पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
73 व 74 व्या घटना दुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्ष लोकशाहीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी घटना दुरुस्ती                                                    - पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील             अमरावती , दि .20 :  देशाच्या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी 73 व 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली . स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्थान प्राप्त करुन देणाऱ्या या ऐतिहासिक घटना दुरुस्तीस 25 पूर्ण होत आहेत . या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता प्राप्त झाली आहे . समाजातील शेवटच्या घटकाला न्याय व अंत्योदयाचा विकास असा लोकशाहीचा प्रमाणिक विचार नागरिकांमध्ये पोहचविणे , हा  घटना दुरुस्तीचा प्रमुख उद्देश असल्याचे मत पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी व्यक्त केले .             संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती जिल्हा परिषद , अमरावती महानगरपालिका , विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील डॉ . के . जी . देशमुख सभागृहात 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या रौप्य