पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वृत्त क्र. 194 ,आधुनिक कृषिसाठी 38 कोटींचे सहाय्य , वृत्त क्र. 195 , वीस हजारावर शेततळ्यांतून संरक्षित सिंचन

इमेज
वृत्त क्र . 194                                                                                                        दिनांक - 31  डिसेंबर 2018 आधुनिक कृषिसाठी  3 8 कोटींचे सहाय्य * ‘ उन्नत शेती ,  समृद्ध शेतकरी ’  अभियान *उत्पादन खर्च कमी करण्यावर भर            अमरावती, दि. 31 : अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रात गुंतवणूक करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय राज्य शासनाने ठेवले आहे. शेतीला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रयत्‍न केल्यास उत्पादन खर्चात कपात करणेही शक्य आहे. यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेती’ अभियान राबवून अमरावती विभागात 38 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले. यातून शेतीमध्ये यांत्रिकीकरण करण्यात येत आहे. शेती व्यवस्थेचा सुधार करण्यासाठी शासनाने  ' उन्नत शेती ,  समृद्ध शेतकरी '  हे महत्‍त्‍वाकांक्षी अभियान सुरु केले आहे. यासाठी कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण व भेटी, सूक्ष्म सिंचन, पायाभूत सुविधांची उपलब्धता यासह कृषि यांत्रिकीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच कृषि विभागाच्‍या वि

भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन पूर्ण - ऊर्जामंत्री बावनकुळे

इमेज
भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन पूर्ण                                                                           - ऊर्जामंत्री बावनकुळे Ø पथदिवे व नळ योजना सौरऊर्जेवर आणणार अमरावती , दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते , ते आश्वासन आम्ही पाळले आहे. गावठाण फिडर वेगळे नसेल किंवा तांत्रिक बिघाड असेल तरच वीजपुरवठा खंडित असतो. ते भारनियमन नव्हे , असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे केले. महापारेषणच्या अंजनगाव सुर्जी २२० केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण आणि धारणी येथील १३२ केव्ही उपकेंद्राचे   ई-लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील , आमदार रमेश बुंदीले , नगराध्यक्ष कमलकांत लडोळे , विजय काळमेघ , प्रवीण तायडे , श्री. दळू , महापारेषणचे संचालक गणपत मुंडे , महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत , महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर , भाऊराव राऊत , सुहास मेत्रे , मनोहर माहूरे उपस्थित होते. श्री. बावनकुळे म्हणाले, अंजनगाव सुर्

वृत्त क्र. 1 90‘ शिवाजी’च्या सर्व संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प--ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

इमेज
वृत्त क्र . 1 90                                                                                                 दिनांक - 27  डिसेंबर 2018 ‘शिवाजी’च्या सर्व संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प -ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती, दि. 27 : ऊर्जेचा नवीन पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिजे जात आहे. प्रामुख्याने मोठ्या असलेल्या संस्थांना विजेचे देयके आणि त्यावरील कर यामुळे लाखांच्या घरात देयके येत आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेने जागा उपलब्ध केल्यास करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. यातून सर्व संस्था विजेवरील खर्चातून मुक्त होईल, असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आज येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 120व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.             श्री. बावनकुळे म्हणाले, मोठ्या शैक्षणिक संस्थांना विजेचे देयक

उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण

उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण Ø        www.krishi.maharashtra.gov.in         संकेत स्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध अमरावती, दि. 2 6 : ‘ उन्नत शेती-समृध्द शेतकरी ’ मोहीमअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरविले असुन त्याअंतर्गत पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्वप्रकारचे प्लांटर (खत बी टोकन यंत्र), भात लावणी यंत्र (ट्रान्सप्लांटर), पॉवर विडर, रिपर कम बाईडर, भात मळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल व पुरक यंत्र संच (डी-स्टोनर, पॉलीशिंग, गेडींग, पॅकींग इत्यादी), कापूस पऱ्हाटी श्रेडर, ऊस पाचट कुट्टी, श्रेडर,मल्चर,ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (बुम स्प्रेअर), मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर, ब्रश कटर तसेच सोबत सहपत्रित केलेल्या यादीतील औजारे घेण्याकरिता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. वर नमुद इतर औजारांकरिता अ.जमाती, अ.जाती,अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किंमतीच्या 50 टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी किंमतीच्या 40 टक्के अनुदान देय राहील. ट्रॅक्टर चलीत यंत्र, औजरांकरित

