पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम मोहिम

  सुधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम मोहिम          ‘शिक्षकांनी 1 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर पर्यत मतदार नोंदणी करावी’ अमरावती, दि. 27 : निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषित केला आहे. दि. 1 ऑक्टोंबर 2019 रोजी सुचना प्रसिध्द करण्यात येईल. दि. 15 व 25 ऑक्टोंबर रोजी वर्तमान पत्रातील सुचनेची पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दावे व हरकती 6 नोव्हेंबर पर्यत स्विकारण्यात येतील. दिनांक 19 नोव्हेंबर पर्यत यादी हस्तलिखित तयार करुन प्रारुप   मतदान याद्यांची छपाई करण्यात येईल. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येतील. दि. 23 नोव्हेंबर   पासून 9 ते डिसे

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस अमरावती, दि. 26 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 35.7 (700.6), भातकूली 7.2 (461.6), नांदगाव खंडेश्वर 12.3 (687.8), चांदूर रेल्वे 1.6 (822.8), धामणगाव रेल्वे 3.5 (810.5), तिवसा 2.7 (641.2), मोर्शी 3.9 (730.4), वरुड 5.9 (670.1), अचलपूर 5 (695.1), चांदूर बाजार 21.9 (981.9), दर्यापूर 26.8 (642.1), अंजनगाव 13.2 (581), धारणी 16.8(1444.8), चिखलदरा 27.4 (1881.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 13.1 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 839.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 26 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 106 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 103.1 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 29.3 (661.3), बार्शी टाकळी 24.3 (903.9), अकोट 17.3 (840.9), तेल्हारा- 30.9 (857.1), बाळापूर 19.2 (825.2), पातूर 14.2

अकोला,वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस

अकोला,वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस Ø   विभागात 55 तालुक्यात पाऊस अमरावती, दि. 21 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 55 तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 3.0 (651.5), भातकूली 14.9 (434.8), नांदगाव खंडेश्वर 12.0 (648.0), चांदूर रेल्वे निरंक (770.2), धामणगाव रेल्वे 0.7 (787.8), तिवसा 2.5 (632.3), मोर्शी 3.1 (713.1), वरुड 0.6 (648.2), अचलपूर 15.1 (684.5), चांदूर बाजार 23.2 (944.5), दर्यापूर 15.0 (602.2), अंजनगाव 30.3 (559.8), धारणी 21.8 (1423.1), चिखलदरा 56.3 (1827.5), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 14.2 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 809.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 21 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 106.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 99.3 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 39.2 (605.3), बार्शी टाकळी 82.1 (821.3), अकोट 38.8 (812.0), तेल्हारा- 71.

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अमरावती, दि. 18 : अमरावती शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील प्रभात टॉकीज साबनपुरा या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.   प्रभात चौक ते साबनपुरा गेट रस्ता 13 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत वाहतुकीस बंद राहील. या विभागास पोलीस विभागाकडून परवानगी प्राप्त आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कळविले आहे. ****

मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मूदतवाढ

मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मूदतवाढ अमरावती, दि. 17; राज्य मुक्त विद्यालयातील इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी प्रवेश अर्ज स्विकारण्यात येणार होते. परंतु अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी आता दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत‍ ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज सादर करु शकतील. 3 ऑक्टोंबर पर्यंत मूळ अर्ज, विहित शुल्क अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्राच्या शाळेमध्ये जमा करण्यात येईल. अधिक माहिती मंडळाच्या http://msbos.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ यांनी कळविले आहे. ****

इयत्ता 10 वी व 12 वी खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

इयत्ता 10 वी व 12 वी खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे अमरावती, दि. 17; इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षा देता येईल. खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमीत शुल्काने भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळअर्ज, विहित शुल्क अर्जावर नमूद शाळा/महाविद्यालयात जमा करावे. खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form 17 .mh-ssc.ac.in , http://form 17 .mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट

खासबाब अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड

खासबाब अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड अमरावती, दि. 17; मागासवर्गीय मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह अमरावती, येथील वसतिगृहात खासबाब अंतर्गत विद्यार्थी/विद्यार्थिनींची प्रवेशाकरिता निवड झालेली आहे. प्रवेशा करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहे. अनिकेत रमेशराव घोडमारे, यश प्रेमदास देहवडे, कासीम कय्युम शेख काजळंबा, पुष्क्र अविनाशराव मोढे, सुमित गणपतराव सुरजुसे, दिपक बंडुजी कांबळे, कु. पायल विनोदराव सोनोने, कु. प्राची शरद जंजाळ, कु. कांचन सुधाकर राठोड, कु. पायल विजयराव हळदे व कु. सोनल मांडवकर आहे. या विद्यार्थ्यांचे पत्ते व फोन नंबर माहित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय मुलांचे व मुलीचे शासकीय वसतिगृह अमरावती येथे प्रवेशासाठी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी 8446466544 या भ्रमणध्वनीवर व विद्यार्थीनींनी 7798693875, 9766067891 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे गृहप्रमुख, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह यांनी कळविले आहे.

धनगर समाजाच्या विकासासाठी योजना लागू

इमेज
धनगर समाजाच्या विकासासाठी योजना लागू मंत्री डॉ. संजय कुटे यांना मानाची धनगर पगडी, घोंगडी आणि काठी देऊन धनगर बांधवांनी केला सन्मान अमरावती, दि. 16; आदिवासी विकास विभागमार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी   सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.   या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी   रु.1000.00 कोटी   एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संदर्भातील राबवायच्या सर्व योजनांचे निकष, अटी शर्ती, आर्थिक तरतुदी आणि योजना राबवणारे विभाग असे सर्व   शासन निर्णयही   निर्गमित झाले आहेत. ईमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांनी अतिशय जिकरीचे व खुप वेळ लागणारे   हे काम   युद्ध स्तरावर पूर्ण करून घेतले आहे. त्यासाठी मंत्र्यांचा प्रोटोकॉल बाजूला सारून ते स्वत:   प्रधान सचिव वित्त आणि प्रधान सचिव नियोजन यांचे दालनात   गेले . शासन निर्णय वेबसाइटवर आणि संबंधित   कार्यालयात उपलब्ध असतात .   मात्र अशिक्षित अडाणी माणसाला त्

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस अमरावती, दि. 12 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 55 तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 9.2 (609.9), भातकूली 1.5 (378.9), नांदगाव खंडेश्वर 28 (607.5), चांदूर रेल्वे 33 (743.4), धामणगाव रेल्वे 7.6 (757.9), तिवसा 20.1 (588.1), मोर्शी 8.9 (655.3), वरुड 0.9 (626.8), अचलपूर 4 (617.2), चांदूर बाजार 9.6 (841.9), दर्यापूर निरंक (536), अंजनगाव 1.9 (483.5), धारणी 7.2 (1281.5), चिखलदरा 16.1 (1530.3), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 10.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 732.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 12 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 90 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 6.1 (547.7), बार्शी टाकळी 21.6 (702.7), अकोट 0.5 (696.2), तेल्हारा- 1.5 (670.2), बाळापूर 3.5 (647.4), पातूर 21.8 (707.3),मुर
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन प्रशिक्षणार्थ्यांनी प्रमाणपत्र घ्यावेत अमरावती , दि .11- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जुलै 1996 ते 2017 या कालावधीतील उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र आणि शैक्षणिक वर्ष 2006 ते 2016 या कालावधीतील प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे सी. ओ. ई. प्रमाणपत्र संस्थेतुन ओळखपत्र दाखवून दुपारी 3 ते 5 या कार्यालयीन वेळेत घेवून जावे असे, श्रीमती. एम. डी. देशमुख, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांनी कळविले आहे.  
आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी 20 पर्यंत अर्ज आमंत्रित अमरावती , दि .11- अमरावती जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता ईच्छुक अपंग उमेदवार/बचत गट यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे केंद्र फक्त अपंग व्यक्ती व बचतगट यांना वितरित करण्यात येणार आहेत. अपंग व्यक्ती व बचतगटांनी www.amravati.gov.in या संकेतस्थळावरील दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जात माहिती सादर करावी. अपंग उमेदवार व बचत गटांनी आपले अर्ज जिल्हा सेतु समिती, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.    ****

विभागीय लोकशाही दिनात सात प्रकरणे दाखल

इमेज
     विभागीय लोकशाही दिनात सात प्रकरणे दाखल ·          प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना अमरावती , दि .9 - विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले . विभागातून लोकशाही दिनासाठी एकूण सात प्रकरणे दाखल करण्यात आलीत . दाखल प्रकरणांवर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. सिंह यांनी दिल्या . विविध विभागाशी संबंधित असलेली प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस प्रलंबित न ठेवता तत्काळ निकाली काढावित तसेच केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावी , असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले . आज विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या सात प्रकरणापैकी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती एक प्रकरण, भूमि अभिलेख कार्यालयाचे एक प्रकरण असून जि.प.अमरावती एक प्रकरण सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ एक प्रकरण, जि.प. यवतमाळचे  दोन आणि नगरपालिकेचे   एक प्रकरण  सादर करण्यात आले. अशी एकूण 7 प्रकरणे श्रीमती वैशाली पाथरे य

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस अमरावती, दि. 9 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 55 तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 3.8 (598.4), भातकूली 5.8 (373.6), नांदगाव खंडेश्वर 4 (576), चांदूर रेल्वे 22 (707.4), धामणगाव रेल्वे 18 (747.3), तिवसा 0.7 (566.2), मोर्शी 2 (646.1), वरुड 4.2 (624.9), अचलपूर 2.7 (613.2), चांदूर बाजार 3.4 (831.3), दर्यापूर 21 (531.4), अंजनगाव 1.4 (481.4), धारणी 22.3 (1260.6), चिखलदरा 6.5 (1507.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 8.4 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 719 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 9 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 88.3 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 14.8 (527.5), बार्शी टाकळी 15.1 (668.3), अकोट 29.1 (691.9), तेल्हारा- 14.5 (660.6), बाळापूर 7.1 (635.3), पातूर 39 (655.7),मुर्तीजाप

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस मोर्शी, धारणीत अतिवृष्टी

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस मोर्शी, धारणीत अतिवृष्टी अमरावती, दि. 5 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 54 तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 10.0 (583.0), भातकूली 7.2 (364.5), नांदगाव खंडेश्वर 3.5 (563.7), चांदूर रेल्वे 9.7 (674.4), धामणगाव रेल्वे 18.2 (711.4), तिवसा 26.8 (548.7), मोर्शी 71.8 (610.1), वरुड 26.3 (611.2), अचलपूर 10.8 (599.5), चांदूर बाजार 24.5 (786.9), दर्यापूर 5.5 (507.1), अंजनगाव 13.0 (478.8), धारणी 90.5 (1226.4), चिखलदरा 47.6 (1494.2), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 26.1 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 697.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 5 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 85.6 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 1.5 (512.7), बार्शी टाकळी 4.8 (651.3), अकोट 7.7 (648.2), तेल्हारा- 3.1 (633.0), बाळ

राज्य मुक्त विद्यालयाचा मूल्यमापन निकाल जाहीर

राज्य मुक्त विद्यालयाचा मूल्यमापन निकाल जाहीर अमरावती, दि. 4 : पुणे येथील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या प्रथम बॅचच्या मुल्यमापनाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या मुल्यमापनाचा ऑनलाईन निकाल   www.msbos.mh-ssc.ac.in   वर पाहता येईल. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि. 22 जुलै   ते 3 ऑगस्ट 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्या मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पासून जाहिर झाला आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांला सदर माहितीची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता पाचवी, आठवी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य

संदर्भ सेवा रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करावा -विभागीय आयुक्त पियूष सिंह

संदर्भ सेवा रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करावा                           -विभागीय आयुक्त पियूष सिंह अमरावती, दि. 4 : विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात रूग्णांची संख्या मोठी आहे. रूग्णांच्या सोयीसाठी दुसरा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सोयी उपलब्ध करून रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्‍न करण्यात यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले. रूग्ण कल्याण नियामक समितीची बैठक रूग्णालयातील सभागृहात आज घेण्यात आली. यावेळी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य डॉ. सुनिल देशमुख उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी रूग्ण कल्याण नियामक समितीच्या नियोजित कामांची   माहिती दिली. श्री. सिंह यांनी नव्याने बांधलेल्या विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती जाणून घेतली. इमारत बांधून तयार आहे, मात्र या ठिकाणी आवश्यक असलेल्या ऑक्सीजन पुरवठा व्यवस्था नसल्याने ही इमारत उपयोगात आणता येत नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच ऑक्सीजन व्यवस्थेसाठी शासनाने पाच कोटींचा निधी जानेवारीमध्ये मंजूर केला आहे, हा न

जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परिक्षेचा निकाल जाहीर

जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परिक्षेचा निकाल जाहीर अमरावती, दि. 3 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-2019 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण असून या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित संबंधित नमुन्यात विहित शुल्कासह दि. 9 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात, विहित शुल्कासह दि. 19 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावा. मार्च 2020 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी