पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च पर्यंत सादर करावे

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च पर्यंत सादर करावे अमरावती , दि . 22   : सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अदा करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवरील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज मंजूर करता यावेत यासाठी पोर्टलवर ज्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अथवा विद्यार्थ्यांना हप्त्याचा लाभ अदा करण्यात आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर दुसऱ्या हप्त्याचे टॅब बटन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.   हे अर्ज मंजूरीसाठी महाविद्यालय स्तरावर 31 मार्चच्या आधी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात याव्यात. दिनांक 31 मार्च 2019 च्या आधी हे ऑनलाईन अर्ज आयुक्तयालयास सादर करावे असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अमरावती यांनी कळविले आहे. 000000

जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू अमरावती , दि . 20   : लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षातर्फे प्रचाराकरिता सभा व स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच दि. 21 मार्च 2019 रोजी धुलीवंदन मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यादरम्यान जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) 3 लागू करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 ते 30 मार्च 2019 पर्यंत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुध्द कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर   जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे. 000000   

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत प्रवेशासाठी 24 एप्रिलला पूर्व परिक्षा

अ नुसू चित   जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत प्रवेश ासाठी 24 एप्रिलला पूर्व परिक्षा    अमरावती ,   दि.   20   :   अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत   पाचव्या वर्गात   प्रवेशासाठी   24   एप्रिलला पूर्व परिक्षा   घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ां तर्गत   येणाऱ्या   अनुसू चित   जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत   पाच वीमध्ये प्रवेश   घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज   मागविण्यात आले आहे. यासाठीचे अर्ज   प्रकल्प अधिकारी ,   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,   अकोला यां चे   कार्यालय   आणि सैनिकी   शाळेतून विनामुल्य वाटप   हो ईल .   इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता   कार्यालय   आणि   शाळेशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करावा .   प्रवेश अर्ज प्राप्त करण्याची अंतिम   मुदत   24   एप्रिल   2019   आहे . अकेाला जिल्ह्यामध्ये नॅशनल मिलीटरी स्कूल गायगाव ,   ता .   बाळापूर येथे   45           विद्यार्थी क्षमता ,   वाशीम जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा ,   सुपखे

‘पर्यावरण स्नेही’ होळीसाठी सामाजिक वनीकरणाचे आवाहन

‘पर्यावरण स्नेही’ होळीसाठी सामाजिक वनीकरणाचे आवाहन    अमरावती ,   दि.   19   : होळी सणाच्या निमित्ताने करण्यात येणारी वृक्षतोड थांबावी, पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी एक गाव एक होळी करावी. गावातील होळींची संख्या कमी करावी होळीच्या सणाचा आनंद लुटावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. होळीसाठी लाकुड, व गोवऱ्यांचा उपयोग न करता कचरा जाळावा. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतांना रसायनांपासून बनविलेल्या रंगाचा उपयोग करुन नये. त्याएवेजी विविध फळे, व फुलांचा रंग बनविण्यासाठी वापर करावा.   रासायनिक पदार्थंनी बनविलेल्या रंगामुळे मानवी त्वचा, व अवयव विविध आजारांनी बाधित होवू शकतात. काळा रंग ऑक्साईड पासून बनलेला असतो, त्यामुळे मुत्रसंस्थेचे विकार, हिरव्या रंगातील कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांचे आजार, चांदीसारख्या रंगातील ॲल्युमिनियम ब्रोमाईड मुळे कर्करोग, निळ्या रंगातील पार्शियन निळीमुळे त्वचेचे आजार व लाल रंगातील मर्क्युरी सल्फाईटमुळे त्वचेचा कर्करोग होवू शकतो. निसर्गामध्ये पर्यावरण संतुलनाचा महत्वाच्या कार्यात वृक्षांचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. नागरिकां

नवीन वाहनांच्या नोंदणीची खात्री करावी

नवीन वाहनांच्या नोंदणीची खात्री करावी Ø   प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन    अमरावती ,   दि.   16   : नवीन वाहनांची नोंदणी करताना काही नागरिक  फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवीन वाहनांच्या नोंदणीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच वाहनांची नोंदणी ऑनलाईन तपासून पहावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.    परिवहन विभागाचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामध्ये नवीन वाहनाची नोंदणी करणे, अनुज्ञप्ती काढणे, जुन्या वाहनांचा अभिलेख संगणकावर घेणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे आदी कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे. वाहनांची नोंदणी झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना टपालाद्वारे वाहनधारकास पाठविण्यात येतो.        या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले की, एका व्यक्तीने नवीन वाहनधारकांकडून नोंदणी करण्याच्या कामासाठी शासकीय शुल्क आणि मोटार वाहनकराची रक्कम परस्पर घेऊन ती कार्यालयात भरली नाही. तसेच वाहनधारकास खोटा वाहन क्रमांक आणि खोटी कागदपत्रे दिली आहेत.      त्यामुळे मागील दोन-तीन वर्षांत नवीन वाहन विकत

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन अमरावती ,   दि.   12   :   महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     000000

अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार

अमरावती विभागात   90 लाखांवर मतदार अमरावती ,   दि. 13 : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे. विभागात अमरावती ,   अकोला ,   बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील लोकसभा मतदारसंघ आणि त्यात समाविष्ट विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत. अमरावती (अ. जा. राखीव) : अमरावती ,   बडनेरा ,   तिवसा ,   दर्यापूर ,   मेळघाट व अचलपूर. अकोला : अकोट ,   बाळापूर ,   अकोला-पश्चिम ,   अकोला-पूर्व ,   मुर्तिजापूर ,   रिसोड. यवतमाळ-वाशिम : राळेगाव ,   यवतमाळ ,   दिग्रस ,   पुसद ,   कारंजा , वाशिम. बुलढाणा : बुलढाणा ,   चिखली ,   सिंदखेड-राजा ,   महेकर ,   खामगाव , जळगाव जामोद. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) हे विधानसभा मतदारसंघ शेजारच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात ,   यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी हे चंद्रपूर तर उमरखेड हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा व वाशिम हे यवतमाळ तर रिसोड हे अकोला लोकसभा मतदारसंघ

हातमाग विणकरांसाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा

हातमाग विणकरां साठी   विभागीय हातमाग कापड स्प र्धा अमरावती ,   दि . 12 :   सहकार ,   पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .   या स्पर्धेसाठी हातमाग विणकारांनी तयार केलेले नमुने दि . 16   मार्च   2019   पर्यत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विभागीय हातमाग कापड स्पर्धा   2018-19   चे आयोजन नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृह ,   जुने सचिवालय ,   सिव्हील लाईन्स् ,   नागपूर येथे करण्यात आले आहे .   अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. यासाठी हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपसंचालक ,   वस्त्रोद्योग ,   नागपूर या कार्यालयात दि . 16   मार्च   2019   पर्यंत सादर करावे, याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक ,   सहकारी संस्था यांचे कार्यालय किंवा प्रादेशिक उपसंचालक ,   वस्त्रोद्योग, नागपूर यांच्या कार्यालयात   0712-2537927   या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक,

कोषागारे कार्यालये शनिवारी अखेरची देयके स्विकारतील

कोषागारे कार्यालये शनिवारी अखेरची देयके स्विकारतील Ø   आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन अमरावती ,   दि . 12   :   आर्थिक वर्ष रविवारी संपणार असल्यामुळे सर्व कोषागारे मार्च अखेरीची देयके शनिवारी स्विकारून या देयकांचे प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालये आणि उपकोषागार कार्यालयात दि . 31   मार्च   2019   रोजी कोणतेही देयक स्विकारल्या जाणार नाहीत. त्यानुषंगाने देयके विहित मुदतीत सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाने केले आहे. दि . 31   मार्च   2019   रोजी रविवार असल्याने शासकिय कार्यालयांना सुट्टी आहे .   या अनुषंगाने आर्थिक वर्षाअखेर निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालये आणि उपकोषागार कार्यालये दि . 30   मार्च , 2019   रोजी मार्चअखेरची देयके स्विकारतील. तसेच प्रदानाची कामे पुर्ण करतील .   तसेच दि . 30   मार्च , 2019   ही बिम्स   (BEAMS)   प्रणाली द्वारे प्राधिकारी पत्र   (BDS)   काढण्यासाठीची अंतिम तारिख असणार आहे ,   याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी . चालू आर्थिक वर्षात दि . 1   म

शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ

शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यावर उद्योगांसाठी योगदान द्यावे -          तंत्रशिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव              अमरावती,   दि. 01 :   विद्यार्थ्यांनी पदविका परीक्षा उत्तीर्ण करुन आयुष्यातील महत्वाचा टप्पा पार केलेला असतो. परंतु त्यानंतरच त्याची खरी परीक्षा सुरु होते. उद्योग क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांनी त्याकडे केवळ कमाईचे साधन म्हणुन न पाहता उद्योगांसाठी आवश्यक असणारे नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, सतत शिकण्याची वृत्ती व समस्यांचे समाधान शोधण्याचे कौशल्य आदी गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांना उद्योग क्षेत्रातील जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहता येईल. विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयं उद्योजक बनून इतरांसाठी रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी आज केले. शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे बुधवारी, दि. 27 फेब्रुवारी रोजी पदविका प्रदान समारंभात श्री. जाधव विद्यार्थ्यांना उद्बबोधन करतांना बोलत होते. अमरावती शासकीय तंत्रनिकेतन या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमरावती विभागातील 82 टक्के पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती पोर्टलवर              अमरावती,   दि. 01 :   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील 7 हजार 97 गावांच्या एकूण 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. आजमितीस (दि.1 मार्च) माहिती अपलोड करण्याची टक्केवारी 82 टक्के आहे.               विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग पात्र शेतकरी कुटुबांची माहिती संकलीत करण्याची कार्यवाही करीत आहे. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावातील 9 लाख 42 हजार 961 पात्र शेतकरी कुटुंब संख्येपैकी 7 हजार 97 गावातील 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून याची 82 टक्केवारी आहे. पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली जिल्हानिहाय