पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर

इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर ·          www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध ·          आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतीम मुदत 19 जुलै अमरावती, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in   किंवा www. mahahsscboard.in   या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षासाठी परीक्षा अर्ज नियमित शुल्क भरुन दि. 3 जुलै ते 14 जुलै पर्यंत स्वीकारण्यात यईल. विलंब शुल्क भरुन दि. 15 जुलै ते 19 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल. उच्च माध्यमिक
इमेज
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन अमरावती,  दि. 31 : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी   राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महसूल उप आयुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उप आयुक्त रमेश मावस्कर यांचेसह अन्य विभागाचे उप आयुक्त, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू अमरावती , दि . 30   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी, डॉ. नितिन व्यवहारे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 30 मे ते 13 जून 2019 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्र

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका      प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्र अमरावती , दि . 30 :   शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेत दि. 21 मे 2019 रोजी   2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सुमदेशन व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहाय्यक संचालक डॉ. एम.ए.अली यांचे उपस्थितीत संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या समुपदेशन व मार्गदर्शन केद्राचे समन्वयक म्हणून प्रा. हेंमत जोशी व प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रभारी अधिकारी म्हणून प्रा.सी.एन.निकोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तसेच खाजगी तंत्रनिकेतनांमार्फत विविध अभियांत्रिकी विद्या शाखामधील पदविका अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या पदविका अभ्यासक्रमांचा उद्देश विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी कुशल तंत्रज्ञ व मनुष्यबळाची निमिर्ती करणे व पर्यायाने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा असतो. शासनाने मागिल

22 मे रोजी शिकाऊ भरती मेळावा

22 मे रोजी शिकाऊ भरती मेळावा अमरावती, दि.16:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथील एन. एस. एस. हॉलमध्ये     दि. 22 मे 2019 रोजी सकाळी 11 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण (सर्व टेक्नीकल टेड व कोपा टेड) प्रशिक्षाणार्थ्यांनी आपल्या मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे संस्थेचे प्राचार्य यांनी कळविलेले आहे.
मुख्यमंत्र्यांचा बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावाची पाणीपुरवठा योजना बंद नको - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना   मुंबई, दि. 11 : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीज पुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.    मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 50सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली, तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.    मुख्यमंत्री म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागा

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ‘कौशल्य सेतू’ चा लाभ घ्यावा

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ‘कौशल्य सेतू’ चा लाभ घ्यावा अमरावती, दि. 8 : ‘ कौशल्य सेतू ’ मधील व्यवसाय विषया चा अभ्यासक्रम   पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या माध्यमिक शाळांच्या पात्र विद्यार्थ्यांनी मार्च 2019 च्या इ. 10 वी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ देणेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. इ. 10 वी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळेमार्फत विहित केलेल्या नमून्यात अर्ज करुन नोंदणी करावी. विहित नमूना मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी   दिनांक 6 मे 2019 ते 15 मे, 2019 या कालावधीत अर्ज सादर करावा. या अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) सर्व परीक्षाचे गुणपत्रक व पी. एम. के. व

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अमरावती, दि. 8 : अमरावती शहरातील अमरावती चांदूररेल्वे रा.मा.297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते अंधविद्यालयापर्यत टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सुंदरलाल   चौकामध्ये अर्ध्या भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे कोर्टाकडून कॉग्रेस नगर कडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे. तसेच पेट्रोल पंप चौकाकडून चपराशीपुऱ्याकडे जाणारी वाहतुक ह्या चौकापुरती एका पदरातून सुरु राहणार आहे. तसेच सागर आपार्टमेंट ते चपराशीपुरा चौकापर्यत उजव्या बाजुचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे मिनी बायपास वरुन बडनेरा कडे जाणारी वाहतूक व सुंदरलाल चौक ते वडाळीकडे जाणारी वाहतूक दोन पदरातून सुरु राहील हे रस्ते वाहतूकीकरिता 6 मे 2019 ते 31 मे 2019 पर्यत बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, यांनी कळविले आहे. ****

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

वृत्त क्र .90                                                                                                           दिनांक : 4 मे, 2019 नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अमरावती, दि. 5 : अमरावती शहरातील गांधी चौक ते ईस्माईल कटपीस पर्यत रस्त्याचे कॉक्रींट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. या लांबीमधील जवाहर गेट ते ईस्माईल कटपीस पर्यत कॉक्रीट रस्ता बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तरी या रस्त्यावरील वाहतुक हा 5 मे 2019 ते 31 मे 2019 पर्यत बंद राहील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे. ****