पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती -उपमुख्यमंत्री अजित पवार *पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद *निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी *उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा ये

वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 24 : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण (अतिरिक्त गुण) देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. ****

वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा अमरावती, दि. 21 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अमरावती विभागातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करिता जिल्हानिहाय बैठका घेतील. या बैठकीला संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे नियोजन उपआयुक्त यांनी कळविले आहे. ****

रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अमरावती, दि. 18 : अमरावती-चांदूररेल्वे या राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत कॉक्रीट रोड बांधकाम टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जेल क्वार्टर ते चपराशीपूरा चौक यामधील उजव्या बाजूचे 95 मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे. हा रस्ता दि. 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत डाव्याबाजूने असलेल्या पुर्ण झालेल्या दोन पदरामधून वाहतूक सुरु राहिल. यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी घेण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. ****

शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी 22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण

शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी 22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण अमरावती, दि. 18 : शोभवंत मत्स्यव्यवसाय उद्योग यशस्वीरित्या करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दि. 22 ते 24 जानेवारी दरम्यान कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण इ-क्लास, विद्याभारती महाविद्यालय, कॅम्प येथे होणार असून मुंबई येथील तारापोरवाला मत्स्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय मत्स्यिकी विकास महामंडळ, हैदराबाद, मत्स्यपालन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने नीलक्रांती योजनेअंतर्गत शोभिवंत मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सर्वांसाठी विनामूल्य असून प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादीत राहणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ विभागातील नवउद्योजक, तरुण-तरुणी व मत्स्यव्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सर्वांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0721-2662801 व 9960563107 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे. ****

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन          अमरावती , दि. 15 :   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2020 असा आहे.             राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने   dgipr.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती अ.क्र पुरस