पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावती विभागातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांना ४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी

  अमरावती विभागातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांना ४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी अमरावती दि 30:   राज्यातील नामांकित नियोक्तांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक   30 तसेच ३१ मार्च २०२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित केला आहे. ऑनलाईन विभागीय रोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकित कंपन्या आस्थापनांमध्ये ४२५ रिक्त जागेवर विभागातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळविण्याची संधी मिळणार आहे. रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आय. टी. आय. (सर्व शाखा)/ स्थापत्य, मेकॅनिक, ईलेक्ट्रॉनिक्स पदवीधर व पदविकाधारक तसेच इतर सर्वशाखीय पदवीधर असणा-या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या (एम्पॉयमेंट कार्ड) युझरनेम व पासवर्डच्या माध्यमातून मेळाव्यात सहभागी होता येईल.

कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी

इमेज
  कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी -                                                                                                     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर    कामगारांची आरोग्य तपासणी व किट वाटप   शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन              नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप             अमरावती दि29: बांधकाम क्षेत्रात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करून   तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे निर्देश   जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधा व विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.             नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता आरोग्य तपासणी, माध्यान्ह भोजन, घरेलू कामगार नोंदणी, ई- श्रम कार्ड वाटप व अत्यावश्यक सुरक्षा किट वाटपाबाबत तिवसा येथे   शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगार विभाग,

विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी / तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

इमेज
  विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी                                                           - ऍड. यशोमती ठाकूर रासेयोच्या निवासी श्रम शिबीराला पालकमत्र्यांकडून भेट            अमरावती दि 29:   विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराचे, सर्वधर्मसमभावाचे मूल्य रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनच्या माध्यमातून केले जाते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी. जीवनात सेवा व त्याग या मूलमंत्राचा स्वीकार करून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी येथे केले.             कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत तिवसा तालुक्यातील शेंडोळा खुर्द येथे शासकीय   औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनच्या निवासी श्रम संस्कार शिबिराला श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या.                    जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा आमले, तिवस्याच्या पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखेडे, तिवसा सरपंच मुकुंद पुनसे, शें

रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली

इमेज
  रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली                             आईच्या तेरवीतही जपले वेगळेपणा   अमरावती दि 25 (विमाका) : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या तेरवी निमित्त अचलपुर तालुक्यातील घाटलाडकी, आसेगाव पुर्णा, कुऱ्हा, चमक खुर्द, शिरजगाव कसबा येथे रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबीर व शववेटी वाटप करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात युवकांनी रक्तदान करुन स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेले तेरा दिवस विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन राज्यमंत्र्यांनी त्यांच्या आईच्या तेरवीचे वेगळेपण जपले.   काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेरा दिवसांमध्ये अनेकांनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली. तेव्हापासुन त्यांनी त्यांच्या आईंच्या आठवणींना उजाळा देत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.   दररोजच्या किर्तनासह दिनांक 21 ते 26 मार्च पर्यंत ग्रामस्थांकरीता रोगनिदान व उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राज्यमंत्री श्री. कडू

विभागीय आयुक्त कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन अमरावती, दि. 23 (विमाका) : शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, सहा. आयुक्त (मागासवर्ग) विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, श्री पेठे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले. 00000

युवकांसाठी 24 रोजी रोजगार भरती मेळावा

  युवकांसाठी 24 रोजी रोजगार भरती मेळावा अमरावती दि.22 (विमाका): युवकांना रोजगार प्राप्त होण्याच्या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या एन.एस.सभागृहात शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात रेमंड, डेनिम, अद्वैक हाय टेक पुणे, युनी पोल शिकरापुर अहमदनगर, वेलमेड लॉकींग चाकण, मिंडा कॉरपोरेशन, टाटा असल आदी ठिकाणाहुन विविध कंपन्या येणार असुन आयटीआय उत्तिर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे संस्थेच्या प्राचार्या एम.डी.देशमुख यांनी केले आहे. 000000

ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही - ॲड. यशोमती ठाकू

इमेज
  ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही                                                                        -         ॲड. यशोमती ठाकूर तिवसा तालुक्यात   6 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन          अमरावती, दि.20 (विमाका) : जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळनासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिवानखेड येथे दिली. आज तिवसा येथील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विकासकामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे दिवाणखेड येथे 11 लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, 20 लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

  विभागीय लोकशाही दिन सोमवारी   अमरावती, दि. 11 :- दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त का र्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निग डि त आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकर णे , निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीं पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त   कार्यालयात हजर   राहावे. तसेच उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपायांचे पालन करावे असे   विभागीय उप आयुक्त संजय पवार यांनी क ळविले आहे. 000000    

मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे/आदिवासी भागात सांस्कृतीक संकुल बांधण्याच्या योजनेकरीता 21 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे

                                      मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती दि. :- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्योत्पादन, सर्वेक्षण इत्यादी बाबींसाठी प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील माहितीचे संकलन करुन, संकलित केलेली माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याकरीता अमरावती विभागातील प्रादेशिक कार्यालयांतील मत्स्यव्यवसाय विभागामध्ये कंत्राटी पध्दतीने एकूण सहा डाटा एन्ट्री ऑपरेटर या   पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे. असे आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे. या पदांचे नियुक्ती कार्यक्षेत्र अमरावती. अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी राहील. उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा दिलेल्या ई-मेल द्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात सादर करुन अर्जाची एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास व ई मेलवर सादर करावी. दि. 14 मार्च 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक
                             राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी                               विद्यार्थ्यांनी 11 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती दि.8 :- अनूसुचित जातीच्या (नैवबौध्दंसहीत) विद्यार्थ्यांनी देशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुकत डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.                राज्यातील अनूसुचित जातीच्या नवबौध्द विद्यार्थ्यांसह 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ , संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क इत्यादी शुल्क रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वीत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्