पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी - पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

इमेज
  पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची   अंमलबजावणी त्वरीत करावी -          पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर Ø   पाणी टंचाई आढावा बैठकीत दिले निर्देश      अमरावती दि.28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई   निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे, अनिल उनराखे, मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे, उपसभापती सोनाली नवले, सदस्य रुपाली पुड, जया कळसकर, माया वानखेडे, सुनिल कडु, भाऊ छापाने, शंकर उईके, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी रविंद्र पवार, आदी उपस्थित होते. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यत

राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया - राज्यमंत्री बच्चू कडू

इमेज
  राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया -          राज्यमंत्री बच्चू कडू Ø नागरवाडी येथे भक्त निवासाचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन         अमरावती, दि. 24 : संत गाडगेबाबा यांना समाजाला मानवतेच्या मुल्यांची शिकवण दिली. तळागाळातील सर्वांपर्यत त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन ज्ञानदान केले. लोकांशी संवाद साधुन त्यांनी समाजात स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा, शिक्षण, मुर्तिपुजा याबाबत जनजागृती करण्याची किमया साधली. माणसांमध्ये देव पाहणाऱ्या गाडगेबाबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व स्फुर्तिदायी आहे. गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श आपण डोळयासमोर ठेवुन शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगीतले.                      5 कोटी निधीतुन श्रीक्षेत्र नागरवाडी विविध कामे गाडगे बाबा जयंती महोत्सव चांदुर बाजार येथील नागरवाडी येथे साजरा करण्यात आला. नागरवाडीतील भक्तनिवासचे भूमिपूजन (दि.23) राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. तिर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत अंदाजे पाच कोटी र

संत गाडगेबाबा यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

इमेज
  संत गाडगेबाबा यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन अमरावती, दि. 23 : थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 000000

शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे - राज्यमंत्री बच्चू कडू

इमेज
                                 शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे                                                                    - राज्यमंत्री बच्चू कडू   अमरावती दि 22: शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन कामगार व शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले. अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनला ( दि.18) त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, सहसंचालक एम. पी. वाडेकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सहा. संचालक (तांत्रिक) एम.एम. अंधारे, पी. एम. भुयार, विभाग प्रमुख व अधिव्याख्याता उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. कडू म्हणाले, शिक्षित व तंत्रकुशल वर्गाने आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील समाजासाठी करावा. शेतकरी, मजुर बांधवाच्या हिताचे संशोधन व उपक्रम वेळोवेळी राबवावे. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक बा

इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध/दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत

  इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र   संकेतस्थळावर उपलब्ध अमरावती, दि. 21 (विमाका) :   इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या परिक्षांचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च - एप्रिल २०२२ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्याव्या. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.                                                             0000000 वृत्त क्र.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ साठी प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२१   साठी प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन           अमरावती, दि. 21 (विमाका) :   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून   दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका कार्यालयात सादर कराव्या.            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या   www.maharashtra.gov.in   आणि महासंचालनालयाच्या   dgipr.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्

23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल पर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान - राज्यमंत्री बच्चू कडू

इमेज
  23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल पर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान                                                                                                                  - राज्यमंत्री बच्चू कडू Ø   महिला व बालविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा   अमरावती दि 18: महिला व बालविकास   विभागाकडून बालसंगोपन योजना व अनाथ बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचवण्यासाठी येत्या 23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल या कालावधीत अचलपूर व चांदुर बाजार येथे नोंदणी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकित दिले. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सखोल आढावा शासकिय विश्रामगृहात आज त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकासचे विभागीय उपायुक्त सुनिल शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कोलखेडे, राजेश वानखेडे, मंग

संत श्री.रविदास महाराज यांना अभिवादन

इमेज
  संत श्री.रविदास महाराज यांना अभिवादन अमरावती,दि.१ 6 :  समाजाला मानवता आणि समानतेची शिकवण देत सामाजिक एकतेचा संदेश देणारे   संत शिरोमणी श्री.रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज १ 6   फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी संत श्री. रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी संजय पवार उपायुक्त (सा.प्र.), श्यामकांत म्हस्के सहा.आयुक्त (भूसुधार), विवेकांनद काळकर सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग), तहसिलदार वैशाली पाथरे आदी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा संत श्री.रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

धनगर समाजातील महिला नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना

  धनगर समाजातील महिला नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना                 पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन -          प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे अमरावती दि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत स्टँडअप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे. धनगर समाजातील नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेत लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांना प्रकल्प किमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन दिला जातो. त्याच धर्तीवर भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य केले जाते.                         अशी आहे तरतूद   या योजनेत प्रकल्प किमतीच्या 75 टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावा लागतो. लाभार्थ्यांने भरावयाच्या 25 टक्के निधीपैकी केवळ 10 टक्के निधी लाभार्थ्याला द्यावा लागत