पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

इमेज
  भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया                                                  - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे   अमरावती, दि. 26 : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.   भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तां

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा, पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

इमेज
  ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद   अमरावती , दि .26 : ‍‍प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते. मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व   विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात   एकूण 17 पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.     राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली. स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जि

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन

  अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक   निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन अमरावती, दि. 18 : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान दि. 30 जानेवारीला विभागातील 262 मतदान केंद्रावर होणार आहे. तसेच निवडणुकीची मतमोजणी दि. दि. दोन फेब्रुवारी रोजी बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी उमेदवारांची बैठक घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, उपायुक्त विजय भाकरे, तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत यावेळी संबंधितांना माहिती देण्यात आली. मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र उदा. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना इ. तसेच पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर छायाचित्र असणे आवश्यक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास त्यासंदर्भात ती

22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा

  22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा  प्रवेशपत्र  https://arogya.maharashtra. gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध अमरावती ,  दि . 19 (विमाका)  :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत अकोला परिमंडळातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) या पदाकरीता राज्यस्तरावरून दि. 12 डिसेंबर 2022 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. तसेच अर्ज स्विकृती दि.20 डिसेंबर 2022 पर्यंत होती. अकोला परिमंडळांतर्गत सदर पदाकरीता बऱ्याच प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असुन अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार  येत्या दि. 22 जानेवारी 2023 रोजी  परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. समुदाय आरोग्य अधिकारी पदाचे प्रवेश परिक्षापत्र  https://arogya.maharashtra. gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षेकरीता अर्ज केलेल्या अकोला, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णावाल वाणिज्य विद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला हे राहील. बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महावि

‘महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

  ‘महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित अमरावती, दि. 20 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी महाज्योतीच्या  www.mahajyoti.org.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 25 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह सहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील

मराठी भाषा पंधरवडा, मराठी वाङमयनिर्मितीत अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान - प्रा. भगवान फाळके

  मराठी भाषा पंधरवडा मराठी वाङमयनिर्मितीत अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान -           प्रा. भगवान फाळके अमरावती, दि. २० : प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन या तिन्ही कालखंडात अमरावती जिल्ह्याच्या भूमीत मराठी भाषेत मोठी व अक्षर वाङमयनिर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत या भूमीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राचे प्रा. भगवान फाळके यांनी आज येथे केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे विद्यापीठात प्रा. फाळके यांचे 'मराठी साहित्यात अमरावती जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान' या विषयावर व्याख्यान झाले, त्यात ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे अध्यक्षस्थानी होत्या.  भाषा सहायक संचालक हरिश सूर्यवंशी, स्नेहा पुनसे, धनंजय कानेड, मनोज तायडे, डॉ. हेमंत खडके आदी उपस्थित होते. प्रा. फाळके म्हणाले की, जागतिकीकरणाने जगाचे वैश्विक खेडे झालेले असताना मानवी मनोविश्व व व्यवह

पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदान ओळखपत्र नसल्यास विविध पर्याय

  पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास विविध पर्याय अमरावती, दि. २१ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान करताना जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, त्यांना ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करता येतील. तसे आदेश राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.   त्यानुसार आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत नोकरी करत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारा वितरित मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिका-याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र,    भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) आदी पर्याय जाहीर करण्यात आले आहेत. 00000  

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा

  राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा अधिकाधिक कलावंतांनी सहभागी व्हावे -           जिल्हाधिकारी पवनीत कौर अमरावती, दि. २१ : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ व रील मेकिंग स्पर्धा, तसेच अमरावती महापालिकेच्या सहकार्याने भित्ती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक कलावंतांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. व्हिडीओ मेकिंग स्पर्धा ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम, भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग

  राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग   मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे अमरावती, दि. 22 : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भित्ती चित्रकला स्पर्धा आज झाली. त्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी सहभाग घेऊन मतदानाच्या अधिकाराचे महत्व विशद करणारी अनेक आकर्षक चित्रे काढली. विद्यार्थी व तरूण कलावंतांचा सहभाग लक्षणीय होता.       जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भित्ती चित्रकलेच्या (वॉल पेटींग) ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतूक करीत उत्साह वाढविला.    निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, मनपा शाळेचे कलाशिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते. भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुल्या स्वरुपात नि:शुल्क आयोजित करण्यात आ

महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

  महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित अमरावती, दि. 20 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी महाज्योतीच्या  www.mahajyoti.org.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 25 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह सहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  नेताजी सुभाषचंद्र बोस ,  बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन            अमरावती ,  दि. २३  :  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले.             यावेळी उपायुक्त संजय पवार, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होते.  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

  सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित अमरावती, दि. 24 : संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांकरीता राज्य शासनाकडून छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे पूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी दि.  30 जानेवारीला  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. युपीएससीच्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या माध्यमातून कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी युवकांची निवड केल्या जाते. राज्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सीडीएस

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी   ‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर परिसंवाद   अमरावती, दि. 24 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सभागृहात जयंती कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.ए.एम. महल्ले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे, प्रा. टि.सी. भगत, प्रभारी अधिकारी प्रा. ए. एम. मुकादम, प्रा. एन.जी. गाडगे तसेच सर्व शाखांचे व्दितीय वर्षाचे विद्यार्थी व एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते. प्रारंभी श्री. बुरंगे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी ‘एकता स्वतंत्रता सम

राष्ट्रीय मतदारदिन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

  राष्ट्रीय मतदारदिन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -          विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती, दि. २५ : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली. निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभा

जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव

  जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव अमरावती ,   दि . 25:   अवैधरीत्या साठा केल्याचे आढळल्यावरून पथकाने जप्त केलेल्या 120 ब्रास वाळूचा जाहीर लिलाव चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (27 जानेवारी) दुपारी 4 वाजता होणार आहे.  इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धामणगाव तालुक्यातील नायगाव रेतीघाटाचा 2021-2022 या आर्थिक वर्षात लिलाव झाला होता.   या घाटातून अवैध वाळू उत्खनन करुन त्याची विनापरवाना साठवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विशेष पथकाकडून  ते साठे जप्त करण्यात आले. या 120 ब्रास वाळूची हातची किंमत 72 हजार रू. ठेवण्यात आली आहे. त्यानुसार लिलाव होईल. लिलावात सहभागी होणारे व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्याकरीता अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅन कार्ड, जीएसटी नंबर, करारपत्र, रहिवास पुरावा व आयकर भरणा करत असल्याबाबतचा पुरावा आदी दस्तऐवज द्यावे लागतील.   अपसेट प्राईसच्या 25 टक्के इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाद्वारा भराव्या लागतील. सर्वोच्च बोली धारकाने सर्वोच्च बोलीची 100 टक्के रक्कम लिलावाच्या दिवसानंतर कार्यालयीन

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद, निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

इमेज
  अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज अमरावती, दि. 5 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान दि. 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते. डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. 12 जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. 13 जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.   मतदार संख्या अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभाग