पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन     अमरावती, दि. 23 : विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.                यानिमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. सिंह यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी 26 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

  अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी 26 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती, दि. 20 : इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांची एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय राज्य व उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे. सामाईक परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेमध्ये उर्त्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि. 20 जुलै पासून दि.26 जुलै 2021 पर्यंत संकेतस्थळावर सादर करावे. सन 2021-22 च्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा शनिवार दि. 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत करण्यात येणार आहे. सामाईक परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इ. 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची राह

पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात रिध्दपूरचा समावेश - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

इमेज
  ‘कौंडण्यपूर’ व ‘माताखिडकी’ला ब दर्जासाठी एकत्रित प्रस्ताव देण्याचे निर्देश पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात रिध्दपूरचा समावेश -           पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर                   अमरावती , दि .9: महानुभाव पंथाची काशी श्री क्षेत्र रिध्दपूरचा जिल्ह्याच्या पर्यटन  विकास आराखडयाच्या पहिल्या टप्प्यात समावेश करुन कामांना सुरुवात करावी. आवश्यक मुलभूत सुविधा तिथे प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्याचप्रमाणे,  कौंडण्यपूर आणि अमरावती शहरातील माताखिडकी देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावे,  असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्हयाची पर्यटन विकास आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार, दर्यापुरचे आमदार बळवंतराव वानखेडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापराव अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पियुष सिंह , उपायुक्त किरण जोशी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष

विभागीय लोकशाही दिन 12 जुलै रोजी

  विभागीय लोकशाही दिन 12 जुलै रोजी अमरावती, दि. 8:    दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 12 जुलै   रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाद्वारे किंवा dcgamravati@gmail.com/dcg_ amravati@rediffmail.com   या संकेस्थळावर सादर कराव्या. लोकशाही दिनात नागरिक व्यक्तीश हजर राहू शकतात, असे   उपआयुक्त (सा.प्र.) संजय पवार यांनी    प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. यावेळी उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.                                                             000000

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीच्या निकालाबाबत मूल्यमापन पद्धती निश्चित

  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत                         बारावीच्या निकालाबाबत मूल्यमापन पद्धती निश्चित   अमरावती दि.8 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परिक्षा कोविड-19 च्या   प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे.                त्या अनुषंगाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रकिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व वेळापत्रक मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेले असून त्याची कार्यपध्दती तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुर्नपरिक्षार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.                ही मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा

खरीप हंगाम 2021, प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

  खरीप हंगाम 2021 प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अमरावती, दि. 2: येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी दिनांक 15 जुलै पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , उपविभागीय कृषि अधिकारी , तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच बँक , आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा , अशी माहिती कृषी सहसंचालक यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेत स्थळ कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पीकाच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते. हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी / लावणी न झाल्यास, पीक काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर , पावसातील खंड , दुष्काळ इत्यादी बाबींमुळे
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात  वसंतराव नाईक यांना अभिवादन अमरावती, दि. 1 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000