्त झालेले आहे. सदर निकालपत्रक कृषी विभागाच्या      www.krish

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्याकडून जखमींची विचारपूस

इमेज
  विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्याकडून जखमींची विचारपूस अमरावती, दि.12 : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ सोमवारी (ता.11 मार्च) पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज रेडियंट हॉस्पीटलला भेट देवून आस्थेने विचारपूस केली. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना त्यांनी रुग्णालयाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशव्दाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांचे गत तीन दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरु होते. काल सोमवारी (ता.12 मार्च) सायंकाळी  आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्हा प्रशासनाचा संयुक्त बैठकीचा प्रस्ताव आंदोलकांनी अमान्य करुन जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटचे नुकसान केले. पोलीस वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासा

महिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तीन दिवसीय जागतिक महिला दिन महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

इमेज
  महिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे                   -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   तीन दिवसीय जागतिक महिला दिन महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप   अमरावती, दि.9 : महिलांना संधी दिल्यास त्या आपल्या कतृत्वाचा मेहनतीने ठसा उमटवितात. काही तरी नवीन करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाल्याने त्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. महिलांनीही स्वत:ला कमजोर न समजता, दिलेल्या सर्व संधीच स्वकतृत्वाने सोनं केलं पाहिजे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी उपस्थित तमाम महिला भगिनींना केले. जिल्हा परिषद प्रशासन, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदान येथे स्वयंसहाय्यता बचत गटांचे ‘वैदर्भी जिल्हा प्रदर्शनी’ व जागर स्त्री शक्ती कार्यक्रम आणि अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत तीन दिवसीय कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विजेता ठरलेल्या महिला बचतगट, ग्राम पंचायतींना पालकमंत्री श्री. पाटील

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी महापालिकेने अधिकाधिक लक्ष केंद्रीत करावे -पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या 14 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

इमेज
  विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी महापालिकेने अधिकाधिक लक्ष केंद्रीत करावे -पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील   पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या 14 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण   अमरावती, दि. 9 : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून भरीव निधी उपलब्ध करुन दिला जातो. ज्याप्रमाणे स्वत:चे घर उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष घालतो, त्याप्रमाणे जिल्ह्याची पायाभूत विकासकामे पूर्णत्वास नेताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.           अमरावती महापालिकेच्या अखत्यारितीतील सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने महापालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासद