पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

इमेज
       शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे                          -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार Ø मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे अभिनंदन Ø मागास जिल्हे प्रगत होण्यासाठी प्रयत्न Ø मेळघाट विकासासाठी प्राधान्याने निधी अमरावती, दि. 14 : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक बाबींसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीतून जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांसोबतच पिण्याचे शुद्ध पाणी नागरीकांना मिळण्यासाठी हा निधी प्राधान्याने खर्च करावा, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले. आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन निधीबाबत विभागीय बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात कर्जमुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोठा निधी द्यावा लागला आहे, तरीही जिल्हा नियोजनाच्या

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करावे -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

इमेज
चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करावे                                                   -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील अमरावती, दि.    12 :    जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.            महोत्सवाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलदऱ्याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सवई यांच्यासह जिल्हा परिषद, गृह, पर्यटन, वन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व चिखलदरा न. प. सदस्य उपस्थित होते. श्री. पोटे म्हणाले की, येत्या 23,24 व 25 फेब्रुवारी रोजी चिखलदरा महोत्सव जिल्ह्यात साजरा करण्या येणार आहे. महोत्सवाची जबाबदारी यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकड
इमेज
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करा                                               -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील       * नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत 532 गावांची निवड * दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 30 कोटीचा निधी मंजूर अमरावती, दि.    12 :    जिल्ह्यातील काही भागात 11 फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनास तातडीने सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांचेसह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते. ना. पोटे-पाटील म्हणाले, जिल्ह्यात 10 व 11 फेबुवारी रोजी गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्हयातील 14 तालुक्यापैकी आठ तालुक्यात अवेळी पर्जन्यमान झा