पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे - राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू

इमेज
                चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे                            - राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू Ø   सिंचन प्रकल्पांवर नावीन्यपूर्ण संकल्पना राबवा Ø   भूसंपादनात नियमांचे पालन करावे अमरावती, दि. 19 : येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येऊ नये, यासाठी पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, तसेच चार महिने पुरेल असा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. आज येथील सिंचन भवनात श्री. कडू यांनी जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अ. ल. पाठक, अधिक्षक अभियंत आशिष देवगडे, रश्मी देशमुख, नरेंद्र तायडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील 32 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रातूनच या गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश देऊन त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव, खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाचे दोन हजार कोटी खर्च होणे

दुष्काळग्रस्त/टंचाइग्रस्त भागातील इयत्ता 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मा

  दुष्काळग्रस्त/टंचाइग्रस्त भागातील इयत्ता 10 व 12 वीच्या   विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ               अमरावती दि. 10 : शैक्षणिक वर्ष 2017-2018 व 2018-2019 मधील खरीप हंगामातील/दुष्काळग्रस्त भागातील इ.10 वी व 12 वीचे विद्यार्थी परीक्षा शुल्क   माफीस पात्र असून अद्याप ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या/पालकांच्या-आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.             सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इ.10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.             याबाबतची माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इ. 10 वी साठी   http://freefund.mh-ssc.ac.in इ. 12 वी साठी http://freefund.mh-hsc.ac.in ह्या लिंकवर प्रसिध्द करण्यात

लेख

  लेख युगस्त्री सावित्रीबाई फुले व्यक्तित्व आणि कर्तृत्व   सावित्रीबाईंची थोरवी   त्यांच्या कर्तृत्वातून दिसतेच, पण त्यांच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला तर लक्षात येते की, स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणाऱ्या सावित्रीबाईंमध्ये आत्मविश्वास ठासून भरला होता. ‘स्त्री-पुरुष समानता’ या शब्दांशी दूरदूरपर्यंत आपला संबंध नव्हता. अगदी आजच्या स्त्रियांनादेखील अशी कोणती समानता असते अशी पुसटशी कल्पनाही आतापर्यंत नव्हती. नरक यातना भोगणारा स्त्री जन्म सर्व प्रकारच्या ज्ञानापासून अनभिज्ञ होता. उच्चवर्णीय जातीतील काहींनी स्त्रियांचे जगणे महाकठीण केले होते. त्यावेळी असंख्य समस्यांनी स्त्रिया वेढल्या होत्या. त्यांच्या समस्यांचा आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा अंत नव्हता. या परिस्थितीच्या विरुध्द आवाज उठवावा एवढी शक्तीही स्त्रियांमध्ये नव्हती व संघर्षाची समजही त्यांच्या ठायी नव्हती. ‘नशिबाचे भोग’ म्हणून स्त्रिया आपले आयुष्य कंठत असे. तत्कालीन परिस्थीतत आवाज उठविण्याचे धारिष्ट्य कुणातच नव्हते. अशात प्रथमच ह्या उच्चवर्णिय जातींच्या वर्तनाविरुध्द आवाज उठविल्या गेला.                   स

विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या

                                                                      विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या               अमरावती दि. 9 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 8 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने झाल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले.             सामान्य नागरीकांनी त्यांच्या समस्या, विभागीय लोकशाही दिनामधील तक्रारी पोस्टाद्वारे तसेच  dcgamravati@gmail.com/dcg_ amravati@rediffmail.com   या ई-मेलद्वारे पाठवाव्या, असे संजय पवार, उपआयुक्त (सा.प्र), अमरावती यांनी कळविले आहे.

विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

  विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन               अमरावती दि. 5 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार दि. 8 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जारी केलेल्या सुचनांचे पालन करुन लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे सदर विभागीय लोकशाही दिनामध्ये स्वीकृत अर्ज असणाऱ्या अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी केले आहे.   00000    

राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय स्तरावरील कार्यालय स्थापन

  राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय स्तरावरील कार्यालय स्थापन                                                                        महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय स्तरावर कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. दि.8 मार्च रोजी जागतिक दिनाचे औचित्य साधून राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय कार्यालय, दत्तात्रय सदन, दसरा मैदान मार्गावरील देशपांडेवाडी येथे सुरु करण्यात येत आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या अमरावती विभागातील पाचही जिह्यांमध्ये महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन कडुन सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्वाच्या गंभिर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे (Suo Moto) नोंद घ्यावयाच्या तक्रारी बाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित/नियोजीत सुनावण्या ह्या ऑनलाईन पदधतीने घेण्यात येतील. राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय कार्यालय,

“गिफ्ट तिलापिया हॅचरी मत्स्यबीज” शेतक-यांसाठी ठरणार वरदान - प्रादेशिक उपायुक्त श्री. विजय शिखरे

  “ गि फ्ट तिलापिया हॅचरी मत्स्यबीज ” शेतक-यांसाठी ठरणार वरदान                                                                      - प्रादेशिक उपायुक्त श्री. विजय शिखरे   आतापर्यंत गि फ्ट तिलापियाच्या मत्स्यबीजासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथिल एमपेडाच्या हॅचरीवरच अवलंबून रहावे लागत होते. इसापूर केंद्रामध्ये गि फ्ट तिलापिया मत्स्यबीज उत्पादन सुरू झाल्याने हे विदर्भ-मराठवाड्यातील किंबुहना महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी मोठे वरदान ठरेल ” असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त श्री. विजय शिखरे यांनी केले. 28 फेब्रुवारी - राष्ट्रीय वि ज्ञा न दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र , इसापूर येथे गि फ्ट तिलापिया मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या उ द्घा टन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. विजय हापसे, श्री. अजय मेसरे , श्री. भूषण सानप व श्री. नयन पिंगलवार आणि वेस्टकोस्ट फ्रोझन फू ड्सचे तंत्रज्ञ श्री. दिपेश कदम, श्री. अमोल राठोड, श्री. कृष्णा तिवारी, श्री. प्रवेश दुबे व इत