पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

  जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू   अमरावती , दि . 10 : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी, विवेक घोडके यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तायलय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी 2023 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000

राज्य मागासवर्ग आयोग घेणार विद्यापीठातील पदभरतीचा आढावा

    राज्य मागासवर्ग आयोग घेणार विद्यापीठातील पदभरतीचा आढावा   अमरावती, दि. 10 :   राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी) विद्यापीठातील पदभरतीबाबत आढावा बैठक होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नि. न्यायमूर्ती आनंद वसंत निरगुडे आहेत. आयोगाचे सदस्य ॲड चंद्रलाल मेश्राम,   डॉ. श्रीमती निलीमा सरप (लखाडे),   डॉ. गोविंद काळे हे दि. 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विद्यापीठात बैठकांद्वारे रिक्त पदांचा आढावा घेणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘अकृषी विद्यापीठ व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील दि. 1.10.2017 अखेरची विद्यार्थी संख्या गृहित धरून मंजूर शिक्षण पदभरतीचा आढावा’ या विषयावरील बैठक बुधवारी सकाळी 10.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. विद्यापीठाचे कुलगुरु, आरक्षण कक्षाचे उपकुलसचिव, विभागीय मागासवर्ग कक्षाचे सहायक आयुक्त उच्च शिक्षण सहसंचालक यांच्यासमवेत संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.   आयोगाच्या सदस्यांचे मंगळवारी (दि. 14) सायंकाळी 6 वाजता