पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना महाज्योतीतर्फे 50 हजार रुपयाच्या अर्थसहाय्य

  युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना महाज्योतीतर्फे                                                  50 हजार रुपयाच्या अर्थसहाय्य          अमरावती दि. 28 :   महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 50 हजार एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता महाज्योतीतर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा दि. 12 जुन 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग - पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परिक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था,सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज क

महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

  महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ महाज्योतीचे   www.mahajyoti.org   या संकेतस्थळ उपलब्ध   अमरावती, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरमार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी करिता दहावी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी डेटा देण्यात येतो. 10 वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी दि. 5 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या   www.mahajyoti.org   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांन

अपंग बालकांना शासकीय संस्थेत मोफत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

  अपंग बालकांना शासकीय संस्थेत मोफत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित अमरावती, दि . 28:     महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह तसेच गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत आहे. या संस्थेत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी याठिकाणी प्रवेशासाठी संपर्क साधावे, असे आवाहन संस्थेव्दारे करण्यात आले आहे. मोफत शिक्षण सुविधा  या संस्थेच्या परिसरात इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण विनामुल्य दिले जाते. तसेच इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत दिल्या जाते. शाळेत जाण्या-येण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके, वहया व इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आदी सुविधा या संस्थेत आहे. वसतिगृह सुविधा वसतिगृहात अपंग मुला मुलीची स्वतंत्र निवासव्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वि

परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

  परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव अमरावती, दि, 28:  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या एका वाहनाचा लिलाव दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होईल. पाहणीसाठी वाहन कार्यालयाच्या आवारात उपलब्ध आहे.     वायुवेग पथकाने थकित कर, तसेच विविध गुन्ह्यांखाली अडकवून ठेवलेल्या वाहनाच्या मालकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहनमालकाला राहील. वाहनाचा क्रमांक एमएच 27सी0724 असून प्रकार एचजीव्ही टिप्पर, चासिस क्र.  403121सीव्हीझेड711992, इंजिन क्रमांक 497डी44 सीव्हीझेड871875 व रंग रूबी रेड आहे.  वाहनाची नोंदणी 17 एप्रिल, 2004 रोजीची व बनावट – टाटा मोटर्स लि. यांची आहे.   जाहीर ई-लिलावात एचजीव्ही संवर्गातील एक वाहन उपलब्ध आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 3 ते 10 जुलैदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत  www.eauction.gov.in  या संकेतस्थळावर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे 17 हजार रू. रकमेचा आरटीओ, अमरावती या नावाने अनामत धनाकर्षासह (डिमांड ड्राफ्ट) नाव न

पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

  पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला अमरावती,दि. 28 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यातील सरासरी 145.7 मि.मि. पर्जन्यमानाच्या तुलनेत दि. 27 जूनअखेर  54 मि.मि. अर्थात सरासरीच्या 37.1 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब व हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार दि. 2 ते 8 जुलै दरम्यान कमी पाऊस पडण्याची व पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.  त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करु नये. सर्वसामान्यतः 80 ते 100 मिमि. पर्यत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. ज्या शेतक-यांनी पेरणी केली आहे, त्यांनी पिकांसाठी संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या (मल्चिंग) तंत्रज्ञानाचा वापर करावा,

शेतकरी बांधवांनी खात्याचे नवीनीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

इमेज
  शेतकरी बांधवांनी खात्याचे नवीनीकरण करून घ्यावे -            जिल्हाधिकारी पवनीत कौर अमरावती, दि. 27 : शेतकरी बांधवांनी कर्जखात्याचे विहित मुदतीत नवीनीकरण करून घ्यावे जेणेकरून नवे कर्ज व व्याज सवलत योजनेचा लाभ मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.             दरवर्षी मिळणा-या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असते. परतफेड न झाल्यास पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण येते. कर्जफेड करणा-या शेतक-यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्जखाते थकित होते. थकित खातेधारकांना बँका पीककर्ज देत नाही. त्यामुळे मुदतीत कर्जाची परतफेड करून खात्याचे नवीनीकरण करणे आवश्यक आहे. येत्या 31 जुलैपूर्वी शेतकरी बांधवांनी आपल्या मागील पीककर्जाची परतफेड करून खाते नवीनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना पीकविमा योजनेचा लाभ घेता येतो, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ मिळू शकतो. वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. कर्ज खाते नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ ह

बकरी ईदनिमित्त गुरूवारी सार्वजनिक सुट्टी

  बकरी ईदनिमित्त गुरूवारी सार्वजनिक सुट्टी अमरावती, दि. 27 : अधिसूचित सुट्टीतील बदलानुसार बकरी ईदनिमित्त गुरूवारी (29 जून) सार्वजनिक सुट्टी असेल. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांत बकरी ईद या सणाची सुट्टी बुधवार दि. 28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. तथापि, बकरी ईद (ईद- उल- झुआ) हा सण गुरूवारी येत असल्याने सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बकरी ईदनिमित्त सुट्टीचा दिवस गुरूवार, दि. 29 जून 2023 आहे. ०००

राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

  सुधारित दौरा राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ   अमरावती, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस हे उद्या शनिवारी (24 जून) अमरावती दौ-यावर असून, त्यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ व विविध कार्यक्रम होतील. सुधारित दौऱ्यानुसार, नागपूर येथील राजभवन येथून राज्यपालांचे शनिवारी सकाळी 8 वाजता वाहनाने अमरावतीकडे प्रयाण होईल. सकाळी 10 वाजता अमरावती येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.35 वा. विश्रामगृह येथून स्वामी विवेकानंद सभागृहाकडे प्रयाण. सकाळी 10.50 वाजता पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस् परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृह येथे आगमन व राखीव. स्वामी विवेकानंद सभागृह येथे सकाळी 11 ते 12.45 वा. दरम्यान येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39 वा पदवीदान समारंभ, त्यानंतर राखीव, दु. 1.30 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह येथून सेवाग्रामकडे प्रयाण.                                                           00000  

परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना

  परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थी अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अंमलबजावणी केली जाते.   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.   विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना ही शासनाची महत्वाची योजना आहे.  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित                   अमरावती, दि. 22 : महिला व बाल विभागामार्फत महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.             इच्छूक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, दत्तात्रय सदन, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती यांच्याशी दूरध्वनी क्र. (0721) 2990412 या क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा व आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसह तीन प्रतींत 7 दिवसांच्या आत अर्ज पाठवावा. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. 000000

‘नशामुक्त भारत’ पंधरवड्यात ‘हसतखेळत व्यसनमुक्ती’बाबत मार्गदर्शन

  ‘नशामुक्त भारत’ पंधरवड्यात ‘हसतखेळत व्यसनमुक्ती’बाबत मार्गदर्शन             अमरावती,दि. 22 :  समाजकल्याण विभागातर्फे नशामुक्त भारत पंधरवड्यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त अधिक्षक व लेखक जी. बी. देशमुख यांचे हसत खेळत व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान नुकतेच झाले.             प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, लेखाधिकारी विश्वास डाखोरे, विशेष अधिकारी  राजेंद्र भेलाऊ, सहायक लेखाधिकारी राजेश रायकवार आदी उपस्थित होते.             श्री. देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांशी हसतखेळत संवाद साधत नर्मविनोदी शैलीत विषयाची प्रभावी मांडणी केली व उपस्थितांची मने जिंकली. व्यसनमुक्तीमुळे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊन जीवन सुखमय व आनंदी होते. त्यामुळे स्वत: व्यसनमुक्त राहून इतर व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करूया व सभोवताल सुंदर करूया, असे आवाहन त्यांनी केले.              नशामुक्त भारत अभियात सर्वांनी सहभागी होऊन सशक्त भारत निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन प्र

अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा शाळांमधून ‘इट राइट’ मोहिम प्रभावीपणे राबवा - आरडीसी विवेक घोडके

इमेज
  अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा शाळांमधून ‘इट राइट’ मोहिम प्रभावीपणे राबवा -         आरडीसी विवेक घोडके अमरावती, दि. 21 :  ‘जंक फूड’मुळे कमी वयात अनेकांना आजार जडल्याचे आढळून येत आहे. बालकांमध्येही दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सुरू केलेली ‘इट राइट’ (योग्य खा) मोहिम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज केली. अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त शरद कोलते, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात हायजीन रेटिंग, इट राईट कॅम्पस, इट राईट स्कूल, फॉसटॅक ट्रेनिंग आदी कार्यक्रम राबवावयाचे आहेत. बालकांना आरोग्यदायी व पोषक अन्न मिळावे या दृष्टीने विद्यार्थी व पालक दोहोंची जाणीवजागृती करावी, असे आरडीसी श्री. घोडके यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तपासावयाचे अन्न नमुने प्रलंबि

उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पदावर अनिल भटकर रुजू

इमेज
  उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पदावर अनिल भटकर रुजू अमरावती दि. 21 : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) या पदावर अनिल भटकर हे सोमवारी रुजू झाले. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी हे या पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यावर काही दिवस प्रभार उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याकडे होता.  श्री. भटकर यांनी श्री. लंके यांच्याकडून पदाचा कार्यभार घेतला. यापूर्वी श्री. भटकर हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत होते. श्री. भटकर यांनी यापूर्वी महसूल खात्यात विविध ठिकाणी तहसीलदार व अनेक पदांवर प्रदीर्घ सेवा बजावली आहे. अमरावती येथे पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.   000
इमेज
  अंगणवाड्यांत चिमुकल्यांनी आज केली योग प्रात्यक्षिके   अमरावती, दि. 21 :   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंगणवाडी केंद्रांतील चिमुकल्यांनी योग प्रात्यक्षिके   करून आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.              जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मन आणि शरीर यांचे संतुलन साधण्यासाठी योग उपयुक्त आहे. त्यादृष्टीने नव्या पिढीवर योगसंस्कार करण्याच्या हेतूने अंगणवाड्यांतही हा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनानुसार महिला व बालविकास विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.              हा उपक्रम राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका यांना   योगाबाबतचे मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठविण्यात आले. अंगणवाड्यांतील बालकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत योगाचे महत्व पोहोचविण्याचाही उद्देश होता, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले.           उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी यांनी विविध अंगणवाड्यांत उपस्थित र
इमेज
  मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरु यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन             अमरावती , दि. 2 :   भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी दुबार नोंदणी, मयत मतदार व स्थलांतरित मतदार यांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना देऊन यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.              निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पूर्व उपक्रमात त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण दि. 20 जुलैपूर्वी घेण्यात येईल. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, मतदार यादीत सुधारणा करणे आदी कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबरदरम्यान करण्यात येतील. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान नमुना १-८ तयार करणे, अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व

दिवाणखेड तेथील अमृत सरोवराच्या परिसरात योगदिन साजरा योगाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रसन्नतेची अनुभूती

इमेज
  दिवाणखेड तेथील अमृत सरोवराच्या परिसरात योगदिन साजरा योगाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रसन्नतेची अनुभूती अमरावती, दि. २१ : अमृत सरोवराचा निसर्गसुंदर परिसर, विस्तीर्ण जलाशय, पहाटेची आल्हाददायक हवा, निरामय शांततेत योग, प्रार्थना व ध्यानधारणा अशा चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या वातावरणाचा प्रसन्न अनुभव आज उपस्थितांनी घेतला. तिवसा तालुक्यातील दिवाणखेड येथील अमृत सरोवर येथे जागतिक योगदिनाचे निमित्त साधून योगदिन साजरा करण्यात आला. रोहयो उपायुक्त विजय भाकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढाले, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, गोपाळ कडू, दिवाणखेडचे सरपंच बाळूभाऊ उईके यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, योगप्रेमी, ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक अशोक बेंडे, राहूल दोडके, सचिन पांडे यांनी सहभागींना योगाचे धडे दिले. यावेळी प्राणायाम, श्व