वृत्त क्र. 194 ,आधुनिक कृषिसाठी 38 कोटींचे सहाय्य , वृत्त क्र. 195 , वीस हजारावर शेततळ्यांतून संरक्षित सिंचन
वृत्त क्र . 194 दिनांक - 31 डिसेंबर 2018 आधुनिक कृषिसाठी 3 8 कोटींचे सहाय्य * ‘ उन्नत शेती , समृद्ध शेतकरी ’ अभियान *उत्पादन खर्च कमी करण्यावर भर अमरावती, दि. 31 : अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रात गुंतवणूक करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय राज्य शासनाने ठेवले आहे. शेतीला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास उत्पादन खर्चात कपात करणेही शक्य आहे. यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेती’ अभियान राबवून अमरावती विभागात 38 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले. यातून शेतीमध्ये यांत्रिकीकरण करण्यात येत आहे. शेती व्यवस्थेचा सुधार करण्यासाठी शासनाने ' उन्नत शेती , समृद्ध शेतकरी ' हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरु केले आहे. यासाठी कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण व भेटी, सूक्ष्म सिंचन, पायाभूत सुविधांची उपलब्धता यासह कृषि यांत्रिकीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच कृषि विभागाच्या वि