पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन   अमरावती, दि. 30 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 च्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दि. 18 ऑक्टोबर, 2020 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि. अमरावती येथे सादर करावे, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती यांनी केले आहे. ****
इमेज
मुख्यमंत्र्यांकडून अमरावती विभागाचा आढावा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर घरोघरी सर्वेक्षणाची माहिती ॲप द्वारे तात्काळ भरावी अमरावती, दि 26 : सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’, घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोन

सुसर्दा परीक्षेत्रातील वृक्षतोडीचा तपास सुरु

  सुसर्दा परीक्षेत्रातील वृक्षतोडीचा तपास सुरु अमरावती, दि. 22 : दिनांक 13 सप्टेंबर रोजी सुसर्दा परीक्षेत्रातील सुसर्दा वर्तुळातील चेंडो नियतक्षेत्रात क. नं. 1233 मध्ये अवैध वृक्षतोडीची घटना घडली. या अवैध वृक्षतोडीबाबत POR क्र. 525/17 दि. 13 सप्टेंबर 2020 जारी करण्यात आला आहे. अवैध वृक्षतोडीमध्ये एकुण 12 थुट आढळले आहे. या वृक्षाच्या थुटांवरील काही माल गुन्हेगार सोबत घेवून गेले व काही माल घटनास्थळीच असल्याचे चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले. यावेळी घटनास्थळी पडलेला माल जप्त करण्यात आला असून हा माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी वनपरीक्षेत्र अधिकारी, सुसर्दाद्वारे करण्यात येत आहे. या अवैध वृक्षतोडी संबंधात उपवनसंरक्षक, मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग, परतवाडा व सहाय्यक वनसंरक्षक, धारणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे, असे उपवनसंरक्षक यांनी कळविले आहे.   000000        

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

  शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे Ø   कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन   अमरावती, दि. 11: जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती चांगली आहे. तरी ही शेतकऱ्यांनी या वर्षी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन वेळीच करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.             खरीप हंगाम 2020 मध्ये सद्यस्थितीमध्ये कपाशी पिक फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. यावर्षी सुध्दा कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांनी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना कराव्यात. गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरीता प्रती हेक्टरी 5 फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाईट ट्रॅप लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, वेळीच डोमकळी नष्ट करणे, तसेच शिफारशीप्रमाणे किटकनाशकांचा वापर करणे, आदी उपयायोजना कराव्

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी

  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी अमरावती, 10 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्या शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आय टी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी व व्यवसाय व्यतिरिक्त (औरंगाबाद/पुणे येथे) कंपनीमध्ये काम करण्यास इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र अमरावती येथे त्वरीत नोंदणी करावी. तसेच प्रत्यक्ष शिकाऊ उमेदवारी भरती मेळावे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे संस्थेच्या प्राचार्य श्रीमती एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे. 00000

एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड

  एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड अमरावती, 10 : अमरावती विभागातील एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कुल चिखलदरा जि. अमरावती, सहस्त्रकुंड जि. नांदेड व बोटोणी जि. यवतमाळ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन स्पर्धा परिक्षेऐवजी मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2019-20) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे, असे   आदिवासी विकास अमरावतीचे अपर आयुक्त श्री. विनोद पाटील यांनी माहिती दिली. आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सव शासनमान्य अनुदानित/विनाअनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यानी मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. mtpss.org.in या लिंकवर ज्या जिल्ह्यातील ज्या शाळेतील विद्यार्थ्या

विभागीय आयुकत कार्यालयात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुकत कार्यालयात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन अमरावती, 7 : आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय पवार यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच गजेंद्र बावणे, प्रमोद देशमुख यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर श्री. पेठे यांच्याह अधिकारी- कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.