पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा                                                        - पालकमंत्री प्रवीण पोटे - पाटील                   अमरावती , दि . 27 : वैद्यकीय सेवा पत्करतांना डॉक्टरांनी गोर - गरीब रुग्णांची सेवा करण्याची शपथ घेतली असते . तुमच्या वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळवून देणे , यासारखे इतर कुठलेही पुण्य काम असून शकत नाही . यामुळे रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे , असे मत पालकमंत्री प्रवीण - पोटे   यांनी व्यक्त केले .            शनिवार 24 मार्च रोजी , येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ‘ आरोग्य संजीवनी -2018’ स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम , जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉक्टर्स , आरोग्य विभागाचे अधिकारी - कर्मचारी आदी उपस्थित होते .   प्रारंभी कार्यक्रमात पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्य
लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा -2012 पॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी                        - किशोर रोही * पॉस्को व जुवेनाईल जस्टीस कायदया विषयी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न                   अमरावती , दि . 26 : लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण 2012 (Protection of Children from Sexual Offences Act 2012- POCSO) हा कायदा , कायदेशास्त्रातील एक क्रांतीकारी पाऊल आहे . लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण कायदा आल्यामुळे कायदेशास्त्रात एक इतिहास रचलेला आहे . न्यायमंडळांनी पॉक्सो कायदयाची प्रभावी अमंलबजावणी करुन लैगिंक गुन्ह्यांत बळी पडलेल्या मुलांचे पुनवर्सन करावे , असे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किशोर रोही यांनी सांगितले .                  रविवार , 25 मार्च रोजी येथील पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे अमरावती विभागातील पॉक्सो कायदयाचे न्यायाधीश व बाल न्याय मंडळाचे न्यायाधीशांकरीता पॉक्सो   आणि जुवेनाईल जस्टीस कायदयासंबंधी एक दि
महिलांनी उद्योग उभारुन इतरांना रोजगारक्षम करावे                                     - पालकमंत्री प्रवीण पोटे - पाटील * ‘ अस्मिता योजना ’ महिला बचत गटाव्दारे राबविणार * महिला किसान सशक्तीकरण परियोजना , श्रीमती सुमतीबाई सुकळीकर उद्योगीनी योजनांव्दारे महिलांचे सक्षमीकरण अमरावती , दि . 24 : महिलांचा सर्वांगिण विकास व सक्षमीकरणासाठी   शासन अनेक उपक्रम राबवित आहे . महिला बचत गटांनी स्वत : चा उद्योग उभारुन आर्थिक स्थैर प्राप्त करणे आवश्यक आहे . यासाठी महिलांनी लघु व गृह उद्योग उभारुन आपल्या क्षेत्रातील इतर महिलांना रोजगार मिळवून द्यावा , असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे - पाटील यांनी आज केले .                      महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सांयन्स कोअर मैदानावर आयोजित ‘ विकास गंगोत्री ’ या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते आज करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी खासदार आनंदरा