प्राधिकृत अधिकांऱ्यांच्या नामतालीकेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आंमत्रित

प्राधिकृत अधिकांऱ्यांच्या नामतालीकेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आंमत्रित अमरावती, दि. 2 1 : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती विभागा यांच्याकडुन चौकशी अधिकारी / प्राधिकृत अधिकारी यांची नामतालीका पॅनल तयार करण्यासाठी सहकार खात्यातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी   ( वयाची 65 वर्ष पुर्ण न झालेल्या ) निवृत्त न्यायाधिश , वकील , चार्टंड अकाउंटट यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहे . अर्जाचे विहीत नमुने 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पुढील कार्यालयांमध्ये मिळतील . याबाबतची सुचना कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसि्दध करण्यात आलेली आहे. अर्ज प्राप्त करण्यासाठी अर्जदारांनी विभागीय सहनिबंध‍क सहकारी संस्था, दुरध्वनी क्रमांक 0721-2663246, जिल्हा उपनिबंध‍क सहकारी संस्था, दुरध्वनी क्रमांक 0721-2661633 पत्ता- सहकार संकुल कांता नगर, जुना बायपास रोड, महसुल भवन कार्यालयासमोर अमरावती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला सहकार संकुल आदर्श कॉलनी, अकोला दु.क्र. 0724-2452730. जिल्हा उपपिबंधक सहकारी संस्था वाशिम, प्रशासकीय इमारत खोली क्र.103 जिल्हाधिकारी कार्

इयता 10 वी 12 वीचे नावनोंदणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ

इयता 10 वी 12 वीचे नावनोंदणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ      अमरावती, दि.20:     इयत्या 10 वी 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगिरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या इयत्या 12 वी परीक्षा व इयत्या 10 वी च्या परीक्षेस खाजगिरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं.17) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे स्विकारण्याचा यापूर्वीचा अंतिम कालावधीला मुदतवाढ देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी रुपये 20/-प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव तारीख इयत्या 10 वी व 12 वी करीता शनिवार दिनांक 15 डिसेंबर 2018 ते सोमवार दिनांक 31 डिसेंबर 2018 ही आहे.           अधिक माहितीकरीता संकेतस्थळावर संपर्क साधावा. इ. 10 वी करिता http://form17.mh-ssc.ac.in   व इ. 12 वी करिता http://form17.mh-hsc.ac.in वर उपलब्ध आहे, असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे. 0000000
इमेज
मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे यंत्रणेला आवाहन व्हीव्हीपॅट आणि मतदान  यंत्रांच्या उपयोगाबाबत प्रभावी जनजागृती करा    अमरावती, दि. 20  :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदार नोंदणी आणि मतदारयाद्यांच्या प्रकाशनाची पूर्वतयारी, मतदानयंत्र आणि त्यासोबत यावेळी प्रथमच उपयोगात आणली जाणारी व्हीव्हीपॅट यंत्राबाबतची जनजागृती मोहिम आणि निवडणूक पूर्वतयारीचा तपशिलवार आढावा घेतला. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दिवसभर दोन सत्रात चाललेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आणि उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांची मुख्य उपस्थिती होती. विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालया

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळ योजना स्वयंरोजगारासाठी 13 कोटी 83 लक्ष कर्ज वितरीत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळ योजना    स्वयंरोजगारासाठी 13 कोटी 83 लक्ष कर्ज वितरीत अमरावती, दि. 19 : स्वयंरोजगाराकरीता समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास त्याचे भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती मिळवून देण्याची आवश्यकता आहे . या शासनाने बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन तसेच सुलभ प्रक्रियेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते . बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी या योजना प्रभावी ठरत आहे .                                                        अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातंर्गत सन 2018-19 मध्ये विभागात नोव्हेंबर अखेर वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतील 238 स्वयंरोजगारच्छूक तरुणांचे 13 कोटी 83 लक्ष 29 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आले आहे .