पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिनोत्सव, विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

  भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिनोत्सव   विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना     अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, उपायुक्त (विकास) राजीव फडके, उपायुक्त (नियोजन) हर्षद चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, तहसीलदार संतोष काकडे, संतोष डोईफोडे, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.   0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण

  प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण   अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात आज उप सचिव देविसिंग डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोगातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व पोलीस कर्मचाऱ्यांकडून मानवंदना याप्रमाणे कार्यक्रम सपन्न झाला. 0000

शेगाव (जि.बुलडाणा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार

  शेगाव  (जि.बुलडाणा)  येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार ऑनलाईन नोंदणीसाठी  www.rojgar.mahaswayam.gov.in   संकेतस्थळ   अमरावती, दि. 29 :  नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव, जि. बुलडाणाय येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 23 कंपन्या, उद्योगसमुह, कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे 1 हजार 227 कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास

मुलांच्या अनुरक्षणगृहासाठी इमारत मिळण्याबाबत आवाहन

  मुलांच्या अनुरक्षणगृहासाठी इमारत मिळण्याबाबत आवाहन   अमरावती, दि. 30 :   महिला व बाल विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय मुलांचे अनुरक्षणगृहासाठी अमरावती शहरात 650 वर्ग मीटर बांधकाम असलेली इमारत भाडे तत्वावर मिळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ज्या इमारत मालकाकडे 650 वर्ग मीटर बांधकामासह सर्व सोयीसुविधा असलेली इमारत उपलब्ध असेल, त्यांनी अधिक्षक, शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, जुन्या गोपाल टॉकीज जवळ, राजापेठ, अमरावती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, संपर्क क्रमांक दुरध्वनी क्र. 0721-2650533, भ्रमणध्वनी क्र. 7385155112    असा आहे. 0000

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळबाबत सूचना जारी

  इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळबाबत सूचना जारी           अमरावती दि. 24 :   उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.   इ. दहावी व इ. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाजघटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु, प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी - मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार क

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

इमेज
  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन अमरावती, दि. 23 : आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.             यावेळी  सहाय्यक  आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000
इमेज
  विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा                                                          - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय         विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी      अमरावती, दि. २१ :  लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून  आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.  निधी पाण्डेय यांनी दिले.                लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.२० जानेवारी) लोणार येथे घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.              श्रीमती पाण्डेय म्हणा

मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ, प्रगणकांना सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

  मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ   प्रगणकांना सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन                 अमरावती, दि. 22 : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.                  राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे हे काम 23 ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत.               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वेक्षणाबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकाला प्रत्येक घरातून अचूक माहिती दयावी, असे आवाहन केले आहे. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. ते 23 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्

विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा

इमेज
  विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा                                                         - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय         विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी      अमरावती, दि. २१ : लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून   आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.   निधी पाण्डेय यांनी दिले.                लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.२० जानेवारी) लोणार येथे घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.              श्र

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024 स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम

  महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024 स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी   महाविद्यालयाचा प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम अमरावती, दि. 17 :   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे दि. १२   ते १५ जानेवारी   या कालावधीत राज्यस्तरीय महाविद्यालय व विद्यापीठातील तरुण संशोधकांचे आविष्कार 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्पकता, नाविन्यता, विचार, शोध, प्रतिभा, प्रगटीकरण, संशोधन या सर्व गुणांची कमी अधिक असणाऱ्या या स्पर्धेत अभियांत्रिकी विषयातील पदवी गटात अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या अंतीम वर्षाचा विद्यार्थी ‘प्रतीक रघुवंशी’ याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या संशोधनाचा विषय "एबल ग्लारोरा-ए नॉन सर्जिकल अँड नॉन अधेझिव्ह टाईप स्मार्ट बोन कंडनशन हिअरिंग एड युझिंग डोग ट्रान्राड्युरार" (Able Glasses A Non Surgical and Non Adhesive type smart bone conduction hearing aid using dome transducer) असा होता. प्रतिकच्या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयीन   शिक्षकगण व अभियांत्रीकी क्षेत्रातील संशोधकांनी कौतूक केले आहे
इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन   अमरावती, दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

  दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ   अमरावती दि. 12 :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी करिता खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज फॉर्म नं १७ अतिविलंब शुल्काने ऑनलाईन भरता येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव निलिमा टाके यांनी कळविले आहे. इयत्ता १० वी व १२ वीसाठी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन २० रूपये या प्रमाणे स्विकारण्यात येईल, तसेच नावनोंदणी अर्ज सादर करण्याची तारीख बुधवार दि. १७ जानेवारी   २०२४ कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी                http://form17.mh-ssc.ac.in   बारावीच्या विद्यार्थ्यांनी   http://form17.mh-hsc.ac.in   या संकेतस्थळावर अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड,

‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

  ‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी         अमरावती, दि. 12  :   पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आई महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. हे धोरण पर्यटन संचालनालयाव्दारे राबविण्यात येणार असून महिलांसाठी पंचसुत्री जाहिर केली आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत.                 पर्यटन संचालनालयामार्फत सवलती याप्रमाणे : पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकींच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन जमिन, हवा, जल पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी ॲण्ड बी. रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, व्होकेशल हाऊस, पर्यटन व्हिला, एजन्सी इ. पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या रूपये 15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता  करण्याचे आवाहन अमरावती, दि. 09 :    राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार ( RoR  नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासना च्या निर्देशानुसार  दिनांक 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्या त येत आहे.  या अनुषंगाने डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  (PM KISAN)  योजना सुरु केली आहे. या

मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत सादर करा

  मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत सादर करा            अमरावती, दि. 09 :    अमरावती विभागातील    अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा सांख्यकीय माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल, विकास, रोजगार व उद्योजकता    उपआयुक्त द. ल. ठाकरे यांनी    केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांची               (एकुण स्त्री/पुरुष) अशी सांख्यीकी माहीती प्रत्येक तिमाहीस, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-१ (ER-१) मध्ये नियमीतपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व