पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
युवकांसाठी दिशादर्शक - रोजगार मिळावे 96 रोजगार मेळाव्यातून 20 हजार युवकांची निवड महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा . आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते . असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे . त्यातही आपली आवड निवड , आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्पप्न अनेक युवक युवती आपल्या उराशी बाळगतात . बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे . विभागात अमरावती 29, अकोला 18, बुलडाणा 17, यवतमाळ 19 व वाशिम 13 अशा 96 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून  आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे . स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास , रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्
इमेज
 ‘मनोधैर्य’ने दिले पिडीतांना जगण्याचे धैर्य *187 पिडीतांना 2 कोटी 65 लाखांचे अर्थसहाय्य * तत्परतेने समुपदेशनासह वैद्यकीय, कायदेशीर मदत   पिडीत महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत अमरावती विभागातील 187 पिडीतांना सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन जगण्याचे धैर्य प्राप्त करून दिले आहे. वित्तीय मदतीसोबतच समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतही तत्परतेने उपलब्ध करून दिले जात आहे. मनोधैर्य योजनेतून अमरावती जिल्ह्यात 65 पिडीतांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 20 पिडितांना 40 लाख रुपये, तर वाशिम जिल्ह्यातील 32 पिडीतांना 30 लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. अकोला जिल्ह्यात 10 लाख 22 हजार 900 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यात 92 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.   अत्याचार पिडीत महिला-बालकांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना 2013 पासून सुरु केली आहे. यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारप्र
इमेज
खोपडा , बोडना व खापरखेडा या गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा                                     - जिल्हाधिकारी अभिजित बांगर अमरावती , दि . 9 :   मोर्शी तालुक्यातील खोपडा व बोडना तसेच वरुड तालुक्यातील खापरखेडा या तीनही पुरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा , असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले . बैठकीला आमदार अनिल बोंडे , अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) रामदास सिध्दभट्टी , मजीप्राच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान , उपविभागीय अधिकारी मनोहर कडू , सार्व . बांधकाम विभागाचे व लघु पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते . श्री . बांगर म्हणाले , खोपडा , बोडना व खापरखेडा या गावांचे सुनियोजित पुनर्वसन करण्यासाठी तेथील कुटुंबाच्या नावे वाटप करण्यात आलेले भूखंडाची जागा व्यवस्थित करुन घ्यावी . तेथील झाडे झुडपे कापून जागेचे सरळीकरण करुन घ्यावे . सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते , नाल्या , स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी नियोजन करुन तातडीने काम
इमेज
कृषी विकास परिषद 2017 चे वरुड येथे आयोजन * 7 ते 10 डिसेंबर दरम्यान कृषी तज्ञांचे मार्गदर्शन * कृषी प्रदर्शनी व शासकीय योजनांचे स्टॉल्स अमरावती , दि . 9 :   येत्या डिसेंबर महिन्यात 7 ते 10 डिसेंबर पर्यंत वरुड येथे कृषी विकास परिषद 2017 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे . या परिषदेमध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न , शेतीपुरक व्यवसाय , शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग , शेतमालाचे उत्तम मार्केटींग , शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य व उपकरणे याविषयी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे . परिषदेचे आयोजन कृषी विभाग , कृषी मित्र इव्हेंट कंपनी , जैन इरिगेशन सि . लि . यासारख्या नामवंत कंपन्यांव्दारा करण्यात येत आहे . या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे , असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ . अनिल बोंडे यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विकास परिषद 2017 च्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली . त