पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

इमेज
  मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत   अमरावती, दि. 23 :   मध्यप्रदेशचे   राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील . 0000

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

  शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन   * अंतिम मुदत 31 डिसेंबर     अमरावती, दि. 22 :   जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे पाटील यांनी केले आहे. पिकस्पर्धेत सहभागी होण्याची 31 डिसेंबर ही अंतीम मुदत आहे. पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीका

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

  धर्मादाय आयुक्तांकडून आदिवासी गोरगरिबांना वस्त्रदान   मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम                             -   धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन   ( फोटो ओळ :   आदिवासी बांधवांना वस्त्रदान करताना धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व मान्यवर)   अमरावती, दि. 21 :   धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व मेळघाटात गरजू गरीब लोकांना धर्मादाय विभागाच्यावतीने वस्त्रदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जाणार असल्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी सांगितले. आमदार राजकुमार पटेल, अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे, धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद देशपांडे, सचिव अॅड. नरेश पारडशिंगे, सार्वजनिक न्यास विभागाचे

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

  नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी                                                        अमरावती, दि. 21 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली असून यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून आचार्य पदवी (पीएचडी) संपादीत केली. स्वत:चे कर्तव्य सांभाळून प्राप्त केलेल्या यशाबद्दल पोलीस विभागात त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित

  सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित   अमरावती, दि. 21 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट परिक्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांच्याकडून सेमाडोह संकुल, कोलकास संकुल येथील उपहारगृह भाडे तत्वावर चालविण्यासाठी बंद लिफाफ्यामध्ये दि. 22 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत निविदा मागविण्यात येत आहे. निविदेबाबतच्या सविस्तर माहिती करीता इच्छुकांनी उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा येथे संपर्क साधण्याचे आवाहन सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्यभारतीय एम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 00000

डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

  डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी                                                                                                                                                                                                                                  अमरावती, दि. 20 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. राठोड यांनी स्वत:चे कर्तव्य सांभाळून हे यश संपादीत केले. या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यापूर्वी डॉ. दत्ताराम राठोड यांनी वर्ष 2020 मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून एका विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प

मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना, आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

                                           मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना   आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ   अमरावती दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च    2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे  सरल डेटाबेस वरुन भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर 2022 रोजी संपत असून विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा आवेदपत्रे भरण्यासाठी  3 फेब्रुवारी 2023 पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- आवेदनपत्र सादर करण्याची निर्धारित मुदत संपल्यानंतर श्रेणी/तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाचा कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिनी रु. 50/- याप्रमाणे आकारण्यात येईल. तसेच  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- विशेष

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू   अमरावती , दि . 20   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000

बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

  बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल अमरावती, दि. 12 (विमाका):   बिबट्याने मारलेल्या शेळ्यांवर उंदीर मारण्याचे औषध टाकणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही होत आहे.   याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक दिव्य भारती यांनी कळविल्यानुसार, दि. 6 डिसेंबर रोजी सेमाडोह परिक्षेत्रातील असेरी बिट वनखंड क्रमांक 169 मध्ये वन्य प्राणी बिबट नर आणि मादी रायपूर रस्त्यानजिक मृत अवस्थेत आढळून आले. पुढील तपासात दोन मृत शेळ्याही दिसून आल्या. त्यापैकी एक शेळी अर्धवट खाल्लेली होती. या शेळ्या सेमाडोह येथील राजेश किशोरी तायवाडे (वय 45) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानुसार दि. 8 डिसेंबर रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील दिवशी अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची वनकोठडी मिळाली. वनकोठडीत संबंधित व्यक्तीने बिबट्याने मारलेल्या शेळ्यावर उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे, उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आणि एक बाटली जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्

आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

  आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा अमरावती, दि. 7 :   मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील एनएनएस सभागृहात दि.   १२ व १३ डिसेंबर   रोजी सकाळी १०   वाजता पुरूष उमेदवारांसाठी शिकाऊ रोजगार भरती मेळावा आयोजिण्यात आला आहे. गुजरातेतील सुझुकी मोटर्समधील फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, पीपीओ, ऑटोमोबाईल सीओई, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर जनरल आदी पदे मेळाव्याद्वारे भरली जातील. दहावीत किमान 40 टक्के व आयटीआय पदविकेत 50 टक्के गुण आवश्यक आहेत. शिकाऊंना कंपनीतर्फे 16 हजार 900 रू. विद्यावेतन दिले जाईल. त्याशिवाय, गणवेश जोडी, सेफ्टी बूट मिळतील. कँटिन सुविधा आहे. त्याचप्रमाणे, एक हजार रूपये महिना दराने निवासाचीही सुविधा असेल. इच्छूकांनी बायोडेटा, आधारपत्र, छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य एस. के. बोरकर यांनी केले आहे. 000000  
इमेज
  पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी फॅब्रिकेटेड पूल बांधा; प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा                                                                                   -   आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत               अमरावती, दि. २ (विमाका) : मेळघाटात पावसाळ्यात अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अशा ठिकाणी पोहोचणे फार जिकरीचे होते. पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची व सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज आढावा बैठकीत दिले. अचलपूर विश्रामगृह येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक   डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी यावेळी उपस्थित होते. श्री सावंत म्हणाले की, मेळघाटातील कुपोष
इमेज
  सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्य केंद्रांची पाहणी पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा                                                             -   आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत           अमरावती, दि. 2 (विमाका) :  कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटातील दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना आवश्यक सुविधा व उपचार   पुरवावेत, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दिले.            आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना व आमझरी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील कुपोषित बालके, मनुष्यबळ, औषधींचा साठा, गरोदर मातांना पोषण आहार, वैद्यकीय सुविधा उपकरणे आदीबाबत आढावा घेतला.        यावेळी त्यांनी बिहाली येथील रहिवासी मोती कासदेकर यांच्या पाच महिन्याच्या कुपोषित बालकाची पाहणी करून आस्थेने विचारपूस केली.            यावेळी आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक  डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक श्रीमती डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा, मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

  सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी           अमरावती, दि. 28 (विमाका) :  राज्याचे   सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे दि. 2 व 3 डिसेंबरला मेळघाट दौ-यावर असून, ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत.             त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :  शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी  सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने अचलपूरकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु. 12 वा. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रयाण, दु. 12.30 वाजता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आगमन व भेट, दु. 1 वाजता बिहालीकडे प्रयाण, दु. 2 वा. बिहाली उपकेंद्र येथे आगमन व भेट, दु. 2.30 वाजता उपकेंद्र बिहाली येथून सलोनाकडे प्रयाण, दु. 3 वाजता सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आगमन व भेट, दु. 3.45 वाजता आमझरीकडे प्रयाण, दु. 4 वाजता आमझरी उपकेंद्र येथे भेट. दु. 4.30 वा. चिखलद-याकडे प्रयाण, सायं. 5 वाजता चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे भेट, सायं. 6 वा. चिखलदरा

‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन

  ‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन   अमरावती, दि. 29 - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील    विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उद्या दि. 30 नोव्हेंबर रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. याच उपक्रमाचे विस्तारित स्वरूप म्हणून दि. 2 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.   राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे व संस्थेचे प्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे. यांत्रिकी,   इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम,आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या    प्रशिक्षणार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पने

आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम, जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

  आरोग्य विभागातर्फे आजपासून  ‘ एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट   आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे सातत्यपूर्ण कार्य   अमरावती, दि. 30 : शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गत 15 वर्षांत जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरामध्ये घट झाली आहे. यंदा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर  ‘ जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे.       प्रभावी लोकशिक्षण, उपचार, सुरक्षितता साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. ते म्हणाले की, 2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. प्रभावी जनजागृतीमुळे नागरिक तपासण्यांसाठी केंद्रांवर येण्याचे प्रमाण वाढले. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741

पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

इमेज
पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक -          विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती, दि. 22 : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेतीप्रणालीबाबत कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कृषी संशोधनात महाराष्ट्र अव्वल राज्य असला तरीही प्रत्यक्षात बहुतांश शेती अद्यापही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरिप पिके घेऊ शकतात. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 37.05 टक्के कुटुंबे शेतीवर व 44.37 टक्के कुटुंबे शेतीविषयक मजूरी कामांवर अवलंबून आहेत. त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटु