पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा, मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

  सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी           अमरावती, दि. 28 (विमाका) :  राज्याचे   सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे दि. 2 व 3 डिसेंबरला मेळघाट दौ-यावर असून, ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत.             त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :  शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी  सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने अचलपूरकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु. 12 वा. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रयाण, दु. 12.30 वाजता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आगमन व भेट, दु. 1 वाजता बिहालीकडे प्रयाण, दु. 2 वा. बिहाली उपकेंद्र येथे आगमन व भेट, दु. 2.30 वाजता उपकेंद्र बिहाली येथून सलोनाकडे प्रयाण, दु. 3 वाजता सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आगमन व भेट, दु. 3.45 वाजता आमझरीकडे प्रयाण, दु. 4 वाजता आमझरी उपकेंद्र येथे भेट. दु. 4.30 वा. चिखलद-याकडे प्रयाण, सायं. 5 वाजता चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे भेट, सायं. 6 वा. चिखलदरा

‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन

  ‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन   अमरावती, दि. 29 - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील    विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उद्या दि. 30 नोव्हेंबर रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. याच उपक्रमाचे विस्तारित स्वरूप म्हणून दि. 2 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.   राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे व संस्थेचे प्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे. यांत्रिकी,   इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम,आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या    प्रशिक्षणार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पने

आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम, जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

  आरोग्य विभागातर्फे आजपासून  ‘ एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट   आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे सातत्यपूर्ण कार्य   अमरावती, दि. 30 : शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गत 15 वर्षांत जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरामध्ये घट झाली आहे. यंदा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर  ‘ जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे.       प्रभावी लोकशिक्षण, उपचार, सुरक्षितता साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. ते म्हणाले की, 2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. प्रभावी जनजागृतीमुळे नागरिक तपासण्यांसाठी केंद्रांवर येण्याचे प्रमाण वाढले. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741

पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

इमेज
पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक -          विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती, दि. 22 : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेतीप्रणालीबाबत कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कृषी संशोधनात महाराष्ट्र अव्वल राज्य असला तरीही प्रत्यक्षात बहुतांश शेती अद्यापही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरिप पिके घेऊ शकतात. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 37.05 टक्के कुटुंबे शेतीवर व 44.37 टक्के कुटुंबे शेतीविषयक मजूरी कामांवर अवलंबून आहेत. त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटु
  केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित       अमरावती, दि. 21 :     धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने (न्युक्लिअस बजेट) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त कार्यालयात योजनांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध असून आदिवासी बांधवांनी संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे. त्यानुसार धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाथार्थ्यांनी धारणी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे. नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे तसेच मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूरबाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी धारणी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोर्शी उपकार्यालयाला योजनेंतर्गत अर्ज सादर करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 07226-2242

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

  आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा   स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर   अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी   संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय

अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

  अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन स्पर्धेत यश मिळवताना, परिसंवाद (ग्रंथ माझा सांगांती), इरसाल नमुने व समारोप कार्यक्रमांची मेजवानी     अमरावती, दि. 18     : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. तसेच उद्या शनिवारी (दि. 19 नोव्हेंबरला) ‘स्पर्धेत यश मिळवताना…’ या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, ‘ग्रंथ माझा सांगांती’ या विषयावर परिसंवाद तसेच मंगेश ठाकरे यांचा   ‘ इरसाल नमुने’ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी तसेच आयोजकांनी केले आहे.              वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होत असून शासकीय विभागीय ग्रंथालय, मोर्शी रोड याठिकाणी ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आ

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ     अमरावती, दि. 17 (विमाका) :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाईन पध्दतीने   www.mahahsscboard.in   या संकेतस्थळावर भरावयाची मुदत यापूर्वी दिनांक दि. ५ नोव्हेंबर रोजी संपली होती. तदनंतर दि. १५ नोव्हेंबर .२०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु, आवेदनपत्र भरण्याच्या संकेतस्थळामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने चार-पाच दिवस इयत्ता बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन भरता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्व्या हितासाठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे. तपशील पुढीलप्रमाणे - उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखां

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

  प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे   अमरावती, दि. 17 (विमाका) :    अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांत प्रधानमंत्री पिक विमा योजना यावर्षीच्या रब्बी हंगामात राबविण्यासाठी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ही योजना खरीप-2022 व रब्बी/उन्हाळी 2022-23 हंगामाकरिता कप ॲन्ड कॅप मॉडेलनुसार Cup & Cap model (80:110) राज्यात राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत रब्बी पिक ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर २०२२ राहील तर बा.गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुंग ३१ मार्च २०२३ आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिककर्ज घेतल्यास शेतक-यांना या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, त्यासाठी शेतक-याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतीम दिनांका आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतक-यांनी आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स

भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती

  भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा उमेदवारांच्या सुलभतेसाठी   https://mahabhumi.gov.in   संकेतस्थळ   अमरावती, दि. 17 (विमाका) :    भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test)   दि. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर   ( https://mahabhumi.gov.in )   लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंकदेखील दि. १४ नोव्हेंबरपासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. याची सर

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभिमुखता व प्रेरणा कार्यक्रम संपन्न

  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभिमुखता व प्रेरणा कार्यक्रम संपन्न   अमरावती, दि. 10 :   शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच (दि. 4 नोव्हेंबर) माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संमारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरीता अभिमुखता व प्रेरणा (ओरिएन्टेशन व इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेतील यशस्वी माजी विद्यार्थ्यांपैकी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली कु. पल्लवी चिंचखेडे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात राज्यस्तरीय कृषी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे स्टार्टअपचा बहुमान राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थी परशुराम आखरे आणि शैक्षणिक तथा सामाजिक उपक्रम राबवून नामांकित पारितोषिक पटकविणारा प्रणव सोनटक्के आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेचे नावलौकिक झाले आहे. याप्रसंगी संस्थेत प्रथम वर्षांत नविन प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता ओरिएन्टेशन व इंडक्शन कार्यक्

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशास 21 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ

  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशास 21 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ                    अमरावती दि.4 :   महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज दि. 7 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले होते. सदर मुदत संपुष्टात आल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास दि. 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणेचे प्र.सचिव माणिक बांगर यांनी केले आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे-             दि. 8 ते 21 नोव्हेंबरपर्यंत (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 25 नोव्हेंबरपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळ

माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

इमेज
  माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद अमरावती, दि. ७ -  कृषी विभागाच्या माझा एक दिवस बळीराजा या उपक्रमात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी देवरा येथे शेतकरी बांधवाच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आज संवाद साधला. देवरा येथील शेतकरी बांधवांच्या अडचणी  जाणून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपक्रमात अशोकराव कडू यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी त्यांच्याशी कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना येणा-या अडचणी जाणून घेतल्या, तसेच, पीकपद्धती, उत्पन्न, पशुधन आदी बाबींची माहिती घेतली. शेतकरी बांधवांना येणा-या अडचणींचा तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. तसेच बीजप्रक्रियेबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आले.  गावाच्या सरपंच मनीषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

  फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या   परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ www.mahahsscboard.in   संकेतस्थळ उपलब्ध 30 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे सादर करा   अमरावती, दि. 7 :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे भरावयाची मुदत दि.5 नोव्हेंबर रोजी संपल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनपत्रे   भरण्यासाठी मंडळाच्या   www.mahahsscboard.in   या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे. तपशील पुढीलप्रमाणे- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्कासह दि. 6 ते दि. 15 नोव्हेंबर दरम्यान तर विलंब शुल्कासह दि. 16 नोव्हेंबर त