पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू

  समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू   अमरावती, दि. 17 : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार   जिल्हा स्तरावर मुलां-मुलींचे प्रत्येकी १ वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. मुलांचे एक व मुलींचे एक अशा दोन वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे. सद्य:स्थितीत जमीन प्राप्त न झाल्यामुळे भाड्याच्या इमारतीमध्ये वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत.   १०० विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठीच्या २ वसतिगृहांकरिता साधारणत: २० हजार चौ.फुट परिपूर्ण बांधकाम असलेली तसेच, निवासी वापरासाठी सर्व सोयी-सुविधा असलेली इमारत भाड्याने घ्यावयाची आहे. इमारतीचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ठरविण्यात येईल. त्यानुसार स्थानिक इच्छुक जागामालकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमरावती, सामाजिक न्यायभवन पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती (दूरध्वनी ०७२१-२६६१२६१) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. ०००००००  

परतवाड्यात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृहाची सुविधा निर्माण करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

इमेज
  परतवाड्यात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण     आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृहाची सुविधा निर्माण करणार -           आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित   अमरावती, दि. 17 : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे, तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल. जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल. त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितले.     परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. एकच्या इमारतीचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.   मंत्री श्री. गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिकताना निवासाची सुविधा असावी म्हणून वसतिगृहे आवश्यक आहेत. त्यामुळे आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यात येतील. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अथक प्रयत्न करून

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

इमेज
  आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार   गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन   अमरावती, दि. १७: नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते आज करण्यात आले.             शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ३६० विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १५ खोल्या व १ अभ्यासिका राहणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने १३ कोटी ३ लाख ११ हजार रुपये मंजूर केले आहेत. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्र. गृहप्रमुख गायत्री पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आदिवासी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडीअडच

फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

इमेज
  पारधी फासेपारधी समाजबांधवांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम                                                            - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित   अमरावती, दि. 17 : पारधी-फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. मुलांना प्राथमिक शिक्षण सहज व सोप्या भाषेत आत्मसात होण्यासाठी  दृकश्राव्य माध्यमे व चित्रफीतींचाही अध्यापनात प्रभावी वापर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले.  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे पारधी फासेपारधी समाज जनजागृती मेळाव्याचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदीले, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकु

मुलांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

  मुलांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा -           आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बडनेरा येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन   अमरावती, दि. 17 : आदिवासी, पारधी मुला-मुलींसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी समाज बांधवानीही आपल्या मुलांना शाळेत शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज बडनेरा येथे केले. सार्वजनिक बांधकाम आदिवासी मंडळ, नागपूर आणि अमरावती तसेच सार्वजनिक बांधकाम आदिवासी उपविभाग, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने बडनेरा येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेजवळील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवि राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, सामाजिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता गणेश रंभाड, अधीक्षक अभियंता

पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
  पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   अमरावती, दि. 10 : ‘पीए मित्रा ’ टेक्सटाईल पार्कमध्ये अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून त्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल व  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पार्क उभारणीसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम पंधरा दिवसात पूर्ण व्हावे, असे निर्देश  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.   पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या भूसंपादनासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत हे यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार श्वेता  महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय,  प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विपीन शर्मा सभागृहात उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की,

मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार            -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   अमरावती, दि. 10:   रिद्धपुर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी समिती 15 दिवसात स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रिध्दपूर येथे केले. रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत श्री. फडणवीस यांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे आढावा घेतला व त्यानंतर श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री गोविंदप्रभू राजमठ, श्री यक्षदेव बाबा मठ, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्राला भेट दिली. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार परिणय फुके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 वे जयंती वर्ष शासन साजरे करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
  भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 वे जयंती वर्ष शासन साजरे करणार -           उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ø    शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात भाऊसाहेबांचे कार्य दीपस्तंभासारखे Ø   पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती आणि स्मृती केंद्रासाठी निधी देणार   अमरावती, दि 10 जिमाका:    भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलीत, शेतकरी, शेतमजुर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या    संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील अशी ग्वाही देतानांच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणुन त्यांचे    125 वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.     शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव    देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस बोलत होत