पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर * संकेतस्थळावर मिळणार निकाल अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल बुधवार, दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता जाहिर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर त्यांचा निकाल बघता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर बुधवार, दि. 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली. ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त)

राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

 राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी मंत्रिमंडळाने केले अभिनंदन अमरावती, दि. 25 :  राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.  काल 23 जुलै रोजी या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले. या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल अशी एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली. कोव्हिड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

इमेज
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन अमरावती, दि. 23 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ***** *****

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती, दि. 13 : अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम , अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप व रबी हंगाम वर्ष 2020-21 पासून तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह 31 जुलै पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे.               या योजनेचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाचा आहे. खातेदाराचे व्यतिरिक्त कुळांने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 ट

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू - राज्यमंत्री बच्चू कडू

इमेज
प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू              - राज्यमंत्री बच्चू कडू Ø पाचवीचे 21 जुलैपासून ऑनलाईन वर्ग Ø सक्तीने शुल्‍क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई Ø पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी अमरावती, दि. 9 : राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच 21 जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू करण्यासंदर्भात आज येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले, खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्

विभागीय लोकशाही दिन

विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाने पाठवाव्या अमरावती, दि. 8 : दर   महिन्यांच्या   दुसऱ्या सोमवारी   विभागीय लोकशाही   दिनाचे आयोजन करण्यात येते.   परंतू कोविड - 19 च्या आपात्कालीन परिस्थितीमुळे या महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे. नागरिकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनातील तक्रारी, विभागीय आयुक्त कार्यालयात पोस्टाव्दारे   किंवा   dcg.amravati@gmail.com - dcg amravati@rediffmail.com       या   ई मेलवर   पाठवाव्या   असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह   यांनी केले आहे.

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान

इमेज
माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान Ø नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी Ø कार्यालय पेपरलेस होण्यास मदत Ø ‘टेलिग्राम ’ वरून दररोज माहिती अमरावती, दि. 7 : लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या   सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.             राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला पहिला अर्
इमेज
विभागीय   आयुक्त   कार्यालयात वसंतराव नाईक   यांना   अभिवादन अमरावती ,  दि .  1  :  येथील विभागीय   आयुक्त   कार्यालयात   आज   विभागीय   आयुक्त   पियूष   सिंह   यांनी   वसंतराव नाईक यांच्या   जयंतीनिमित्त   त्यांच्या प्रतिमेला   पूष्पहार   अर्पण   करून   अभिवादन   केले . यावेळी   उपायुक्त   गजेंद्र   बावणे ,  संजय   पवार ,  प्रमोद   देशमुख ,  तहसिलदार   वैशाली   पाथरे ,  नाझर   श्री .  पेठे   यांच्यासह   आधिकारी  -  कर्मचारी   उपस्थित   होते .